सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
कोरोनाच्या काळात ग्रामपंचायतीचा शिपाई म्हणून बबन तरंगे यांनी भरपूर काम केले, मात्र या कामाच्या भाऊगर्दीत इतरांना कोरणा होऊ नये म्हणून झटणाऱ्या यांनाच दुर्दैवाने कोरोनाचा संसर्ग झाला आणि या जागतिक महामारीने त्यांचा बळी घेतला.. या घराच्या तरंगे कुटुंबावर कोसळलेल्या दुःखावर फुंकर मारत माजी आरोग्य सभापती प्रवीण माने त्यांनी कुटुंबाला दिलासा दिला.
तरंगवाडी ग्रामपंचायतीत शिपाई व सोनाई डेअरीमध्ये पार्टटाईम कार्यरत असणारे कर्मचारी बबन तरंगे यांचे कोरोनाच्या संसर्गाने निधन झाले. बबन तरंगे हे त्यांच्या घरातील कर्ता पुरुष होते. दिवसरात्र मेहनत करुन आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवणाऱ्या बबन यांच्या जाण्याने तरंगे कुटुंब हादरले.
त्यांच्या कुटुंबाच्या पाठीशी उभे राहणे ही जबाबदारी व सामाजिक बांधिलकी समजत पुणे जिल्हा परिषद बांधकाम व आरोग्य विभागाचे माजी सभापती व जिल्हा परिषद सदस्य प्रविण माने यांनी तरंगे यांच्या मातोश्री कामीनी महादेव तरंगे यांच्याकडे मदत म्हणून दीड लाख रुपयांचा चेक सुपूर्द केला.
बबन तरंगे यांच्या पश्चात आई कामिनी महादेव तरंगे, पत्नी वैशाली बबन तरंगे, ६ महिन्यांचा मुलगा प्रणव व भाऊ अनिल महादेव तरंगे असा परिवार आहे आज बबन तरंगे यांच्या मातोश्रींना चेक देताना तुकाराम तात्या करे माजी उपसरपंच तरंगवाडी, नानासाहेब नरुटे माजी सरपंच शिरसोडी, संतोष तरंगे, गणेश मराडे, अमोल मराडे सर हे मान्यवर उपस्थित होते.











