• Contact us
  • About us
Monday, June 8, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

कथा बापलेकाच्या राजीनाम्याची!

Maha News Live by Maha News Live
October 21, 2020
in यशोगाथा, सामाजिक, शिक्षण, शेती शिवार, आरोग्य, राज्य, लाईव्ह, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, व्यक्ती विशेष, Featured
0

संपत मोरे, सांगली

इंद्रजित देशमुख यांचे गाव सांगली जिल्ह्यातील माहुली. माहुली सांगली जिल्ह्यात असले तरी ते सांगली जिल्ह्याच्या शेवटी आहे. देशमुख साहेब जिथं राहतात त्या मळ्यातून आपल्याला सातारा जिल्हा दिसतो.विठ्ठलराव देशमुख हे इंद्रजित साहेबांचे चुलते.त्यांना माहुलकर दादा या नावाने ओळखले जाई. सांगली जिल्ह्याच्या राजकारणात दबदबा असलेले दादा.

आमदार दत्ताजीराव देशमुख (महाराज)हे देशमुख साहेबांचे वडील.संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याच्या वेळी संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे म्हणून महाराजांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला होता. पुन्हा झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांना लोकांनी बिनविरोध निवडून दिले होते. हा राजीनामा आमच्या पिढीला माहिती नाही. कारण कोणीही हा नोंदवून ठेवलेला नाही आणि तो काळ बातम्यांचा नव्हता. ही गोष्ट आज झाली असती तर दिवसभर पट्ट्या येत राहील्या असत्या.

आमदार दत्ताजीराव देशमुख यांनी दिलेला राजीनामा पुन्हा आठवला जेव्हा इंद्रजित देशमुख यांना बदलीसाठी पैसे मागितले म्हणून आपल्या नोकरीचा राजीनामा दिला.


वडिलांनी महाराष्ट्रासाठी राजीनामा दिला तर मुलाने भ्रष्टव्यवस्थेला शरण जायचं नाही म्हणून राजीनामा दिला.. राजीनामा देणारे आमच्याच तालुक्यातील सुपूत्र…

माहुलकर देशमुखांच्या घराचे आमच्या जुन्या तालुक्याच्या विकासात मोठे योगदान.शाळगावपासून ते पळशी आणि बलवडीपासून ते भुडपर्यंतचा हा मोठा तालूका. या तालुक्यातील प्रत्येक गावात माहुलकर दादांचा गट. गावोगावी शाळा उभारण्यात आणि एसटी सुरू करण्यात दादांचा पुढाकार. आमच्या गावची मराठी शाळा सुरू केल्याचा लोक सांगतात. माहुलकर दादा यांचे भाऊ दत्ताजीराव देशमुख आमदार झाले. तेव्हा संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याला जोर आलेला. बेळगाव निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे ही घोषणा गावोगावी गर्जत होती याच काळात खानापूरचे आमदार दत्ताजीराव देशमुख यांनी राजीनामा दिला. कसलाही विचार न करता त्यांनी पक्षाकडे राजीनामा दिला. केवढा मोठा त्याग.. आज आमदार होण्यासाठी केली जाणारी धडपड पाहिली तर ही गोष्ट खुप मोठी आहे.

याच घराण्यातील समर्थ वारसा इंद्रजित देशमुख यांनी चालवला.समाजकारणात आले. कराडला गटविकास अधिकारी असताना त्यांनी प्रबोधनला सुरुवात केली. गावागावात गेले. ग्रामस्वच्छता अभियान, व्यसनमुक्ती, माणुसकी या विषयावर त्यांनी इतिहासाचे दाखले देत प्रबोधन केले. मी देवराष्ट्र गावात साहेबांचे भाषण पहिल्यांदा ऐकले. त्यांनी सांगितलेली यशवंतराव चव्हाण साहेबांची शाळेतील गोष्ट आजही आठवते. ‘वर्गात जेव्हा अधिकारी येतात आणि प्रत्येक मुलाला विचारतात.’तुला कोण व्हायचं आहे?’एक मुलगा उत्तर देतो.

