बारामती : महान्यूज लाईव्ह
काल बारामतीतील विविध तपासण्यांमध्ये 26 जण कोरोनाग्रस्त आढळले आहेत. पाठीमागील महिन्यामध्ये एका दिवसाचा शंभरावर पोचलेला आकडा जरी आता तुलनेने कमी दिसत असला, तरी कोरोनाचा प्रभाव पूर्ण कमी झालेला नाही हे आजचे चित्र दाखवत आहे. जशा तपासण्या वाढतील, तसे कोरोनाचे प्रमाण वाढलेले दिसत आहे. त्यामुळे कोरोनाचा टक्का कमी झाला आहे, असे मानता येणार नाही.
काल देखील 194 जणांची तपासणी झाली त्यामध्ये 26 जण कोरोनाग्रस्त आढळले आहेत. त्यामुळे प्रमाण कमी झाले आहे तरी देखील एकूण तपासण्यांमध्ये 15 टक्के हून अधिक प्रमाण आहे, ही नोंद घेण्याची बाब आहे. 25 ऑक्टोबर रोजी बारामती तालुक्यात फक्त चार जण आढळले होते, परंतु त्या दिवशी बारामती तालुक्यात फक्त 31 जणांची तपासणी झाली होती, त्यामुळे कोरोनाबाबत अजूनही विचार करण्यासारखी बाब आहे.
बारामती तालुक्यात काल शासकीय आरटीपीसीआर तपासणीत मेखळी येथील 43 वर्षीय पुरुष, सायली हिल येथील 26 वर्षीय महिला, सांगवी येथील 45 वर्षीय पुरुष, काटेवाडी येथील 49 वर्षीय पुरुष, चिंचकर इस्टेट येथील 3 वर्षीय मुलगा, सावंतवाडी येथील 52 वर्षीय पुरुष, 48 वर्षीय महिला, तांदूळवाडी येथील 50 वर्षीय महिला रुग्ण कोरोनाबाधित आढळून आले आहेत.
बारामती तालुक्यात काल झालेल्या शासकीय रॅपिड अँटीजेन तपासणीत आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये जैनकवाडी येथील 32 वर्षीय पुरुष, निरावागज येथील 52 वर्षीय पुरुष, ढेकळवाडी येथील 49 वर्षीय पुरुष, सोमेश्वरनगर येथील 38 वर्षीय पुरुष, सिद्धार्थनगर येथील 50 वर्षीय महिला, सायली हिल येथील 38 वर्षीय पुरुष, निंबुत येथील 17 वर्षीय युवक, जैनकवाडी येथील 12 वर्षीय मुलगा, बयाजी नगर येथील 32 वर्षीय पुरुष रुग्ण कोरोना बाधित आढळून आले आहेत.
बारामतीत काल मंगल लॅबरोटरी येथे तपासलेल्या आरटीपीसीआर तपासणीत देवळे पार्क येथील 30 वर्षीय महिला, पाटस रोड साफिया व्हिला येथील 57 वर्षीय पुरुष, महती कॉम्प्लेक्स श्रीराम नगर येथील 35 वर्षीय महिला व 64 वर्षीय महिला, तर तालुक्यातील सोमेश्वरनगर येथील 32 वर्षीय पुरुष रुग्ण कोरोना बाधित आढळून आले आहेत.
मंगल लॅबरोटरी येथे काल तपासलेल्या रॅपिड अँटीजेन तपासणीत आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये तांबेनगर येथील 46 वर्षीय पुरुष, स्टेशन रोड येथील 27 वर्षीय पुरुष व 24 वर्षीय महिला कोरोनाबाधित आढळून आले आहेत.











