महान्यूज लाईव्ह रिपोर्ट
दिल्लीत कोरोना ने मागवलेले थैमान लक्षात घेतात महाराष्ट्रातही कोरोनाची दुसरी लाट येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यातच राज्यभरात दररोज रुग्ण वाढ होण्याची चिन्हे दिसत असल्याने राज्य सरकार याबाबत गांभीर्याने विचार करत आहे. दरम्यान विश्वसनीय सूत्रांकडून अहवालानुसार राज्य सरकार देखील दुसरी लाट रोखण्याच्या दृष्टीने विमान व रेल्वे सेवा बंद करण्याची शक्यता आहे.
मागील काही दिवसातच दिल्लीमधील कोरोना बाधितांची संख्या पन्नास हजारांहून अधिक झाल्याने दिल्ली सरकार सतर्क झाले आहे. दुसरीकडे महाराष्ट्रात देखील दररोजच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने सरकार देखील सतर्क झाले आहे, त्यामुळे आणखी संसर्ग रोखण्याच्या दृष्टीने देशांतर्गत रेल्वे व विमानसेवा काही दिवस थांबवण्याचा निर्णय सरकार घेऊ शकते. महाराष्ट्रातील दैनंदिन कोरोना रुग्णसंख्या पाच हजाराहून अधिक झाल्याने दररोज आढावा आणि दररोज अधिक तपासण्या करण्यावर राज्य सरकारचा भर आहे.











