• Contact us
  • About us
Friday, September 25, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

गुरुवारी मोर्चा: बारामती नगरपरिषदेच्या तुघलकी कारभाराविरोधात शेतकरी आक्रमक, वाहतूक नियोजनाअभावी आठवडा बाजार बंद केल्याने संतापाची लाट!

mahaanewslive by mahaanewslive
September 23, 2026
in यशोगाथा, सामाजिक, शिक्षण, शेती शिवार, महिला विश्व, महाराष्ट्र, आरोग्य, आर्थिक, कथा, कामगार जगत, राजकीय, राज्य, ताज्या बातम्या, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, पुणे, व्यक्ती विशेष, Featured
0
गुरुवारी मोर्चा: बारामती नगरपरिषदेच्या तुघलकी कारभाराविरोधात शेतकरी आक्रमक, वाहतूक नियोजनाअभावी आठवडा बाजार बंद केल्याने संतापाची लाट!

बारामती : बारामती नगरपरिषदेने समस्येवर तोडगा काढण्याऐवजी थेट पारंपरिक आठवडा बाजारच बंद करण्याचा अनाकलनीय आणि शेतकरीविरोधी निर्णय घेतला आहे. रस्त्यावर बसणाऱ्या विक्रेत्यांचे सुयोग्य पुनर्वसन करणे आणि वाहतुकीला शिस्त लावणे ही पालिकेची प्राथमिक जबाबदारी असताना, प्रशासनाने मात्र  थेट बळीराजाच्या पोटावरच लाथ मारली आहे. ‘डोके दुखते म्हणून डोकेच छाटून टाकण्याचा’ हा प्रकार असून, या मनमानी कारभाराला चोख उत्तर देण्यासाठी बारामती आणि पंचक्रोशीतील शेतकरी गुरुवारी, २४ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता नगरपरिषदेवर भव्य धडक मोर्चा काढणार आहेत.

बारामती शहरात गेल्या अनेक वर्षांपासून भरणारा आठवडा बाजार हा केवळ खरेदी-विक्रीचे ठिकाण नसून ग्रामीण अर्थव्यवस्था आणि शहरी ग्राहकांमधील एक मजबूत दुवा आहे. परिसरातील शेतकरी स्वतःच्या शेतात रात्रंदिवस राबून पिकवलेला ताजा, विषमुक्त भाजीपाला थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवतात. यामुळे शेतकऱ्यांना दोन पैशांचा हक्काचा नफा मिळतो, तर नागरिकांनाही परवडणाऱ्या दरात भाजीपाला उपलब्ध होतो. मात्र,  शहरात वाहतुकीची कोंडी होत असल्याचा ठपका ठेवत पालिकेने थेट बाजारच बंद पाडला. रस्त्यावर शिस्तबद्ध व्यवस्था करणे, विक्रेत्यांना ठरवून दिलेल्या जागेत बसवणे किंवा पर्यायी जागा उपलब्ध करून देणे शक्य असतानाही, प्रशासनाने शेतकऱ्यांचे कष्ट धुळीस मिळवणारा सोपा मार्ग निवडला आहे.

प्रशासनाच्या या आडमुठ्या आणि असंवेदनशील भूमिकेमुळे सर्वसामान्य नागरिकांचे बजेट कोलमडणार असून, शेतकऱ्यांचे शेतीमाल रस्त्यावर फेकून देण्याची वेळ आली आहे. कष्टाचा हा घोर अपमान शेतकरी बांधव कदापि सहन करणार नाहीत, असा निर्वाणीचा इशारा आता दिला जात आहे. आठवडा बाजार बंद करण्याऐवजी योग्य वाहतूक नियोजन करा आणि शेतकरी-ग्राहकांचे हित जपा, अशी ठाम भूमिका घेत पंचक्रोशीतील शेतकरी आता रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत आहेत. गुरुवारी सकाळी १० वाजता बारामती नगरपरिषदेसमोर धडकणाऱ्या या भव्य मोर्चात शेतकरी आणि सुजाण नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उद्यापासून पावसाळी अधिवेशन; सरसकट कर्जमाफी, दुष्काळाचे सावट, विषारी दारूकांड, वाढत्या गुन्हेगारीवरून सरकारची कसोटी

आरोग्य अधिकारी जसे काम करतील; तशाच प्रकारची त्यांना नियुक्ती व जबाबदारी मिळणार..! त्यांची कामगिरीच ठरवेल आरोग्य अधिकाऱ्यांची पुढील जबाबदारी; दरवर्षी होणार गुणांकन

September 7, 2026
सावत्र बहिणीचे घर जाळल्याचा आरोपातील हवा असलेला आरोपी पहाटेच्या सापळ्यात जेरबंद..!

सावत्र बहिणीचे घर जाळल्याचा आरोपातील हवा असलेला आरोपी पहाटेच्या सापळ्यात जेरबंद..!

September 7, 2026
पाच वर्षे वॉरंटला चकवा; अखेर आरोपी पोलिसांच्या जाळ्यात मारहाण व धमकीच्या २०२१ मधील गुन्ह्यात देवेंद्र घोडकेला अटक; न्यायालयीन कोठडी!

पाच वर्षे वॉरंटला चकवा; अखेर आरोपी पोलिसांच्या जाळ्यात मारहाण व धमकीच्या २०२१ मधील गुन्ह्यात देवेंद्र घोडकेला अटक; न्यायालयीन कोठडी!

September 7, 2026
चार दशकांनंतरही शिक्षकांच्या आठवणी ताज्या; १९८६च्या बॅचमधील माजी विद्यार्थ्यांनी ७०० हून अधिक पोस्टकार्डांद्वारे व्यक्त केली कृतज्ञता..!

चार दशकांनंतरही शिक्षकांच्या आठवणी ताज्या; १९८६च्या बॅचमधील माजी विद्यार्थ्यांनी ७०० हून अधिक पोस्टकार्डांद्वारे व्यक्त केली कृतज्ञता..!

September 7, 2026
लेकीसाठी अनवानी पायाने धावणाऱ्या माऊलीच्या मदतीला सचिन तेंडुलकरही सरसावला

लेकीसाठी अनवानी पायाने धावणाऱ्या माऊलीच्या मदतीला सचिन तेंडुलकरही सरसावला

September 7, 2026
साखर कारखान्यांची धुराडी कधी पेटणार? ऑक्टोबर की नोव्हेंबरचा मुहूर्त; बुधवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत निर्णय

साखर कारखान्यांची धुराडी कधी पेटणार? ऑक्टोबर की नोव्हेंबरचा मुहूर्त; बुधवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत निर्णय

September 7, 2026
नगराध्यक्षांच्या वित्तीय अधिकारांना कात्री; नमुना क्र. ६४ वर मुख्याधिकाऱ्यांचीच स्वाक्षरी

नगराध्यक्षांच्या वित्तीय अधिकारांना कात्री; नमुना क्र. ६४ वर मुख्याधिकाऱ्यांचीच स्वाक्षरी

September 7, 2026
भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील पहिला महानायक – आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक!

भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील पहिला महानायक – आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक!

September 7, 2026
दिवे घाटातील अपघातातील गौरव चव्हाणच्या कुटुंबीयांची युगेंद्र पवार यांनी घेतली भेट!

दिवे घाटातील अपघातातील गौरव चव्हाणच्या कुटुंबीयांची युगेंद्र पवार यांनी घेतली भेट!

September 6, 2026
उद्या सोमवारी उजनीकाठच्या ४० गावात मच्छीमारांचे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण..!

उद्या सोमवारी उजनीकाठच्या ४० गावात मच्छीमारांचे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण..!

September 6, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group