• Contact us
  • About us
Monday, September 7, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

व्हायरल सच : शरद पवार यांची दिल्लीत भाजप नेत्यांबरोबर भेट झाल्याचा मेसेज सोशल मिडीयात काल व आज का फिरला? खरी वस्तुस्थिती काय आहे?

Maha News Live by Maha News Live
November 27, 2021
in यशोगाथा, सामाजिक, आरोग्य, कामगार जगत, राष्ट्रीय, राजकीय, राज्य, लाईव्ह, व्यक्ती विशेष, Featured
0

महान्यूज लाईव्ह रिपोर्ट

राजकारणात काहीही होऊ शकते हे जरी खरे असले तरी शरद पवार यांच्या सारख्या ज्येष्ठ नेत्याचा फोटो मॉर्फ केला जाईल आणि जिथे ते गेले नाहीत तिथे ते गेल्याचा संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाईल हे मात्र राजकारणात वावरणाऱ्यांसाठीही धक्कादायक आहे. काल भाजपाचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीत होते. तसेच भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटीलही दिल्लीत होते. त्यानंतर शरद पवार दिल्लीला गेल्याची पहिली बातमी आली. या बातमीनंतर संभ्रम पसरविण्याची मोहीम सुरू झाली.

यानंतर पहिली बातमी आली, ती पवारसाहेब सर्व नियोजित कार्यक्रम रद्द करून अचानक दिल्लीचा गेल्याची..! ही बातमी व्हायरल करून काहीतरी मोठी राजकीय घडामोड होत असल्याचा संभ्रम निर्माण केला गेला. यानंतर राष्ट्रवादीकडून असे काहीही नसून पवारसाहेब नियोजित कार्यक्रमानूसार ठरलेल्या संरक्षण विभागाच्या बैठकीसाठी दिल्लीला गेल्याचे सांगितले गेले. परंतू नंतरही ” अचानक ” दिल्ली गाठल्याची माहिती सोशल मिडियावर फिरतच राहिली.

यानंतर रात्री एक फोटो अचानक सोशल मिडियावर फिरायला सुरुवात झाली. या फोटोत फडणवीसांच्या बाजूला पवारसाहेब बसलेले दिसतात, याच फोटोत समोर अमीत शहा बसलेले आहेत. यातून फडणवीसांसोबत शरद पवारांनी अमित शहा यांची भेट घेतलेली आहे असा अर्थ निघतो. हा फोटो अनेक व्हाटसएप ग्रुपवर फिरला, अर्थात तो फिरवला जास्त गेला..!

वस्तुस्थिती काय आहे?


यात आणखी लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे इतर वेळी ज्यावेळी फडणवीस दिल्लीत कोणा मोठ्या नेत्याला भेटतात, त्यावेळी त्या भेटीचे फोटो लगेचच सोशल मिडियावर बघायला मिळतात. मात्र यावेळेस ते फोटो सोशल मिडियावर आले नाहीत. ते आले नाहीत याचे कारण, जर ते फोटो आले असते तर फडणवीस यांनी एकट्यानेच अमीत शहांची भेट घेतल्याचे तेव्हाच स्पष्ट झाले असते. पण तसे झाले नाही आणि जाणीवपूर्वक ” मोठ्या राजकीय घडामोडींच्या ” चर्चेला उधाण आले.

वस्तुतः शरद पवार हे इस्त्रायली देशदूत कोब्बी सोशनी यांच्याशी चर्चा करतानाचा तो फोटो होता. बारामती आणि इस्त्रायलचे नाते खूप दिर्घकाळचे आहे. पद्मश्री स्वर्गीय अप्पासाहेब पवार यांनी महाराष्ट्रात व भारतातही पहिल्यांदा ठिबक सिंचन आणले, ते इस्त्रायलच्या मदतीने! शोशनी यांच्या या भेटीदरम्यान बारामतीतील कृषी विकासावर अधिक चर्चा झाली होती.

