आज रोजी शिवशंभु काळात काय घडलं?
शिवधर्म फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य
१ नोव्हेंबर इ.स.१६७६
“छत्रपती संभाजीराजे” हे त्यांच्या पत्नी “महाराणी येसूबाई साहेब” यांच्यासोबत शृंगारपुरात येउन राहिले.
१ नोव्हेंबर इ.स.१६७८
छत्रपती शिवरायांनी तंजावरच्या उत्तरेकडील मुलुख जिंकला.
१ नोव्हेंबर इ.स.१६७९
केग्वीन मराठ्यांच्या त्रासाने वैतागला आणि त्याने १ नोव्हेंबर १६७९ रोजी मुंबईला जे इतिहासप्रसिद्ध पत्र लिहिले त्याचा हा सारांश – “नागाव नदीच्या मुखाशी नौका ठेवण्याच्या बेताविषयी गेल्या पत्रात आपल्याला कळवले होते त्याप्रमाणे दिवसा ते शक्य नाही आणि रात्री चंद्र मावळेपर्यंत गस्त देऊनही उपयोग नाही कारण शत्रूची गलबते उशिराने येतात व वल्ही मारण्यात त्यांची शिताफी अधिक असल्यामुळे त्या आमच्या हाती लागत नाहीत. आम्ही त्रस्त आहोत. त्यांना अडविण्याच्या बाबतीत आम्ही कसलीही कसूर होऊ देत नाही याची आपण शाश्वती बाळगावी परंतु त्या लहान सरपटणाऱ्या होड्या आम्हाला आश्चर्यकारक रीतीने चकवतात. आता आम्हाला असे वाटू लागले आहे की आमच्याकडेही तशा होड्या असतील तर आम्हाला कदाचित मदत होईल…”
ज्या इंग्रजांना अगोदर वाटले होती की मराठ्यांच्या लहान होड्या आपण काही मोठी गलबते नेवून आरामात बुडवून टाकू, तेच इंग्रज आता वरील पत्र लिहीत होते, या वरून मराठ्यांचा निग्रह, त्यांची जिद्द, त्यांची चिकाटी आणि त्यांची अनोखी युद्धनीती दिसून येते. गनिमी काव्याचा वापर करून ज्या मराठ्यांनी आजवर शत्रुसैन्याला डोंगर-दऱ्यांमधे जेरीस आणले होते त्यांनी तीच युद्धनीती सागरावर अवलंबून बलाढ्य सागरी सत्तेला जेरीस आणले होते.
१ नोव्हेंबर इ.स.१६९२
पन्हाळगडाला बादशहाचा नातू “महंमद मुइनुद्दिन बेदारबख्त” याचा वेढा पडला. यावेळी गडाचे किल्लेदार होते “त्र्यंबकजी इंगळे”. यांनी तब्बल ८ वर्ष किल्ला लढवला.
१ नोव्हेंबर इ.स.१७१८
इंग्रजांचे प्रचंड ताकदीने खांदेरीवर आक्रमण.
१ नोव्हेंबर इ.स.१७९०
लोहगडाच्या महादरवाजाचे काम नाना फडणीसांनी १ नोव्हेंबर १७९० ते ११ जून १७९४ या कालावधीत केले
अधिक माहिती साठी संपर्क…! राज दादा तपसे मो 9145806202 संकलन : राहुल बोरसे पाटील










