• Contact us
  • About us
Saturday, October 3, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शिक्रापूरच्या १० लाखांच्या रोकड चोरीचा थेट आंध्र प्रदेशात छडा; शिक्रापूर पोलिसांची बिटरगुंट्यात धडक कारवाई, २ लाख ९० हजारांची रोकड जप्त

mahaanewslive by mahaanewslive
October 3, 2026
in यशोगाथा, सामाजिक, सुरक्षा, महाराष्ट्र, आरोग्य, आर्थिक, कथा, कामगार जगत, क्राईम, क्राईम डायरी, राज्य, ताज्या बातम्या, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, पुणे, व्यक्ती विशेष, Featured
0
शिक्रापूरच्या १० लाखांच्या रोकड चोरीचा थेट आंध्र प्रदेशात छडा; शिक्रापूर पोलिसांची बिटरगुंट्यात धडक कारवाई, २ लाख ९० हजारांची रोकड जप्त

शिक्रापूर : येथील भारतीय स्टेट बँकेसमोर (SBI) उभ्या असलेल्या क्रेटा कारची काच फोडून १० लाख रुपयांची रोकड लंपास करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा शिक्रापूर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी थेट आंध्र प्रदेशातील नेल्लोर जिल्ह्यातील बिटरगुंटा येथे धडक कारवाई करत संशयिताच्या घरातून २ लाख ९० हजार रुपयांची रोकड जप्त केली आहे.

कारची काच फोडून पळवले होते १० लाख
मिळालेल्या माहितीनुसार, अतुल सुभाष जेधे (वय ४०, रा. जेधेवस्ती, तळेगाव ढमढेरे, ता. शिरूर) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली होती. ८ सप्टेंबर रोजी दुपारी सव्वा एक वाजण्याच्या सुमारास जेधे यांनी त्यांची क्रेटा कार शिक्रापूर येथील एसबीआय बँकेसमोर पार्क केली होती. काही वेळातच अज्ञात चोरट्यांनी कारची काच फोडून आतील तब्बल १० लाख रुपयांची रोकड लंपास केली होती. याप्रकरणी शिक्रापूर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सीसीटीव्ही फुटेज आणि खबऱ्यांचे जाळे
गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी घटनास्थळासह परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज बारकाईने तपासले. त्यावरून संशयितांचा माग काढत असताना गुप्त बातमीदारांकडून आरोपी आंध्र प्रदेशातील असल्याची माहिती समोर आली. त्यानुसार तपासासाठी शिक्रापूर पोलिसांचे एक पथक दोन वेळा आंध्र प्रदेशातील नेल्लोर जिल्ह्यातील बिटरगुंटा येथे रवाना झाले.

घरातून २ लाख ९० हजार जप्त
स्थानिक पोलिसांच्या मदतीने कप्पराल टिप्पा, बोगल मंडल (बिटरगुंटा) येथे शोधमोहीम राबवण्यात आली. या तपासात रमेश बाबू गोडेट्टी (रा. कप्पराल टिप्पा, ता. बिटरगुंटा, जि. नेल्लोर) याच्या हालचाली संशयास्पद आढळल्याने पोलिसांनी त्याच्या घरावर छापा टाकला. झडतीदरम्यान चोरीच्या रकमेपैकी २ लाख ९० हजार रुपयांची रोकड हस्तगत करण्यात आली.

ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदिपसिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक शुभम कुमार, शिरूर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी रविंद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्रापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केली. या पथकात पोलीस उपनिरीक्षक उमाकांत कुंजीर, जिनेस कोळी, तुषार भोर, अंकुश कारंडे तसेच पोलीस हवालदार अमोल दांडगे, रोहिदास पारखे, शिवाजी चितारे, विश्वंभर वाघमारे, अमोल नलगे, पोलीस कॉन्स्टेबल नारायण वाळके, राम जाधव, मच्छींद्र निचीत, नागेश वाघमारे आणि भारत भोसले यांचा समावेश होता. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक उमाकांत कुंजीर आणि पोलीस कॉन्स्टेबल भारत भोसले करत आहेत.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उद्यापासून पावसाळी अधिवेशन; सरसकट कर्जमाफी, दुष्काळाचे सावट, विषारी दारूकांड, वाढत्या गुन्हेगारीवरून सरकारची कसोटी

आरोग्य अधिकारी जसे काम करतील; तशाच प्रकारची त्यांना नियुक्ती व जबाबदारी मिळणार..! त्यांची कामगिरीच ठरवेल आरोग्य अधिकाऱ्यांची पुढील जबाबदारी; दरवर्षी होणार गुणांकन

September 7, 2026
सावत्र बहिणीचे घर जाळल्याचा आरोपातील हवा असलेला आरोपी पहाटेच्या सापळ्यात जेरबंद..!

सावत्र बहिणीचे घर जाळल्याचा आरोपातील हवा असलेला आरोपी पहाटेच्या सापळ्यात जेरबंद..!

September 7, 2026
पाच वर्षे वॉरंटला चकवा; अखेर आरोपी पोलिसांच्या जाळ्यात मारहाण व धमकीच्या २०२१ मधील गुन्ह्यात देवेंद्र घोडकेला अटक; न्यायालयीन कोठडी!

पाच वर्षे वॉरंटला चकवा; अखेर आरोपी पोलिसांच्या जाळ्यात मारहाण व धमकीच्या २०२१ मधील गुन्ह्यात देवेंद्र घोडकेला अटक; न्यायालयीन कोठडी!

September 7, 2026
चार दशकांनंतरही शिक्षकांच्या आठवणी ताज्या; १९८६च्या बॅचमधील माजी विद्यार्थ्यांनी ७०० हून अधिक पोस्टकार्डांद्वारे व्यक्त केली कृतज्ञता..!

चार दशकांनंतरही शिक्षकांच्या आठवणी ताज्या; १९८६च्या बॅचमधील माजी विद्यार्थ्यांनी ७०० हून अधिक पोस्टकार्डांद्वारे व्यक्त केली कृतज्ञता..!

September 7, 2026
लेकीसाठी अनवानी पायाने धावणाऱ्या माऊलीच्या मदतीला सचिन तेंडुलकरही सरसावला

लेकीसाठी अनवानी पायाने धावणाऱ्या माऊलीच्या मदतीला सचिन तेंडुलकरही सरसावला

September 7, 2026
साखर कारखान्यांची धुराडी कधी पेटणार? ऑक्टोबर की नोव्हेंबरचा मुहूर्त; बुधवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत निर्णय

साखर कारखान्यांची धुराडी कधी पेटणार? ऑक्टोबर की नोव्हेंबरचा मुहूर्त; बुधवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत निर्णय

September 7, 2026
नगराध्यक्षांच्या वित्तीय अधिकारांना कात्री; नमुना क्र. ६४ वर मुख्याधिकाऱ्यांचीच स्वाक्षरी

नगराध्यक्षांच्या वित्तीय अधिकारांना कात्री; नमुना क्र. ६४ वर मुख्याधिकाऱ्यांचीच स्वाक्षरी

September 7, 2026
भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील पहिला महानायक – आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक!

भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील पहिला महानायक – आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक!

September 7, 2026
दिवे घाटातील अपघातातील गौरव चव्हाणच्या कुटुंबीयांची युगेंद्र पवार यांनी घेतली भेट!

दिवे घाटातील अपघातातील गौरव चव्हाणच्या कुटुंबीयांची युगेंद्र पवार यांनी घेतली भेट!

September 6, 2026
उद्या सोमवारी उजनीकाठच्या ४० गावात मच्छीमारांचे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण..!

उद्या सोमवारी उजनीकाठच्या ४० गावात मच्छीमारांचे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण..!

September 6, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group