बारामती : महान्यूज लाईव्ह
पाहता-पाहता बारामती तालुक्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या साडेचार हजारांकडे वाटचाल करू लागली आहे.
कालच्या तपासणीत बारामती तालुक्यात 24 जण कोरोना बाधित आढळून आले आहेत. काल आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये पवार लॅब मध्ये झालेल्या रॅट तपासणीत कण्हेरी येथील 45 वर्षीय रुग्ण कोरोना बाधित आढळून आला आहे.
बारामतीतील शासकीय रॅपिड तपासणीत आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये तांबे नगर येथील 22 वर्षीय महिला, घाडगे वस्ती येथील 25 वर्षीय पुरुष, सोनगाव येथील 36 वर्षीय पुरुष, अवधूत नगर येथील 35 वर्षीय पुरुष, मार्केट यार्ड येथील 38 वर्षीय पुरुष रुग्ण कोरोना बाधित आढळून आला आहे.
बारामतीतील शासकीय आरटीपीसीआर तपासणीत जळोची रोड येथील 32 वर्षे पुरुष, जळोची येथील 74 वर्षीय पुरुष, तावशी येथील 55 वर्षीय पुरुष, बारामती येथील 28 वर्षीय महिला, 50 वर्षीय महिला, 53 वर्षीय महिला, 40 वर्षीय पुरुष, मुक्ती विहार जळोची येथील तीस वर्षीय पुरुष रुग्ण कोरोनाबाधित आढळून आले आहेत.
इंदापूर तालुक्यातील चार जणांचा समावेश
काल बारामतीत झालेल्या विविध तपासण्यांमध्ये इंदापूर तालुक्यातील सणसर येथील 21 वर्षीय युवक, घोरपडवाडी येथील 39 वर्षीय महिला, दहा वर्षीय मुलगा, काझड येथील 37 वर्षीय पुरुष, 32 वर्षीय पुरुष, तावशी येथील 55 वर्षीय पुरुष कोरोनाबाधित आढळून आले आहेत.











