खानवटे येथील धायतोंडे, लोंढे, लोखंडे कुटुंबाची घेतली भेट
दौंड : महान्यूज लाईव्ह
आमदार राहुल कुल यांनी आज तालुक्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पहाणी. राजेगाव येथे बुधवारी रात्री खानवटे येथील चौघे जण पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याची घटना घडली होती. त्या घटनास्थळाची कुल यांनी पाहणी केली. खानवटे येथील धायतोंडे, लोंढे आणि लोखंडे कुटुंबाची भेट घेतली. तसेच मळद येथील पाझर तलाव फुटल्याने या तलावाची ही पाहणी केली.
दौंड तालुक्यात मागील दोन दिवसापासून झालेल्या मुसळधार पावसामुळे तालुक्यात अनेक गावांतील ओढ्यावरचे रस्ते वाहून गेले आहेत. शेतकरांच्या शेतजमिनीत पाणी शिरल्याने शेतपिके जमिन दोस्त झाली आहेत. तर अनेक ठिकाणी शेतपिके वाहून गेले आहेत.अनेकांच्या घरात पाणी शिरले आहे. शेतकरांच्या पाळीव जनावरे दगावली असल्याच्या घटना ही घडल्या आहेत. तसेच राजेगाव खानवटे येथे चार जण दुचाकीसह वाहून गेले यात तीन जणांचा बळी गेल्याची दुर्दवी घटना ही तालुक्यात घडली आहे.
या पावसामुळे तालुक्यात मोठी जीवीतहानीसह शेतक-यांचे मोठे नुकसान झाले आहे. याची पाहणी त्यांनी केली. स्वामी चिंचोली तसेच नुकसान ग्रस्त भागाची पाहणी करून शेतकऱ्यांशी चर्चा केली. यावेळी महसुल व कृषीविभागाला नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सुचना केल्या. या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे मदत मिळण्यासाठी शासनदरबारी पाठवपुरावा करण्याचे आश्वासन यावेळी आमदार कुल यांनी शेतकऱ्यांना दिले.











