इंदापूर : महान्यूज लाईव्ह
एस. सी. आरक्षणाचे वर्गीकरण करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने पंजाब,हरियाणा या राज्याप्रमाणे कायदा करून आरक्षण वर्गीकरणाची केंद्र सरकार कडे शिफारस करावी या प्रमुख मागणी साठी एस सी आरक्षण वर्गीकरण कृती समिती महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने संपुर्ण महाराष्ट्रातून दहा लाख स्वाक्षरीचा संकल्प करण्यात आला आहे,.
स्वाक्षरी मोहिमेचा प्रारंभ उद्या रविवारी (दि. १) इंदापूर येथून होणार आहे, अशी माहिती रिपब्लिकन क्रांती सेनेचे प्रा. बाळासाहेब लोखंडे यांनी दिली.
उद्या रविवारी सकाळी १० वाजता सर्व मातंग बांधव व एस. सी संवर्गातील समाज बांधवांनी पंचायत समिती इंदापूर येथे उपस्थित रहावे त्यानंतर सर्व महापुरुषांच्या पुतळ्याला पुष्प हार अर्पण करून स्वाक्षरी मोहिमेस प्रारंभ करण्यात येणार आहे. आरक्षण वर्गीकरणाचा लढा मजबुत करून यशस्वी करण्याचे आवाहन प्रा. लोखंडे यांनी केले आहे.