त्यानंतर काही वेळाने राष्ट्रवादीचे प्रवक्ते नबाब मलिक यांनी सदरचा फोटो हा बनावट असल्याचे स्पष्ट केले. या फोटोत पवार यांचा दुसऱ्या भेटीतील फोटो कटपेस्ट करून फडणवीसांचा जो फोटो अमित शहांशी चर्चा करताना आहे, त्या फोटोमध्ये मॉर्फ करून पवार यांचे छायाचित्र बाजूला लावण्यात आल्याचे स्पष्ट झाले. आजच्या आधुनिक जमान्यात अशा गोष्टी करणे अगदी सहजशक्य आहे, परंतू कोणी शरद पवार यांच्या बाबतीत असे करू शकेल यावर विश्वास बसणे थोडे अवघड आहे. राष्ट्रवादीने खुलासा करण्यापूर्वी आणि केल्यानंतरही फडणवीस यांना पत्रकारांनी या कथित भेटीबाबत विचारले, तेव्हा ते देखील केवळ हसून संभ्रम वाढविण्याचा प्रयत्न करताना दिसले.

Next Post

महावितरण विरोधातील आंदोलनात हर्षवर्धन पाटील ठाम! अंधारातही कार्यकर्ते बसून!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उद्यापासून पावसाळी अधिवेशन; सरसकट कर्जमाफी, दुष्काळाचे सावट, विषारी दारूकांड, वाढत्या गुन्हेगारीवरून सरकारची कसोटी

आरोग्य अधिकारी जसे काम करतील; तशाच प्रकारची त्यांना नियुक्ती व जबाबदारी मिळणार..! त्यांची कामगिरीच ठरवेल आरोग्य अधिकाऱ्यांची पुढील जबाबदारी; दरवर्षी होणार गुणांकन

September 7, 2026
सावत्र बहिणीचे घर जाळल्याचा आरोपातील हवा असलेला आरोपी पहाटेच्या सापळ्यात जेरबंद..!

सावत्र बहिणीचे घर जाळल्याचा आरोपातील हवा असलेला आरोपी पहाटेच्या सापळ्यात जेरबंद..!

September 7, 2026
पाच वर्षे वॉरंटला चकवा; अखेर आरोपी पोलिसांच्या जाळ्यात मारहाण व धमकीच्या २०२१ मधील गुन्ह्यात देवेंद्र घोडकेला अटक; न्यायालयीन कोठडी!

पाच वर्षे वॉरंटला चकवा; अखेर आरोपी पोलिसांच्या जाळ्यात मारहाण व धमकीच्या २०२१ मधील गुन्ह्यात देवेंद्र घोडकेला अटक; न्यायालयीन कोठडी!

September 7, 2026
चार दशकांनंतरही शिक्षकांच्या आठवणी ताज्या; १९८६च्या बॅचमधील माजी विद्यार्थ्यांनी ७०० हून अधिक पोस्टकार्डांद्वारे व्यक्त केली कृतज्ञता..!

चार दशकांनंतरही शिक्षकांच्या आठवणी ताज्या; १९८६च्या बॅचमधील माजी विद्यार्थ्यांनी ७०० हून अधिक पोस्टकार्डांद्वारे व्यक्त केली कृतज्ञता..!

September 7, 2026
लेकीसाठी अनवानी पायाने धावणाऱ्या माऊलीच्या मदतीला सचिन तेंडुलकरही सरसावला

लेकीसाठी अनवानी पायाने धावणाऱ्या माऊलीच्या मदतीला सचिन तेंडुलकरही सरसावला

September 7, 2026
साखर कारखान्यांची धुराडी कधी पेटणार? ऑक्टोबर की नोव्हेंबरचा मुहूर्त; बुधवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत निर्णय

साखर कारखान्यांची धुराडी कधी पेटणार? ऑक्टोबर की नोव्हेंबरचा मुहूर्त; बुधवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत निर्णय

September 7, 2026
नगराध्यक्षांच्या वित्तीय अधिकारांना कात्री; नमुना क्र. ६४ वर मुख्याधिकाऱ्यांचीच स्वाक्षरी

नगराध्यक्षांच्या वित्तीय अधिकारांना कात्री; नमुना क्र. ६४ वर मुख्याधिकाऱ्यांचीच स्वाक्षरी

September 7, 2026
भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील पहिला महानायक – आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक!

भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील पहिला महानायक – आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक!

September 7, 2026
दिवे घाटातील अपघातातील गौरव चव्हाणच्या कुटुंबीयांची युगेंद्र पवार यांनी घेतली भेट!

दिवे घाटातील अपघातातील गौरव चव्हाणच्या कुटुंबीयांची युगेंद्र पवार यांनी घेतली भेट!

September 6, 2026
उद्या सोमवारी उजनीकाठच्या ४० गावात मच्छीमारांचे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण..!

उद्या सोमवारी उजनीकाठच्या ४० गावात मच्छीमारांचे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण..!

September 6, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group