सातारा : महान्यूज लाईव्ह
पुणे पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत आपल्याला सर्वाधिक मताधिक्य सातारा जिल्ह्यातूनच मिळणार असल्याचा ठाम विश्वास उमेदवार नीता ढमाले यांनी काल (दि.१९) रोजी सातारा येथे पार पडलेल्या पदवीधर मतदार व कार्यकर्ता मेळाव्यात व्यक्त केला.
सातारामधील ग्रीनलँड हॉटेल याठिकाणी हा मेळावा पार पडला. या कार्यक्रमासाठी पाचशेहून अधिक पदवीधर मतदार उपस्थित होते. सातारा हा क्रांतिकारकांचा जिल्हा आहे. गतवेळीच्या पदवीधर आमदारांनी पदवीधरांचे प्रश्न सोडवले नाहीत. कारखानदारांना राजकारणात आणण्यापुरतेच ते पदवीधर निवडणुकीकडे पाहतात. साताऱ्यातील पदवीधर त्यांना कधीही थारा देणार नाहीत. पदवीधर निवडणुकीतील क्रांतीही इथूनच सातारा मधून होईल. असा विश्वास यावेळी नीता ढमाले यांनी व्यक्त केला.
यावेळी फार्मसी पदवीधर संघटनेने नीता ढमाले यांना आपला पाठींबा जाहीर केला. नीता ढमाले या गेल्या अनेक काळापासून आमच्या अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्नशील असून प्रत्येक पदवीधर मतदारांपर्यंत सहजरीत्या पोहोचणाऱ्या त्या एकमेव उमेदवार आहेत अशा प्रतिक्रिया यावेळी पदवीधर मतदारांनी व्यक्त केल्या.










