• Contact us
  • About us
Sunday, October 18, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

माळेगावच्या सत्ताधार्‍यांनी सभासदांच्या खिशाला 300 रुपयांची कात्री लावली : सुरेश खलाटे

Maha News Live by Maha News Live
February 19, 2020
in शेती शिवार, राजकीय, पश्चिम महाराष्ट्र, पुणे
0
माळेगावच्या सत्ताधार्‍यांनी सभासदांच्या खिशाला 300 रुपयांची कात्री लावली : सुरेश खलाटे

बारामती : महान्यूज लाईव्ह
माळेगाव सहकारी साखर कारखान्यातील विद्यमान सत्ताधारी राज्यातील पहिल्या क्रमांकाचा दर दिल्याची टिमकी मिरवत आहेत. वास्तवात 3400 रुपये हा पहिल्या क्रमांकाचा दर नसून सभासदांना 3800 रुपयांपर्यंत दर मिळायला पाहिजे होता. असे असताना केवळ सभासदांना अधिकचे पैसे मिळतात हे खुपत असल्याने विद्यमान सत्ताधार्‍यांनी सभासदांच्या खिशाला तब्बल 300 रुपयांची कात्री लावल्याची घणाघाती टिका श्री निळकंठेश्वर पॅनलचे उमेदवार व विद्यमान संचालक सुरेश खलाटे यांनी केली.
श्री निळकंठेश्वर पॅनलच्या प्रचार दौर्‍यादरम्यान पाहुणेवाडी येथे बोलताना सुरेश खलाटे यांनी विद्यमान सत्ताधार्‍यांच्या कारभाराचा भांडाफोड केला. यावेळी माळेगाव कारखान्याचे माजी अध्यक्ष बाळासाहेब तावरे, बाजार समितीचे संचालक सुनिल पवार, दूध संघाचे माजी अध्यक्ष सतीश तावरे, अविनाश देवकाते, नितीन शेंडे यांच्यासह सर्व उमेदवार, पदाधिकारी उपस्थित होते.
माळेगाव कारखान्याच्या विद्यमान सत्ताधार्‍यांसोबत आम्ही 2007 पासून काम केले. वेगवेगळी आंदोलने, मोर्चे यात सहभाग घेऊन सत्ताधार्‍यांना बळ देण्याचा प्रयत्न केला. असे असतानाही त्यांनी ऐनवेळी आमच्याशी दगाफटका केला. आम्ही साथ देऊन त्यांनी आम्हाला सोडले नाही, तर सभासदांना कसे सोडतील असा सवाल उपस्थित करुन सुरेश खलाटे म्हणाले, आम्ही त्यांच्यासोबत आंदोलन करताना अनेक खटले दाखल झाले. दिवसाचा खर्च भागवण्याची भ्रांत असणारे लोकही यात सामील झाले. मात्र सत्तेत आल्यानंतर या गुरुशिष्यांनी त्यांच्याकडे ढुंकूनही बघितले नाही. आम्ही संचालक असताना आम्हालाही जाणिवपूर्वक बाजूला ठेवले गेले. संपूर्णपणे मनमानी कारभार करुन ही जोडी हुकुमशाही पद्धतीने वागली.
विद्यमान सत्ताधारी सहकार बचाव पॅनलद्वारे निवडणुक लढवत आहेत. वास्तवात सहकार नेमका कोणापासून वाचवायचा हा सवाल आमच्या मनात आहे. सहकाराच्या नावाखाली शेतकर्‍यांची शुद्ध फसवणुक करण्याचे काम या लोकांनी केले. त्यामुळेच त्यांची साथ सोडून आम्ही श्री निळकंठेश्वर पॅनलला साथ दिल्याचेही सुरेश खलाटे यांनी सांगितले. सत्ताधार्‍यांना साखर निर्यात अनुदानाची रक्कम केंद्र सरकारकडून मिळवता येत नाही. परंतू यांच्या गप्पा मात्र मोठमोठ्या असतात. एकूणच काय तर शेतकर्‍यांच्या डोळ्यात निव्वळ धूळफेक करण्याचे काम या सत्ताधार्‍यांनी केले आहे. त्यामुळे आता त्यांच्या जाणिवपूर्वक केलेल्या चूकांची शिक्षा देण्याची वेळ आली असून निळकंठेश्वर पॅनलच्या सर्व उमेदवारांना बहुमताने निवडून देऊन पारदर्शी कारभाराला साथ द्यावी असे आवाहन खलाटे यांनी केले.
विद्यमान सत्ताधारी काटकसरी कारभार करत असल्याचे सांगतात. मात्र प्रत्यक्षात कसलीही काटकसर झालेली नाही. उलट यांच्या मनमानीचा शेतकर्‍यांच्या खिशावर भार पडला असल्याचे सांगून उमेदवार अनिल तावरे यांनी गुरुशिष्यांनी कारखान्याची अक्षरश: वाट लावल्याची टिका केली. कारखान्याचे फसलेले विस्तारीकरण, डिस्टीलरी, सहवीजनिर्मिती प्रकल्पांची झालेली पिछेहाट अशा मुद्यांना हात घालतानाच त्यांनी कारखान्याच्या विस्तारीकरणानंतर झालेली वाताहत सभासदांसमोर विषद केली.
माळेगाव कारखान्याने केवळ साखर आणि अल्कोहोलवर अवलंबून न राहता उपपदार्थ निर्मितीकडे लक्ष देण्याची सुचना शरद पवार यांनी केली होती. त्यानुसार सहवीजनिर्मिती प्रकल्पाची उभारणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र त्यावेळी आताच्या अध्यक्षांनी कारखान्यावर मोठे कर्ज होईल, कारखाना व्यवस्थित चालणार नाही, संचालकांना पदर पैसे द्यावे लागतील अशी भिती दाखवत या प्रकल्पाला विरोध केला. इतकेच नव्हे तर त्यांनी खरेदीदिवशीच उच्च न्यायालयात धाव घेऊन या प्रकल्पाला स्थगिती मिळवत पवारसाहेबांचा अपमान केला. तेच रंजन तावरे सत्तेत आल्यानंतर या प्रकल्पाबाबत दुटप्पी भुमिका घेत सभासदांची दिशाभूल करतात. हे बदलण्याची आता वेळ आली आहे. त्यामुळे सभासदांनी निळकंठेश्वर पॅनलला साथ द्यावी असे आवाहन राष्ट्रवादीचे माजी तालुकाध्यक्ष नितीन शेंडे यांनी यावेळी केले.

