• Contact us
  • About us
Saturday, June 13, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पीएमपीमएलची बस ही गरीबांची बस बनेल; ग्रामीण भागातील प्रवाशांना दिलासा देईल : दत्तात्रय भरणे

Maha News Live by Maha News Live
June 20, 2021
in यशोगाथा, आरोग्य, कामगार जगत, राजकीय, राज्य, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, Featured
0

राजेंद्र झेंडे : महान्यूज लाईव्ह

दौंड : पुणे शहरात धावणारी पीएमपीमएलची बस ही ग्रामीण भागात सुरू झाल्याने शेतकारी, कामगार, विद्यार्थी प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. एकेकाळी एस.टी. महामंडाळाची बस ही ग्रामीण भागातील बस म्हणून ओळखली जायची. पीएमपीमएलनेही ग्रामीण भागात चांगली सेवा दिली, तर ती देखील ग्रामीण भागातील गरीबांची चांगली बस होईल असे मत राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी व्यक्त केले.

पुणे शहरात सुरू असलेली पुणे महानगर पालिकेची परिवहन महामंडल अर्थात पीएमपीएमएल बस ही हडपसर ते चौफुला आणि हडपसर ते वरवंड अशी धावणार आहे. या बसची सुरवात आज रविवारी ( दि.20 ) राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून झाली.

याप्रसंगी माजी आमदार व पुणे जिल्हा बॅकेचे अध्यक्ष रमेश थोरात, पुणे महानगर पालिकेची परिवहन महामंडळाचे व्यवस्थापक संचालक डॅा. राजेंद्र जगताप, वाहतुक व्यवस्थापक दत्तात्रय झेंडे, राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष वैशाली नागवडे, जिल्हा परिषद सदस्य विरधवल जगदाळे, लक्ष्मण सातपुते, दौंड पंचायत समितीच्या सभापती हेमलता फडके, सरपंच मिना दिवेकर, उपसरपंच प्रदीप दिवेकर, नायब तहसीलदार सचिन आखाडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे आभियंता हरिचंद्र माळशिकारे आदी उपस्थित होते.

यावेळी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले की, दौंड तालुक्यात पुणे शहरातील बस सुरू झाल्याने अंत्यत चांगले काम पुणे महानगर पालिकेची परिवहन विभागाने केले आहे. त्यांचे ग्रामीण भागातील प्रवाशी कायमस्वरूपी ऋणी राहतील, पुणे शहराचा ग्रामीण भागात ही मोठ्या प्रमाणात विस्तार होत असून लोकसंख्या व इतर उद्योग वाढत आहे. पुणे शहराला पाण्याची गरज आहेच मात्र यामुळे भविष्यात दौंड आणि इंदापुरला पाणी टंचाई सामना करावा लागणार आहे.

खडकवासला धरणाचे पाणी शेतीसाठी अपुरे पडत आहे. मुळशी धरणाची वीज प्रकल्पाची दुसरीकडे व्यवस्था करून त्या धरणाचे पाणी ही दौंड व इंदापुरला शेतीसाठी मिळाले पाहिजे आणि ती भविष्याची गरज आहे. दौंडसाठी जास्तीत जास्त विकास निधी देण्याचा मी प्रयत्न करीन असे आश्वासन भरणे यांनी यावेळी दिले.

सर्व शासकीय अधिकारी आणि कर्मचारांनी कोरोना काळात चांगले कामकाज केले आहे. कोरोनाची दुसरी लाट थोड्याफार प्रमाणात ओसरली असली, तरी कोरोनाचे संकट संपलेले नाही. जीवाभावाची माणसे आपल्या सोडून गेली आहेत. कोरोनाची तिसरी लाटेची शक्यता आरोग्य विभागाने आणि तंज्ञांनी वर्तवली आहे.यामुळे नागरीकांनी काळजी घ्यावी, शासनाच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहनही भरणे यांनी यावेळी नागरीकांना केले.

पुणे महानगरपालिका परिवहन महामंडलाचे व्यवस्थापक अध्यक्ष डॅा. राजेंद्र जगताप म्हणाले, पुणे शहरातच पीएमपीमएलची बस सुरू आहे. ग्रामिण भागात ही बस सुरू करण्याची मागणी वाढत आहे. ग्रामिण भागात ही बस सुरू करताना अनेक अडचणी निर्माण झाल्या. मात्र शहरापुरते कार्यक्षेत्र मर्यादित न करता त्याचा विस्तार वाढवा आणि ग्रामीण भागाला जोडण्यासाठी ग्रामीण भागात ही बस सुरू करण्याची गरज ओळखून आम्ही दौंड तालुक्यातील वाघोली ते राहु आणि हडपसर ते यवत अशी बस सुरू केल्या. या बसेसला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

यावेळी चौफुला आणि वरवंड पर्यंत ही बसेस सुरू करण्याची मागणी ग्रामपंचायत आणि माजी आमदार रमेश थोरात यांनी मागणी केली.

ग्रामीण भागासाठी बारा बस सुरू केल्या आहेत. हडपसर ते चौफुला, वरवंड पर्यंत बस आजपासून सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रत्येक अर्धा
तासाला हि बस धावणार आहे. हडपसर ते उरळी (सासवड मार्ग),कात्रज ते विझंर,पिरंगुट ते हिंजवडी,कात्रज ते वडगाव मावळ,हडपसर ते वडकी (गायकवाडी मार्ग) या बसेस आजपासून ( दि.20 ) सुरू करण्यात आल्या असून पुढील टप्यात ग्रामिण भागासाठी काही बसेस सुरू करण्याचे नियोजन आहे. अशी माहिती यावेळी राजेंद्र जगताप यांनी दिली.

रमेश थोरात म्हणाले की, दौड तालुक्यात पीएमपीमएलची बस सुरू व्हावी यासाठी मी स्वतः पीएमपीमएलचीचे अध्यक्ष राजेंद्र जगताप यांची वेळोवेळी भेट घेतली. राहु, यवत आणि आता चौफुला,वरवंड येथे बस सुरू झाली. तालुक्यात अनेक गावांची ही बस सुरू करण्याची मागणी वाढली आहे. पाटस, कुरकुंभ, पारगाव या गावांनी ही बस सुरू करण्यासाठी निवदेने दिली आहेत. या गावांमध्ये ही लवकरच बस सुरू करण्याचा प्रयत्न करू त्यासाठी पाहिजे मदत करू असे आश्वासन थोरात यांनी यावेळी दिले.

Next Post

भोर - वरंधा राज्य महामार्ग गेला पहिल्याच पावसात खड्ड्यात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

May 29, 2026
मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

May 29, 2026
पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

May 29, 2026
गुप्तधनाचा बहाणा… प्राध्यापकाचा बळी; ४० दिवसांनी उघडली खुनी खेळी!

अवैध मुरूम उत्खननाची तक्रार केल्याने तक्रारदारावर जीवघेणा हल्ला! दौंड तालुक्यातील हिंगणीगाडा येथील घटना! तिघांवर गुन्हा!

May 29, 2026
राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

May 29, 2026
बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

May 29, 2026
शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

May 29, 2026
बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

May 29, 2026
‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

May 29, 2026
बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांचा मोठा भांडाफोड; तुकाराम मुंढेंची राज्यभर पडताळणी मोहीम! 10 हजार 922 कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू; 316 जणांवर कारवाई!

माफी मागून सक्तीची निवृत्ती घ्या!बनावट दिव्यांग प्रमाणपत्रांवर न्यायालयाचा मोठा दणका; राज्यभर १२० दिवसांत पुनर्पडताळणीचे आदेश

May 29, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group