महान्यूज लाईव्ह रिपोर्ट
याचा व्हिडीओ येथे पहा, किंवा महान्यूज लाईव्ह फेसबुक पेजवर पाहू शकता…
कमिशनरसाहेब, अहो..अहो.. ते राहू द्या.. अहो काय राव, त्या घंटागाडीचालकांचे सहा महिने पगार नाहीत? अहो, कोरोनाचे संकट सुरू आहे.. अशा काळात त्यांनी काय खायचं हो.. तुमची ती प्रोसेस चालू राहू द्या..मला ते काही सांगू नका.. काहीही करा.. सोमवारी त्यांचे पगार झालेच पाहिजेत..ठेकेदाराच्या चुकीची चालकांना शिक्षा नको.. आपली महापालिकेची चूक नसली, तरी त्यांचे माणूसकी म्हणून पगार झाले पाहिजेत.. ठेकेदारावर काय कारवाई करायची ती करा.. पण मला सोमवारी पगार झाले पाहिजेत, ते सांगा.. या कोरोनाच्या संकटाच्या काळात या गरीबांना उघड्यावर ठेवू नका..` हा फोन होता, सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांचा..
या एका फोनने चालकांनी भरणे यांना हात जोडले..काहीजण जेव्हा पाया पडायला लागले, तेव्हा भरणे यांनी लगेच रोखले..पण तोपर्यंत भरणे यांनी या सर्वांचे मन जिंकले होते..!
सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांचे एक आवडीचे वाक्य आहे, ते म्हणजे घरचा वाढपी असला की जरा झुकते माप मिळतेच.... राज्य मंत्रीमंडळात समावेश झाल्यानंतरही जमीनीवर राहणाऱ्या या नेत्याने मंत्रीपद मिळाले, मात्र जोडीला कोरोनाचे संकट मिळाले, त्याही काळात संकटावर मात करण्यासाठी गावागावात जीवनावश्यक वस्तू पुरवल्या.
महापूराचेही संकट आले, त्यावेळीही आपदग्रस्तांसाठी गावागावात वस्तू पुरवल्या..पण याच भरणेमामांनी कायद्याला मान देत काल लासुर्णे गावात विनमास्क असल्याबद्दल स्वतः दंड भरून कायद्याचा मान राखण्याचा आदर्श दिला आणि त्याचवेळी सोलापूरातील दौऱ्यात घंटागाडी चालकांचा सहा महिने पगार दिलेला नाही हे कळताच एका क्षणात आयुक्तांना फोन लावला आणि लागलीच पगार करण्याच्या सूचनाही दिल्या. उपस्थित सारेच भरणे यांच्याकडे पाहत राहीले, कारण पलीकडून महापालिका आयुक्त ठेकेदाराने केलेल्या चुकीची माहिती देत होते, ठेकेदारावर आपण कारवाई करीत आहोत असे सांगत होते, तेव्हा नेहमीच्या सरकारी पध्दतीला बाजूला सारून ठेकेदारावर कारवाई काय करायची ती करा, आधी माणूसकी दाखवा असे सांगणारा एक मंत्री त्यांनी पहिल्यांदाच पाहिला होता..!
सामान्यातल्या सामान्य लोकांना हा मंत्री आपला वाटतो त्याचे कारण नेमके काय? असे कोडे अनेकदा अनेकांना पडलेले असते, मात्र त्याचे अलगद उत्तर भरणे हे पावलोपावली त्यांच्या कृतीतून देत असतात. सोलापूरात घंटागाडीचालकांनी ते प्रत्यक्ष अनुभवले.











