इंदापूर : महान्यूज लाईव्ह
काल इंदापूर तालुक्यातील विविध प्रयोगशाळांमध्ये झालेल्या तपासण्यांमध्ये 135 जणांची तपासणी झाली त्यामध्ये तब्बल 60 जण कोरोनाबाधित आढळून आले, आज इंदापूर तालुक्यात 92 जणांची तपासणी झाली, यामध्ये तब्बल 41 जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. थोडक्यात तपासणीनुसार विचार करता तालुक्यातील कोरोना आढळण्याचे प्रमाण 35 टक्क्यांहून अधिक आहे हे लक्षात घेण्याची गरज आहे.
इंदापूर तालुक्यात आज आढळून आलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये भिगवण येथील 31 वर्षीय पुरुष, शिरसटवाडी येथील 35 वर्षीय पुरुष, वालचंदनगर येथील 21 वर्षीय महिला, 38 वर्षीय पुरुष, 30 वर्षीय महिला, 82 वर्षीय पुरुष रुग्णाचा समावेश आहे.
तालुक्यातील कळंब येथील 21 वर्षीय युवक, रत्नपुरी येथील 68 वर्षीय पुरुष, जंक्शन येथील उद्योजकाच्या कुटुंबातील 11 वर्षीय मुलगा, 10 वर्षीय मुलगा, 22 वर्षीय महिला व गावातील 15 वर्षीय मुलगी कोरोना बाधित आढळून आले आहेत.
निरवांगी येथील 45 वर्षीय महिला, 24 वर्षीय युवक, चिखली येथील 28 वर्षीय महिला, नऊ वर्षीय मुलगा, 29 वर्षीय महिला, 17 वर्षीय महिला, 80 वर्षीय पुरुष, बेलवाडी येथील 30 वर्षीय महिला, 70 वर्षीय महिला, बोरी येथील 34 वर्षीय पुरुष, 31 वर्षीय महिला, निमगाव केतकी येथील 17 वर्षीय मुलगा, 43 वर्षीय पुरुष, 36 वर्षीय महिला, 40 वर्षीय पुरुष, 33 वर्षीय महिला, 30 वर्षीय पुरुष रुग्ण कोरोना बाधित आढळून आले आहेत.
रुई येथील 45 वर्षीय महिला, पिंपरी खुर्द येथील 42 वर्षीय पुरुष, शेळगाव येथील 24 वर्षीय पुरुष, पिंपरी खुर्द येथील 36 वर्षीय महिला, 18 वर्षीय युवक, भादलवाडी येथील 42 वर्षीय पुरुष, 25 वर्षीय महिला, 42 वर्षीय पुरुष, 21 वर्षीय महिला, सहा वर्षीय मुलगी, पन्नास वर्षे पुरुष रुग्णाचा समावेश असून, शेळगाव येथील 28 वर्षीय कोरोनाग्रस्ताचा काल बारामतीत उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.











