• Contact us
  • About us
Tuesday, September 1, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

निळकंठेश्वर पॅनेल निवडून द्या, पाच वर्षे चांगल्या दराची जबाबदारी माझी : अजित पवार

Maha News Live by Maha News Live
February 20, 2020
in शेती शिवार, राजकीय, राज्य, पश्चिम महाराष्ट्र, पुणे
0
निळकंठेश्वर पॅनेल निवडून द्या, पाच वर्षे चांगल्या दराची जबाबदारी माझी : अजित पवार

बारामती : माळेगाव कारखाना चालविणारे भाजपने जेव्हा पाणी बंद केले, तेव्हा का गप्प बसले? सभासदांनी निळकंठेश्वर पॅनेल निवडून द्यावे, पाच वर्षे चांगला दर देण्याची जबाबदारी माझी राहील. निवडणूक झाल्यावर विस्तारीकरणाची चौकशी राज्य सरकारमार्फत केली जाईल असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निरावागज येथे सांगितले.
निळकंठेश्वर पॅनेलच्या प्रचाराच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज निरावागज, सांगवी, पणदरे येथे सभा घेतल्या. यावेळी पवार बोलत होते. यावेळी राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कारखान्याचे संचालकपदाचे उमेदवार उपस्थित होते.
पवार म्हणाले, निरा डाव्या कालव्याच्या पाण्याचा निर्णय जर मी घेतला नसता, तर उन्हाळ्यात धूळधाण झाली असती, सत्कारावेळीच मी सारे काही योग्य करेन असे म्हटले होते, त्या पध्दतीने केले. अर्थात फलटण, पंढरपूर, माळशिरस, सांगोला कोणत्याही तालुक्यावर अन्याय केलेला नाही. आम्ही समन्यायी निर्णय घेतला. सूत्रे असताना शेजारधर्मही पाळायचा असतो. सर्वांना सारखा न्याय द्यायचा असतो. आता जे कारखाना चालवतात, त्यांनी तुमचे पाणी बंद केले होते. निरा डाव्या कालव्याचे पाणी काढून घेतले, तरी यांच्या तोंडून ब्र निघाला नाही. ते का बोलले नाहीत. पालकमंत्री चंद्रकांत पाटलांकडे गेले नाहीत. भाजपवाल्यांना हार हेच घालत होते. तेच पाणी भाजपवाल्यांनी बंद केले, तेव्हा का बोलला नाहीत? राष्ट्रवादी काँग्रेस हा महाआघाडीत असल्याने हा निर्णय आपण घेऊ शकलो. अर्थात या निर्णयातून त्यांनाही पाणी मिळणार आहे. जर वितरीका सुटल्या नाहीत, तर आज कोणाच्या विहीरीत पाणी आहे काय? भाजपवाल्यांच्या कल्पना होत्या की, बंद पाईपने पाणी आणायचे, बंद पाईपने पाणी आणले, तर पाणीच कोठेही पाझरणार नाही. असले विचार यांचे आहेत. त्यामुळे तुम्ही माळेगाव ताब्यात द्या, जिथे चुका झाल्या आहेत, त्या दुरुस्त करू. ज्यूस, सिरप वाहून जाणार नाही याची काळजी घेतली जाईल. माळेगावचे विस्तारीकरण झाले, मग कारखाना फक्त 7 हजारांनीच का चालतो? माळेगावचा सरासरी 10.49 टक्के सरासरी उतारा व सोमेश्वरचा साखर उतारा 11.43 टक्के आहे. माळेगावात एका टनामागे 10 किलो साखर कमी मिळते. चंद्रराव अण्णा व रंजन तावरे यांनी हे लक्षात घ्यावे की, साखरेचा 9 किलोचा फरक असेल तर जवळपास एका टन उसालाच 270 रुपयांचा फटका बसतो. अण्णांनी व रंजन पाटलांनी कितीही सांगावे, पण सगळी सोंगे करता येतात, पैशाचे सोंग करता येत नाही.
माळेगावचा कारभार चुकीचा चालला आहे. माझे या कारखान्यावर कांडके जात नाही. मात्र माझ्यावर जो विश्वास ठेवला आहे, त्याचा लोकप्रतिनिधी म्हणून माझे काम आहे की, चुकीचे होत असेल तर सांगितले पाहिजे. सहवीजनिर्मिती व डिस्टीलरीत काय चाललेय हे सांगायची गरजच नाही. माळेगावमध्ये ज्या सहकारी संचालकांना अपात्र करवले, त्यांची चौकशी राज्य सरकारमार्फत लावणार आहे. माझी चौकशी लावली, आम्ही कधी विरोधी पक्षात होतो, म्हणून म्हटलो नाही. आम्हीपण खरेदीची चौकशी लावणार आहोत. विस्तारवाढ कशी झाली याचीही चौकशी आम्ही लावणार आहोत.
पुरूषोत्तम जगताप म्हणाले, माळेगावने दिलेला दर हा फसवा आहे. सोमेश्वरने जाहीर केल्यानंतर हा दर जाहीर केला. सोमेश्र्वरने 20 कोटींचा राखीव निधी ठेवून आपला दर जाहीर केला. मात्र माळेगावचा दर निवडणूकीसाठी दिल्याचे दिसून येते. माळेगावचा साखर उतारा हा सोमेश्वरपेक्षा अधिक असायला हवा होता. कारण सोमेश्वरमध्ये 90 टक्के ऊस हा फुले 265 जातीचा असतो. मात्र तरीदेखील माळेगावचा साखर उतारा कमी का याचा विचार करायला हवा. सोमेश्वरची डिस्टीलरी 30 हजार लिटर प्रतिदिन उत्पादन क्षमतेची असूनही माळेगावच्या 60 हजार लिटर क्षमतेच्या डिस्टीलरीएवढे उत्पन्न मिळवते, मग गणित कोठे बिघडते असा प्रश्न पडतो.

