पुणे : महान्यूज लाईव्ह
बिहारमध्ये माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा करिश्मा दिसून आल्याची प्रतिक्रिया राज्यातील नेते व्यक्त करीत असतानाच ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आपल्या शैलीत फडणवीसांना टोला लगावला आहे. फडणवीस यांनी केलेला हा चमत्कार आपल्याला माहितीच नव्हता. फार चांगली गोष्ट सांगितली तुम्ही असे म्हणत पवार यांनी त्यांची खिल्ली उडवली आहे.
पुण्यातील एका कार्यक्रमानंतर शरद पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. देवेंद्र फडणवीस यांनी बिहारमधील भाजपची धुरा सांभाळल्यामुळे भाजपाचा विजय झाल्याचे महाराष्ट्रातील भाजप नेते सांगत आहेत. यावर शरद पवार यांना प्रतिक्रिया विचारली. त्यावर शरद पवार यांनी आपल्या खास शैलीत देवेंद्र फडणवीस यांची खिल्ली उडवली.
बिहारमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे चमत्कार झाला हे आपल्याला माहितीच नव्हते. बरं झालं तुम्ही फार चांगली गोष्ट सांगितली अशा शब्दांत शरद पवार यांनी फडणवीस यांना टोला लगावला आहे.











