पुणे : महान्यूज लाईव्ह
पुण्यातील एस एम जोशी पुलाशेजारी एमपीएससीच्या अध्यक्षांचा राजीनामा मागण्यासाठी केलेले आंदोलन आज मोडीत निघण्याचा डाव पोलिसांनी आखला होता. त्यासाठी काल भाजप प्रणित काहीजण याचिका दाखल करण्यासाठी उच्च न्यायालयात गेले. उच्च न्यायालयात सुनावणी झाली. उच्च न्यायालयाची सुनावणी आपल्या पथ्यावर पडेल आणि आपल्याला आदेश होईल असा बहुतेक पोलिसांचा होरा असावा, पण प्रत्यक्षात निकाल आमच्या बाजूने लागला आणि पोलिसांचा बंदोबस्त वाया गेला असे आमदार रोहित पवार यांनी आज संध्याकाळी विद्यार्थ्यांच्या संवाद कार्यक्रमात सांगितले.
दरम्यान यावेळी रोहित पवारांनी एक गौप्यस्फोट केला. ते म्हणाले, सुपेकर नावाचा व्यक्ती पुण्यातील मोठ्या पोलीस अधिकाऱ्याला भेटला. हा त्या पोलिस अधिकाऱ्याला का भेटला? हे मला माहित नाही, मात्र जसे पोलीस आमच्यावर लक्ष ठेवून होते तसेच आम्ही देखील पोलिसांवर लक्ष ठेवून आहोत. त्यामुळे असले सुपेकर आम्ही लगेच लक्षात घेतो. दरम्यान या याचिकेवर कदाचित उच्च न्यायालयातील सुनावणी होऊन निकाल हा आंदोलन मोडीत काढण्यासाठी येऊ शकतो असा अंदाज गृहीत धरून पोलिसांनी तयारी केली होती. मी अनेक महिने भांडून मतदारसंघात जे राज्य राखीव पोलीस दलाचे सेंटर आणले. त्याच सेंटरमधील पोलीस आमचे आंदोलन मोडीत काढण्यासाठी आज बोलवण्यात आले होते. हा योगायोग होता की, मला दिवस यासाठीचा प्रपंच ते मला कळले नाही. मात्र हा सगळा नाद त्यांचा वाया गेला असे ते म्हणाले.
दरम्यान आज सकाळी आंदोलन मोडीत निघण्याच्या आठवणी सकाळच्या वेळी जे विद्यार्थी जमत नाहीत ते विद्यार्थी आज अत्यंत आक्रमकपणे आंदोलन स्थळी जमले होते. अनेक कार्यकर्ते व विद्यार्थी आंदोलन आक्रमकपणे या ठिकाणी जमले आणि परिसरात तणाव निर्माण झाला होता. मात्र दरम्यानच्या काळात न्यायालयाचा सुनावणीचा आदेश सर्वांच्या लक्षात आला आणि हळूहळू पोलीस देखील तिथून पांगले.