Tags: Ajit PawarBaramatiChandrarao TawareMalegaon Karkhana Elections NCPNilkantheshwar Panel
Next Post
अजित पवारांच्या निर्णयाचा मोठा दिलासा…

अजित पवारांच्या निर्णयाचा मोठा दिलासा...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उजनीच्या जीवात अखेर जीव आणला.. पुरूज्जीवन देशी माशांचे! ‘बीएनएचएस’च्या प्रयत्नांना यश; खदऱ्या म्हणजेच महाशीरसह नामशेष माशांचे ऐतिहासिक पुनरागमन!

उजनीच्या जीवात अखेर जीव आणला.. पुरूज्जीवन देशी माशांचे! ‘बीएनएचएस’च्या प्रयत्नांना यश; खदऱ्या म्हणजेच महाशीरसह नामशेष माशांचे ऐतिहासिक पुनरागमन!

October 15, 2026
उजनीच्या कार्यक्षेत्रातील संभाव्य डेटा सेंटर.. हवे की नको? पाण्याच्या अतिमत्त्वाच्या प्रश्नावर राजेंद्र पवार यांचे परखड मत..!

उजनीच्या कार्यक्षेत्रातील संभाव्य डेटा सेंटर.. हवे की नको? पाण्याच्या अतिमत्त्वाच्या प्रश्नावर राजेंद्र पवार यांचे परखड मत..!

October 15, 2026
कृषिमंत्री दत्तात्रय भरणे आज बारामती आणि पुरंदर तालुक्यातील पीक परिस्थितीची पाहणी करणार!

आधीच दुष्काळ.. त्यात खताच्या दरवाढीचा तेरावा महिना! शेती आणि शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले..!

October 15, 2026
दौंड तालुक्यातील जिराईत पट्ट्यात पाण्याचे भीषण संकट; रोटीत लोकवर्गणीतून कालवा दुरुस्त करूनही गाव पाण्यापासून वंचित!

दौंड तालुक्यातील जिराईत पट्ट्यात पाण्याचे भीषण संकट; रोटीत लोकवर्गणीतून कालवा दुरुस्त करूनही गाव पाण्यापासून वंचित!

October 15, 2026
श्री छत्रपती कारखान्यात पहिल्या ५ साखर पोत्यांचे उत्साहात पूजन; १२ लाख टन गाळपाचे उद्दिष्ट!

श्री छत्रपती कारखान्यात पहिल्या ५ साखर पोत्यांचे उत्साहात पूजन; १२ लाख टन गाळपाचे उद्दिष्ट!

October 15, 2026
जिजाऊ सेवा संघाच्या नवरात्र पाककला स्पर्धेत डॉ. योगिता शिंदे व सोनाली नेवसे यांची बाजी!

जिजाऊ सेवा संघाच्या नवरात्र पाककला स्पर्धेत डॉ. योगिता शिंदे व सोनाली नेवसे यांची बाजी!

October 14, 2026
पुणे जिल्ह्यातून सुका व ओला चारा वाहतुकीवर बंदी; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी

पुणे जिल्ह्यातून सुका व ओला चारा वाहतुकीवर बंदी; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी

October 14, 2026
भीमा पाटस साखर कारखान्यावर साखर वाहतूक ठप्प! शेतकरी संघटनेच्या आंदोलनाचा धसका!

भीमा पाटस साखर कारखान्यावर साखर वाहतूक ठप्प! शेतकरी संघटनेच्या आंदोलनाचा धसका!

October 14, 2026
राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिवाळी पूर्वी प्रत्येकी पाच हजार रुपयांची मदत!

राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिवाळी पूर्वी प्रत्येकी पाच हजार रुपयांची मदत!

October 14, 2026
श्रद्धेचा बाजार की माणुसकीचा अंत? नवरात्रीच्या सोवळ्यापायी जन्मदात्यांनी पोटच्या मृत बाळाला नाकारले; स्मशानभूमीतील देवदूतांनी दिला मायेचा निरोप

श्रद्धेचा बाजार की माणुसकीचा अंत? नवरात्रीच्या सोवळ्यापायी जन्मदात्यांनी पोटच्या मृत बाळाला नाकारले; स्मशानभूमीतील देवदूतांनी दिला मायेचा निरोप

October 14, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group