• Contact us
  • About us
Monday, June 8, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

होईल पुनव, मनाशी जागव.. खचून जाऊ नको.. बारा मावळमुलखात तू भुकेला राहू नको..! रस्त्याने अडवलेल्या ट्रकचालकांची भूक भागवण्या जेव्हा धावले मावळे..! संकटकाळी माणसूकीने दाखवले मांगल्याचे सोहळे..!

Maha News Live by Maha News Live
July 24, 2021
in यशोगाथा, सामाजिक, शिक्षण, शेती शिवार, आरोग्य, कामगार जगत, राजकीय, राज्य, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, व्यक्ती विशेष, Featured
0

भुकेल्या ट्रक चालकांच्या मदतीले धावले विक्रमदादा युवामंचचे कार्यकर्ते;महामार्गावर अडकलेल्या ३०० ट्रकचालकांना अल्पोहर, जेवण

माणिक पवार : महान्यूज लाईव्ह

भोर – सगळीकडे हाहाकार असला, अगदी घराशेजारीही मृत्यूचे तांडव दिसत असले, तरी देखील एकमेकांच्या तोंडात घास भरवण्याची परंपरा येथील दऱ्याखोऱ्यातील, बारा मावळमुलखाची आहे.. इथला सह्याद्री हिमालयाच्या मदतीला धावून जातो.. इथे तर घरातच संकटाच्या उतरंडी आहेत, म्हणूनही तो खचून जाणार नाही.. तो मदतीला धावणारच.. याचाच प्रत्यय देत भोर परिसरात रस्त्यावर अडवलेल्या ट्रकचालक, वाहकांच्या जेवणाची व्यवस्था करण्यासाठी मावळे धावून गेले.. त्यांनी दाखवलेल्या या माणूसकीच्या संवेदनशील हातांनी राज्यातील, परराज्यांतील ट्रकचालक, प्रवाशीही भारावून गेले…

कोल्हापूर, सांगली, सातारा, चिपळूणमध्ये पुराची परिस्थिती निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर पुणे – सातारा महामार्गावरून जाणारे सर्व अवजड वाहने पोलिसांनी सुरक्षतेसाठी अडवली आहेत. अचानक ही वाहने अडवली गेल्याने फारशी तजवीज न करून निघालेल्या वाहनचालकांपुढे भीतीचे साम्राज्य पसरले. अगदीच रस्त्यावर थांबता येईल, ट्रक, वाहनात झोपता येईल, मात्र भुकेने तोंड वर काढले की काय करायचे हा प्रश्न उभा राहीला..आणि मग काय, धावून आला ना.. इथला बारा मावळमुलखातला मावळा..! गवताच्या पात्यालाही इथेच भाले फुटले आणि माणूसकीच्या देवांनी येथेच राज्य केले, असा हा परिसर, मग तेथे कोणीतरी रस्त्यावरचा कसा भुकेला राहील?… भुक आणि तहानेने व्याकूळ झालेल्या ट्रकचालक आणि त्यांच्या सहकाऱ्यांना, रस्त्याने प्रवास करणाऱ्या प्रवाशांनाही विक्रमदादा खुटवड युवामंचच्या कार्यकर्त्यांनी धाव घेत अल्पोपहार, जेवण आणि पाण्याच्या बॉटल देऊन माणुसकीचे दर्शन घडविले.

पुणे – सातारा महामार्गावर जागोजागी शेकडो ट्रकचालक आणि किन्नर अडकले असल्याच्या पार्श्वभूमीवर विक्रमदादा खुटवड युवामंचचे पै. धनेश डिंबळे यांच्या पुढाकारातून तब्बल ३०० चालक आणि सहकाऱ्यांना शनिवारी सकाळपासून बिस्कीट पुडे, पोहे, पाणी बॉटल, तसेच दुपारी जेवणाची व्यवस्था करण्यात आली. यावेळी पोलीस निरीक्षक संदीप घोरपडे, सहायक पोलीस निरीक्षक मनोजकुमार नवसरे, पै. धनेश डिंबळे, भोर पत्रकार संघाचे संजय इंगुळकर, किरण भदे, माणिक पवार, युवामंचचे अमीर बाठे, माऊली राऊत, संजय यादव, किशोर चव्हाण, नारायण पांगारकर, पै. आकाश गाडे, पै. अनिकेत गाडे, राहुल गाडे, तुषार शेडगे, दीपक खंडागळे, संजय डिंबळे, तुषार डिंबळे, सौरभ खुडे उपस्थित होते.

पोलीस निरीक्षक संदीप घोरपडे म्हणाले कि, परजिल्ह्यात ओढवलेल्या परिस्थितीमुळे अवजड वाहने थांबविली गेली आहेत. अचानक अडचणी अथवा संकटवेळी अकल्पित झालेली मदत ही खऱ्या अर्थाने पुण्याईचे काम आहे. अशाच प्रकारे विक्रमदादा युवामंच, धनेश डिंबळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेली मदत ही लाखमोलाची असल्याची भावना घोरपडे यांनी व्यक्त केली.

संकट सर्वावर ओढवतात अशावेळी माणुसकी म्हणून अडकलेल्या ट्रक बांधवाना विक्रमदादा युवामंचच्या वतीने दोन्ही वेळची जेवणाची व्यवस्था केली असून सामाजिक काम करण्यासारखे दुसरे कोणतेही समाधान नसल्याची प्रांजळ भावना धनेश डिंबळे यांनी व्यक्त केली. महामार्गावरील कामथडी, धांगवडी, किकवी, सारोळा परिसरात अडकलेल्या ट्रकचालक, त्यांचे सहायक यांना जागेवर जाऊन जेवण देण्यात आले. तर कामथडी येथील ऐश्वर्या नर्सरीच्या वतीने तांदूळ देण्यात आले.

Next Post

धक्कादायक - कोरोनाच्या काळात लॉकडाऊनमधील एकाकीपणा आणि हातात मोबाईल...त्याचा परिणाम झालाय का? फक्त एकाच जिल्ह्यातून 6 महिन्यात तब्बल 307 महिला व मुली बेपत्ता...!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

May 29, 2026
मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

May 29, 2026
पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

May 29, 2026
गुप्तधनाचा बहाणा… प्राध्यापकाचा बळी; ४० दिवसांनी उघडली खुनी खेळी!

अवैध मुरूम उत्खननाची तक्रार केल्याने तक्रारदारावर जीवघेणा हल्ला! दौंड तालुक्यातील हिंगणीगाडा येथील घटना! तिघांवर गुन्हा!

May 29, 2026
राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

May 29, 2026
बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

May 29, 2026
शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

May 29, 2026
बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

May 29, 2026
‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

May 29, 2026
बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांचा मोठा भांडाफोड; तुकाराम मुंढेंची राज्यभर पडताळणी मोहीम! 10 हजार 922 कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू; 316 जणांवर कारवाई!

माफी मागून सक्तीची निवृत्ती घ्या!बनावट दिव्यांग प्रमाणपत्रांवर न्यायालयाचा मोठा दणका; राज्यभर १२० दिवसांत पुनर्पडताळणीचे आदेश

May 29, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group