• Contact us
  • About us
Thursday, September 24, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

बारामतीतून आता तीन तालुक्यांचा महसूल कारभार; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या पुढाकाराने अपर जिल्हाधिकारी कार्यालयाला मंजुरी!

mahaanewslive by mahaanewslive
September 23, 2026
in यशोगाथा, महिला विश्व, महाराष्ट्र, आरोग्य, आर्थिक, कथा, कामगार जगत, राजकीय, राज्य, ताज्या बातम्या, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, पुणे, Featured
0
बारामतीतून आता तीन तालुक्यांचा महसूल कारभार; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या पुढाकाराने अपर जिल्हाधिकारी कार्यालयाला मंजुरी!

बारामती : महान्यूज लाईव्ह

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या पुढाकाराने पुणे जिल्ह्याच्या महसूल प्रशासनाच्या दृष्टीने बारामतीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. बारामती येथे अपर जिल्हाधिकारी कार्यालय कार्यान्वित करण्यास महाराष्ट्र शासनाने २२ सप्टेंबर २०२६ रोजीच्या शासन निर्णयाद्वारे अधिकृत मान्यता दिली आहे. या निर्णयामुळे बारामतीसह दौंड आणि इंदापूर या तीन तालुक्यांचा महसूल कारभार स्वतंत्रपणे बारामती अपर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातून हाताळला जाणार आहे.

पुणे जिल्ह्याचा मोठा भौगोलिक विस्तार, वाढती लोकसंख्या व नागरीकरण तसेच जिल्हा मुख्यालयापासून बारामती, दौंड आणि इंदापूर या तालुक्यांचे अंतर लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. महसूल विभागाशी संबंधित कामांसाठी नागरिकांना पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात जावे लागणारी धावपळ कमी व्हावी आणि प्रशासन अधिक लोकाभिमुख व्हावे, हा शासन निर्णयामागील प्रमुख उद्देश असल्याचे शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे.

तीन तालुक्यांचा कारभार बारामतीतून

शासनाने निश्चित केलेल्या नव्या प्रशासकीय रचनेनुसार अपर जिल्हाधिकारी कार्यालय, बारामतीच्या कार्यक्षेत्रात बारामती, दौंड आणि इंदापूर या तीन तालुक्यांचा समावेश करण्यात आला आहे. तर पुणे अपर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात पुणे शहर, आंबेगाव, खेड, मावळ, मुळशी, हवेली, शिरूर, पुरंदर, जुन्नर, भोर आणि राजगड हे तालुके राहणार आहेत

महसूल विषयक कामांना मिळणार स्थानिक पातळीवर गती

अपर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून संबंधित कार्यक्षेत्रातील विषयांचे कामकाज हाताळले जाणार आहे. मात्र, शासन निर्णयानुसार जिल्हाधिकाऱ्यांकडे असलेले अधिकार अपर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून वापरता येणार नाहीत. बारामती अपर जिल्हाधिकारी हे कार्यालय प्रमुख तसेच आहरण व संवितरण अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत.

तात्पुरत्या कार्यालयातून सुरुवात; कायमस्वरूपी जागेचा प्रस्ताव

नवीन कार्यालय सुरू करण्यासाठी सुरुवातीला तात्पुरते कार्यालय निश्चित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यानंतर कायमस्वरूपी जागा शोधून कार्यालयाच्या बांधकामाचा प्रस्ताव शासनाकडे सादर करायचा आहे. तसेच संबंधित बाबींची पूर्तता करून त्याबाबतचा अहवाल १५ दिवसांत शासनाला सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यानंतर कार्यालयाचे प्रत्यक्ष कामकाज सुरू करण्याबाबत शासनस्तरावरून कळविण्यात येणार आहे.