माजी अध्यक्ष बाळासाहेब तावरे यांनीही विद्यमान सत्ताधार्‍यांच्या कारभारावर कडाडून टिका केली. सभासदांच्या हिताची जपणून न करता या सत्ताधार्‍यांनी स्वत:चा स्वार्थच अधिक पाहिल्याचे त्यांनी सांगितले. मिथुन आटोळे यांच्यासह राष्ट्रवादीच्या विविध पदाधिकार्‍यांची यावेळी भाषणे झाली.

माझी गंमत करू नका..मी सहन करणार नाही.

अजित पवार म्हणाले, मी जवळच्या कार्यकर्त्यांसाठी सांगतो की, कार्यकर्त्यांनो, मागील निवडणूकीवेळी काही चुका आपल्यातच झाल्या, आता मात्र गंमत करू नका. 44 बुथ आहेत. बुथवाईज मतदान कळणार आहे. ज्यांना उघड करायचे आहे, त्यांनी उघड मतदान करावे. दिवसा इकडे, रात्रीच्या वेळी तिकडे केले, तर कोणाची गंमत ऐकणार नाही. काही जणांना निवडून आणण्यासाठी आम्ही पण रात्रीचा दिवस केला आहे. 30 वर्षे मी सर्वांचे ऐकत आलोय. राष्ट्रवादीच्या कोणीही जरी गडबड केली, तरी त्याला माफ करणार नाही. राष्ट्रवादीच्या घड्याळावर निवडून येऊन जर गद्दारी केली, तर त्याला माफ नाही. सभासदांना आम्ही विनंतीच करू. मात्र जे पदाधिकारी राष्ट्रवादीचे असूनही दुसरा मार्ग निवडतील, त्यामध्ये अगदी तालुकाध्यक्ष संभाजी होळकरांचे जरी चुकले, तरी त्यांनाही माफी नाही.

Tags: Ajit PawarMalegaon Karkhana Elections NCPNilkantheshwar Panel
Next Post
टायगर अभी जिंदा है…

टायगर अभी जिंदा है...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालखी मार्गावरील अपघात : मृत वारकऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाखांची मदत; जखमींवर मोफत उपचाराची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची सूचना!

पालखी मार्गावरील अपघात : मृत वारकऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाखांची मदत; जखमींवर मोफत उपचाराची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची सूचना!

July 13, 2026
पालखी मार्गावर कसा झाला भीषण अपघात? ट्रकखाली कसे चिरडले वारकरी?

पालखी मार्गावर कसा झाला भीषण अपघात? ट्रकखाली कसे चिरडले वारकरी?

July 13, 2026
जेजुरीजवळ भीषण अपघात; टेम्पोच्या धडकेत तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू, तीन जखमी

जेजुरीजवळ भीषण अपघात; टेम्पोच्या धडकेत तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू, तीन जखमी

July 13, 2026
शॅम्पूपासून दूध, डिटर्जंटचा फेस अन् आरोग्याशी खेळ; फलटण तालुक्यातील होळमध्ये FDAचा दणका!

शॅम्पूपासून दूध, डिटर्जंटचा फेस अन् आरोग्याशी खेळ; फलटण तालुक्यातील होळमध्ये FDAचा दणका!

July 13, 2026
उद्यापासून पावसाळी अधिवेशन; सरसकट कर्जमाफी, दुष्काळाचे सावट, विषारी दारूकांड, वाढत्या गुन्हेगारीवरून सरकारची कसोटी

पुणे जिल्ह्यातील बावडा, सणसरसह चार मंडळ महसूल अधिकाऱ्यांचे निलंबन; बोगस व अनियमित नोंदी प्रकरणी महसूल विभागाची मोठी कारवाई

July 12, 2026
मोशी कचरा डेपो दुर्घटना : ९ कामगारांना जीव गमवावा लागला..जखमी कामगारांची सुप्रिया सुळेंकडून रुग्णालयात भेट; निष्काळजीपणाला जबाबदारांवर कठोर कारवाईची मागणी!

मोशी कचरा डेपो दुर्घटना : ९ कामगारांना जीव गमवावा लागला..जखमी कामगारांची सुप्रिया सुळेंकडून रुग्णालयात भेट; निष्काळजीपणाला जबाबदारांवर कठोर कारवाईची मागणी!

July 12, 2026
आमदार रोहित पवार यांच्या शेतकरी कर्जमाफीच्या संघर्षाची यशोगाथा

आमदार रोहित पवार यांच्या शेतकरी कर्जमाफीच्या संघर्षाची यशोगाथा

July 12, 2026
नववीतील विद्यार्थिनीने दिला बाळाला जन्म; नाशिकमधील आश्रमशाळेत धक्कादायक प्रकार!

नववीतील विद्यार्थिनीने दिला बाळाला जन्म; नाशिकमधील आश्रमशाळेत धक्कादायक प्रकार!

July 11, 2026
बारामती तालुक्यातील ५३ ग्रामपंचायतींची रणधुमाळी; १२ जून रोजी सदस्य आरक्षण सोडत!

SIR आणि गुरुजी आडवे आले? १३ हजार ग्रामपंचायतींच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर?  मतदार पुनरीक्षण (SIR) मुळे जानेवारीनंतरच बिगुल वाजण्याचे संकेत!

July 11, 2026
बारामतीतील सायबर गुन्हेगारीची चौथी घटना! आणखी दोघांची 68 लाखाची फसवणूक!

कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर हल्ला; सहा जणांसह इतरांविरुद्ध गुन्हा, कठोर कारवाईचा इशारा

July 10, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group