इंदापूर : महान्यूज लाईव्ह
इंदापूर तालुक्यात अस्मानी संकटाने केलेल्या नुकसानीची सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी पाहणी केली. तालुक्यातील संकट खूप मोठे असून या ठिकाणी तातडीने नुकसान भरपाईच्या पंचनाम्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी नमूद केले आणि प्रशासनास तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले.
दत्तात्रय भरणे यांनी इंदापूर तालुक्यातील सर्वाधिक पाऊस झालेल्या भागात तसेच सर्वाधिक नुकसान झालेल्या भागाचा तातडीने पाहणी दौरा केला. काल सकाळी त्यांनी सणसर येथे केलेल्या पाहणीत झालेल्या नुकसानीची माहिती घेतली. यावेळी त्यांनी प्रशासनाला तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले. हे पंचनामे युद्धपातळीवर करून नुकसानीचा आढावा घेण्याचे आदेशही त्यांनी प्रशासनास दिले.
यावेळी तहसीलदार सोनाली मेटकरी यांच्यासह शासनाचे विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.यावेळी त्यांनी शेतकरी व्यापारी तसेच त्यांच्या घरांमध्ये पाणी शिरून नुकसान झालेले आहे अशांशीही चर्चा केली.











