इंदापूर : महान्यूज लाईव्ह
इंदापूर तालुक्यात आज 109 जणांची तपासणी झाली, यामध्ये बावीस जण कोरोना बाधित आढळून आले आहेत. काल दसरा संपताच 26 जण कोरोनाबाधित आढळून आले होते, आज पुन्हा 22 जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. महत्त्वाचे म्हणजे तब्बल 109 जणांची लक्षणे असल्यामुळे तपासणी करण्यात आली आहे, त्यामुळे कोरोनाचे संकट अजूनही कायम आहे.
आज (ता. 27) आढळून आलेल्या कोरोनाग्रस्त मध्ये कळंब येथील 55 वर्षीय महिला, रणगाव येथील 28 वर्षीय महिला, साठ वर्षीय पुरुष, वडापुरी येथील 91 वर्षीय पुरुष, निमगाव केतकी येथील 42 वर्षीय महिला, 55 वर्षीय पुरुष, 23 वर्षीय पुरुष, 42 वर्षीय महिला, 40 वर्षीय महिला रुग्ण कोरोना बाधित आढळून आले आहेत.
न्हावी येथील तीस वर्षीय महिला, 35 वर्षीय पुरुष, 13 वर्षीय मुलगी, दहा वर्षीय मुलगा, 16 वर्षीय मुलगा, 25 वर्षीय पुरुष, तर थोरात वाडी येथील बारा वर्षीय मुलगा, 13 वर्षीय मुलगी, 42 वर्षीय पुरुष व 65 वर्षीय पुरुष कोरोनाबाधित आढळून आले आहेत.
बावडा येथील 27 वर्षीय पुरुष, 65 वर्षीय महिला, वालचंदनगर येथील 36 वर्षीय पुरुष, माळवाडी नंबर 2 येथील 60 वर्षीय पुरुष, भिगवण येथील 35 वर्षीय पुरुष, वडापुरी येथील 35 वर्षीय पुरुष रुग्ण कोरोनाबाधित आढळून आले आहेत.











