• Contact us
  • About us
Friday, September 25, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सोमेश्वर कारखान्याची राष्ट्रीय पातळीवर उत्तुंग भरारी: ‘तांत्रिक कार्यक्षमते’चा मानाचा राष्ट्रीय पुरस्कार!

mahaanewslive by mahaanewslive
September 24, 2026
in यशोगाथा, सामाजिक, सुरक्षा, शिक्षण, शेती शिवार, महिला विश्व, महाराष्ट्र, आरोग्य, आर्थिक, कथा, कामगार जगत, राष्ट्रीय, राजकीय, राज्य, रोजगार, ताज्या बातम्या, लाईव्ह, पश्चिम महाराष्ट्र, प्रवास, पुणे, पुणे, व्यक्ती विशेष, Featured
0
सोमेश्वर कारखान्याची राष्ट्रीय पातळीवर उत्तुंग भरारी: ‘तांत्रिक कार्यक्षमते’चा मानाचा राष्ट्रीय पुरस्कार!

नवी दिल्ली / बारामती : उत्कृष्ट कामकाज आणि पारदर्शक कारभाराची अखंड परंपरा जपणाऱ्या श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने पुन्हा एकदा देशाच्या पटलावर आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे. नवी दिल्ली येथील ‘राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना संघ लि.’ यांच्या वतीने सन २०२४-२०२५ या वर्षासाठीचा देशभरातील ‘तांत्रिक कार्यक्षमता’ (Technical Efficiency) या श्रेणीतील तृतीय क्रमांकाचा राष्ट्रीय पुरस्कार सोमेश्वर कारखान्याला प्रदान करण्यात आला. गतवर्षी सर्वोत्कृष्ट साखर कारखान्याचा देशपातळीवरील पुरस्कार पटकावल्यानंतर सलग दुसऱ्या वर्षी सोमेश्वरने राष्ट्रीय पातळीवर मान मिळवून यशाची परंपरा कायम राखली आहे.

नवी दिल्लीतील डॉ. आंबेडकर इंटरनॅशनल सेंटर येथे २२ सप्टेंबर २०२६ रोजी आयोजित भव्य राष्ट्रीय समारंभात हा गौरव करण्यात आला. केंद्रीय दळणवळण व वाहतूक मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय सहकार राज्यमंत्री कृष्णपाल गुर्जर, महाराष्ट्राचे सहकारमंत्री बाबासाहेब पाटील, माजी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील आणि राष्ट्रीय साखर संघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांच्यासह विविध राज्यांचे सहकारमंत्री व मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार वितरीत झाला. कारखान्याच्या वतीने कार्यकारी संचालक राजेंद्र यादव, वर्क्स मॅनेजर नारायण नायकोडे व चीफ केमिस्ट शिवशंकर भोसले यांनी हा मानाचा पुरस्कार स्वीकारला.

शेतकरी, सभासद व कर्मचाऱ्यांच्या परिश्रमाचे फलित
कारखान्याला देशपातळीवरील हा बहुमान मिळाल्याबद्दल कारखान्याचे चेअरमन पुरुषोत्तम जगताप, उपाध्यक्ष तसेच संचालक मंडळाने सभासद, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे मनापासून अभिनंदन केले आहे. या यशाविषयी भावना व्यक्त करताना कार्यकारी संचालक श्री. राजेंद्र यादव म्हणाले, दिवंगत लोकनेते आदरणीय अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली देशात नावारूपाला आलेला आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रगतीपथावर धावणारा सोमेश्वर कारखाना तंत्रज्ञान आणि व्यवस्थापनात अव्वल ठरला आहे. हा पुरस्कार केवळ कारखान्याचा नसून ऊस उत्पादक शेतकरी, सभासद बांधव, ऊसतोड- वाहतूकदार, कामगार आणि संपूर्ण अधिकारी वर्गाच्या अथक परिश्रमांचे फलित आहे.