‘मला यशवंतराव चव्हाण व्हायचे आहे..’हे सांगितल्यावर देवराष्ट्र गावच्या त्या पटांगणात झालेला कडकडाटचा आजही आवाज येतो.
इंद्रजित देशमुखांच्या भाषणांनी शेकडो लोक बदलले. आईच्या हातची भाकरी खायचं सोडून धाब्यावर जाणारी पोर कमी झाली.व्यसनात अडकलेले कितीतरी लोक व्यसनमुक्त झाले. ज्या गावात इंद्रजित देशमुख गेले त्या गावात बदल झाले. ज्या गावात ते गेले नाहीत त्या गावात त्यांची कॅसेट गेली. सायंकाळच्या सुमारास त्यांची कॅसेट वाजू लागली. त्यांचा तो आवाज आणि कळकळीचं बोलणं लोकांना भिडू लागलं. माणसं बदलली.

ग्रामसेवक प्रशिक्षण महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून काम करताना त्यांनी ज्या बॅचला ज्या पद्धतीने धडे दिले ते अनुभव ग्रामसेवक मंडळीच्या कडून ऐकण्याची गरज आहे. प्रशिक्षणच्या शेवटच्या दिवशी ग्रामसेवक निरोप घेताना अक्षरशः रडायचे. एवढा लळा लागलेला असायचा. साहेब पुण्यात आले. यशदा मध्ये त्यांची व्याख्याने ऐकण्याचा योग् आला. जेव्हा लेक्चर संपायचं तेव्हा हॉल शांत व्हायचा. हे मी बघितलंय. इथं त्यांनी शेकडो लोकांना लेक्चर दिलं. विचारांना दिशा दिली.

इंद्रजित देशमुख पुण्यात उपायुक्त असताना विधानभवनात मी त्यांना भेटायला गेलो होतो. आमचं बोलणं झालं. त्यांच्याही ऑफीसची वेळ संपली. मला ते म्हणाले,”मला एक ठिकाणी जायचं आहे. सोडता का?

मग मी मोटरसायकलवरून त्याना सोडायला गेलो. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांचा व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित केला होता. प्रवेशद्वारावर क्लास वन अधिकारी त्यांची प्रतीक्षा करत उभा होते आणि आम्ही मोटरसायकलवरून गेलेलो होतो. उपायुक्त असणारा हा माणूस. सुसंस्कृत घराण्यातून आलेला. कधीकाळी तालुक्यातील राजकीय शक्तिकेंद्र असलेलं माहुलकर घराणं. पण इंद्रजित देशमुख यांच्या वागण्यात मात्र कमालीचा साधेपणा. म्हणून हा माणूस भावतो. तत्वासाठी नोकरीचा राजीनामा देऊन बाहेर पडलेला हा बाणेदार माणूस संयुक्त महाराष्ट्राच्या लढयात आमदारकीचा राजीनामा देणाऱ्या महाराजांचा वारसदार म्हणून शोभतो.
इंद्रजित देशमुख यांचा आज वाढदिवस..! त्यांना शुभेच्छा देताना त्यांच्या वाणीतून महाराष्ट्रातील तरुणाईला उर्जा मिळावी. दिशा मिळावी ही अपेक्षा आहे.

Next Post
छत्रपती मध्ये आजपासून अजित पवारांच्या मार्गदर्शनाखाली  जाचक अध्याय सुरू..; १७ वर्षानंतर आज `छत्रपती`त सुखद घटना घडणार

छत्रपती कारखान्याने कामगार आणि सभासदांच्या एफआरपी बाबत घेतला महत्वाचा निर्णय..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

May 29, 2026
मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

May 29, 2026
पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

May 29, 2026
गुप्तधनाचा बहाणा… प्राध्यापकाचा बळी; ४० दिवसांनी उघडली खुनी खेळी!

अवैध मुरूम उत्खननाची तक्रार केल्याने तक्रारदारावर जीवघेणा हल्ला! दौंड तालुक्यातील हिंगणीगाडा येथील घटना! तिघांवर गुन्हा!

May 29, 2026
राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

May 29, 2026
बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

May 29, 2026
शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

May 29, 2026
बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

May 29, 2026
‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

May 29, 2026
बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांचा मोठा भांडाफोड; तुकाराम मुंढेंची राज्यभर पडताळणी मोहीम! 10 हजार 922 कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू; 316 जणांवर कारवाई!

माफी मागून सक्तीची निवृत्ती घ्या!बनावट दिव्यांग प्रमाणपत्रांवर न्यायालयाचा मोठा दणका; राज्यभर १२० दिवसांत पुनर्पडताळणीचे आदेश

May 29, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group