बारामती: महान्यूज लाईव्ह
बारामतीतील कोरोनाचा आलेख आता हळूहळू खाली येऊ लागला असून नागरिकांना दिलासा मिळू लागला आहे आज देखील बारामतीमध्ये कोरोना ग्रस्तांची संख्या 25 च्या दरम्यान राहिली.
बारामती मध्ये काल झालेल्या वेगवेगळ्या तपासण्यांमध्ये आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये समर्थ नगर येथील 70 वर्षीय पुरुष, तुळजाराम चतुरचंद कॉलेज रोड येथील 40 वर्षीय पुरुष, ओझर्डे कॉम्प्लेक्स येथील 18 वर्षीय युवक, 13 वर्षीय युवती, पतंगशहा नगर येथील 42 वर्षीय पुरुष, 40 वर्षीय महिला, कसबा येथील तीस वर्षीय पुरुष, वाणेवाडी येथील वीस वर्षीय महिला, 15 वर्षीय मुलगी व 53 वर्षीय पुरुष रुग्ण कोरोना बाधित आढळून आले आहेत.
बारामतीतील शासकीय रॅपिड तपासणीमध्ये सदोबाची वाडी येथील 52 वर्षीय महिला पाहुणेवाडी येथील 42 वर्षीय पुरुष जळोची येथील 28 वर्षीय पुरुष व जंक्शन येथील तीस वर्षीय पुरुष रुग्ण कोरूना बाधित झाले आहेत
बारामतीतील मंगल लॅबरोटरी येथे तपासलेल्या रॅपिड अँटीजेन तपासणीत आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये नेवसे रोड येथील 30 वर्षीय पुरुष, एसटी स्टँड मागे 42 वर्षीय पुरुष सूर्यनगरी इंदू बंगला येथील 19 वर्षीय युवक, 13 वर्षीय मुलगा, 47 वर्षीय पुरुष, मार्केट यार्ड शेजारील उन्मेश बंगला येथील 40 वर्षीय महिला, 65 वर्षीय पुरुष, रुई पाटी येथील 48 वर्षीय महिला, तपोवन कॉलनी येथील तीस वर्षीय महिला कोरोना बाधित आढळून आले आहेत
बारामतीतील मंगल लॅबोरेटरी येथे तपासलेल्या आरटीपीसीआर नमुन्यांमध्ये वाणेवाडी येथील 36 वर्षीय पुरुष, माळेगाव बुद्रुक येथील 75 वर्षीय महिला, मोरेवाडी येथील 93 वर्षीय महिला कोरोना बाधित आढळून आले आहेत.











