मुंबई : महान्यूज लाईव्ह
नितीन सारडासह रिपब्लिक टीव्ही चा संपादक अर्णव गोस्वामी यासही मुंबई उच्च न्यायालयाने आज जामीन नाकारला. त्यामुळे तातडीने अर्णव गोस्वामी बाहेर येण्याची शक्यता तूर्तास मावळली आहे.
अलिबाग सत्र न्यायालयाकडे रीतसर जामीन अर्ज करावा अशा प्रकारची सूचना करत उच्च न्यायालयाने गोस्वामीची अंतरिम जामीनाची याचिका फेटाळली. याच्या जामीनासंदर्भात शनिवारी उच्च न्यायालयामध्ये सुनावणी झाली होती, मात्र उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने जामिनाची याचिका फेटाळली. न्यायाधीश श्री एस एस. शिंदे व न्यायाधीश एम. एस. कर्निक यांच्या खंडपीठापुढे ही सुनावणी झाली.
अलिबाग येथील व्यवसायिक अन्वय नाईक यांच्या आत्महत्येप्रकरणी अर्णव गोस्वामी यास पोलिसांनी ताब्यात घेतले होते, त्यानंतर अटक केली होती, त्यानंतर अर्नब गोस्वामी यांनी पोलिसांनी मारहाण केल्याचे तसेच कारागृहाच्या पोलिसांनीही मारहाण केल्याचा कांगावा केला होता, मात्र न्यायालयाने या सर्व बाबी फेटाळल्या.










