वालचंदनगर : महान्यूज लाईव्ह
रणगावहून वालचंदनगर मार्गे जाणाऱ्या टेम्पोच्या धडकेत वालचंदनगर कंपनीतील कामगाराचा मृत्यू झाला.
ही घटना वालचंदनगर येथे घडली. शिरसटवाडी येथे राहत असलेला वालचंदनगर कंपनीतील कामगार तुषार रामदास शिरसट ( वय ३२ वर्षे ) हा दुचाकीवरून (गाडी नंबर एम एच १४ ए पी ९७७३ ) कंपनीत सकाळची पहिली शिप्ट सुटल्यानंतर वालचंदनगरहून रणगावमार्गे घरी निघाला होता. दुपारी ३ वाजून २० मिनिटांच्या दरम्यान रणगावकडून वालचंदनगर कडे येणाऱ्या एका छोट्या टेम्पोने
समोरून जोरदार धडक दिली. यात त्याच्या डोक्याला, पायाला गंभीर मार लागल्यामुळे रक्तस्राव सुरू झाला. त्यास स्थानिक नागरिकांनी व कामगारांनी तातडीने येथील खाजगी दवाखान्यात दाखल केले, मात्र जोरदार धडकेमुळे तुषार शिरसट यांचा मृत्यू झाला. पुढील तपास पोलीस करत आहेत.