१३ वर्षांत १३ राज्य व राष्ट्रीय पुरस्कारांचा विक्रम
गेल्या १३ वर्षांत शेतकऱ्यांना सातत्याने सर्वोच्च ऊसदर देणारा कारखाना म्हणून सोमेश्वरची ख्याती सर्वदूर पसरलेली आहे. २०१३ पासून कारखान्याने नामांकित संस्थांचे तब्बल १३ राज्य व राष्ट्रीय पातळीवरील पुरस्कार पटकावून स्वतःच्या विकासाचा चढता आलेख सिद्ध केला आहे. तांत्रिक क्षमतेचा हा राष्ट्रीय सन्मान सोमेश्वरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवणारा ठरला आहे.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उद्यापासून पावसाळी अधिवेशन; सरसकट कर्जमाफी, दुष्काळाचे सावट, विषारी दारूकांड, वाढत्या गुन्हेगारीवरून सरकारची कसोटी

आरोग्य अधिकारी जसे काम करतील; तशाच प्रकारची त्यांना नियुक्ती व जबाबदारी मिळणार..! त्यांची कामगिरीच ठरवेल आरोग्य अधिकाऱ्यांची पुढील जबाबदारी; दरवर्षी होणार गुणांकन

September 7, 2026
सावत्र बहिणीचे घर जाळल्याचा आरोपातील हवा असलेला आरोपी पहाटेच्या सापळ्यात जेरबंद..!

सावत्र बहिणीचे घर जाळल्याचा आरोपातील हवा असलेला आरोपी पहाटेच्या सापळ्यात जेरबंद..!

September 7, 2026
पाच वर्षे वॉरंटला चकवा; अखेर आरोपी पोलिसांच्या जाळ्यात मारहाण व धमकीच्या २०२१ मधील गुन्ह्यात देवेंद्र घोडकेला अटक; न्यायालयीन कोठडी!

पाच वर्षे वॉरंटला चकवा; अखेर आरोपी पोलिसांच्या जाळ्यात मारहाण व धमकीच्या २०२१ मधील गुन्ह्यात देवेंद्र घोडकेला अटक; न्यायालयीन कोठडी!

September 7, 2026
चार दशकांनंतरही शिक्षकांच्या आठवणी ताज्या; १९८६च्या बॅचमधील माजी विद्यार्थ्यांनी ७०० हून अधिक पोस्टकार्डांद्वारे व्यक्त केली कृतज्ञता..!

चार दशकांनंतरही शिक्षकांच्या आठवणी ताज्या; १९८६च्या बॅचमधील माजी विद्यार्थ्यांनी ७०० हून अधिक पोस्टकार्डांद्वारे व्यक्त केली कृतज्ञता..!

September 7, 2026
लेकीसाठी अनवानी पायाने धावणाऱ्या माऊलीच्या मदतीला सचिन तेंडुलकरही सरसावला

लेकीसाठी अनवानी पायाने धावणाऱ्या माऊलीच्या मदतीला सचिन तेंडुलकरही सरसावला

September 7, 2026
साखर कारखान्यांची धुराडी कधी पेटणार? ऑक्टोबर की नोव्हेंबरचा मुहूर्त; बुधवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत निर्णय

साखर कारखान्यांची धुराडी कधी पेटणार? ऑक्टोबर की नोव्हेंबरचा मुहूर्त; बुधवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत निर्णय

September 7, 2026
नगराध्यक्षांच्या वित्तीय अधिकारांना कात्री; नमुना क्र. ६४ वर मुख्याधिकाऱ्यांचीच स्वाक्षरी

नगराध्यक्षांच्या वित्तीय अधिकारांना कात्री; नमुना क्र. ६४ वर मुख्याधिकाऱ्यांचीच स्वाक्षरी

September 7, 2026
भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील पहिला महानायक – आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक!

भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील पहिला महानायक – आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक!

September 7, 2026
दिवे घाटातील अपघातातील गौरव चव्हाणच्या कुटुंबीयांची युगेंद्र पवार यांनी घेतली भेट!

दिवे घाटातील अपघातातील गौरव चव्हाणच्या कुटुंबीयांची युगेंद्र पवार यांनी घेतली भेट!

September 6, 2026
उद्या सोमवारी उजनीकाठच्या ४० गावात मच्छीमारांचे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण..!

उद्या सोमवारी उजनीकाठच्या ४० गावात मच्छीमारांचे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण..!

September 6, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group