बारामतीत अपर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रस्तावाची यापूर्वी चर्चा झाली होती आणि बारामती, दौंड व इंदापूर या तालुक्यांचा समावेश असलेल्या प्रस्तावाबाबत हरकती व सूचना मागविण्यात आल्या होत्या. आता २२ सप्टेंबरच्या शासन निर्णयाने या कार्यालयाला अधिकृत प्रशासकीय मान्यता मिळाल्याने प्रस्तावाच्या पुढील अंमलबजावणीचा मार्ग मोकळा झाला आहे.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उद्यापासून पावसाळी अधिवेशन; सरसकट कर्जमाफी, दुष्काळाचे सावट, विषारी दारूकांड, वाढत्या गुन्हेगारीवरून सरकारची कसोटी

आरोग्य अधिकारी जसे काम करतील; तशाच प्रकारची त्यांना नियुक्ती व जबाबदारी मिळणार..! त्यांची कामगिरीच ठरवेल आरोग्य अधिकाऱ्यांची पुढील जबाबदारी; दरवर्षी होणार गुणांकन

September 7, 2026
सावत्र बहिणीचे घर जाळल्याचा आरोपातील हवा असलेला आरोपी पहाटेच्या सापळ्यात जेरबंद..!

सावत्र बहिणीचे घर जाळल्याचा आरोपातील हवा असलेला आरोपी पहाटेच्या सापळ्यात जेरबंद..!

September 7, 2026
पाच वर्षे वॉरंटला चकवा; अखेर आरोपी पोलिसांच्या जाळ्यात मारहाण व धमकीच्या २०२१ मधील गुन्ह्यात देवेंद्र घोडकेला अटक; न्यायालयीन कोठडी!

पाच वर्षे वॉरंटला चकवा; अखेर आरोपी पोलिसांच्या जाळ्यात मारहाण व धमकीच्या २०२१ मधील गुन्ह्यात देवेंद्र घोडकेला अटक; न्यायालयीन कोठडी!

September 7, 2026
चार दशकांनंतरही शिक्षकांच्या आठवणी ताज्या; १९८६च्या बॅचमधील माजी विद्यार्थ्यांनी ७०० हून अधिक पोस्टकार्डांद्वारे व्यक्त केली कृतज्ञता..!

चार दशकांनंतरही शिक्षकांच्या आठवणी ताज्या; १९८६च्या बॅचमधील माजी विद्यार्थ्यांनी ७०० हून अधिक पोस्टकार्डांद्वारे व्यक्त केली कृतज्ञता..!

September 7, 2026
लेकीसाठी अनवानी पायाने धावणाऱ्या माऊलीच्या मदतीला सचिन तेंडुलकरही सरसावला

लेकीसाठी अनवानी पायाने धावणाऱ्या माऊलीच्या मदतीला सचिन तेंडुलकरही सरसावला

September 7, 2026
साखर कारखान्यांची धुराडी कधी पेटणार? ऑक्टोबर की नोव्हेंबरचा मुहूर्त; बुधवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत निर्णय

साखर कारखान्यांची धुराडी कधी पेटणार? ऑक्टोबर की नोव्हेंबरचा मुहूर्त; बुधवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत निर्णय

September 7, 2026
नगराध्यक्षांच्या वित्तीय अधिकारांना कात्री; नमुना क्र. ६४ वर मुख्याधिकाऱ्यांचीच स्वाक्षरी

नगराध्यक्षांच्या वित्तीय अधिकारांना कात्री; नमुना क्र. ६४ वर मुख्याधिकाऱ्यांचीच स्वाक्षरी

September 7, 2026
भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील पहिला महानायक – आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक!

भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील पहिला महानायक – आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक!

September 7, 2026
दिवे घाटातील अपघातातील गौरव चव्हाणच्या कुटुंबीयांची युगेंद्र पवार यांनी घेतली भेट!

दिवे घाटातील अपघातातील गौरव चव्हाणच्या कुटुंबीयांची युगेंद्र पवार यांनी घेतली भेट!

September 6, 2026
उद्या सोमवारी उजनीकाठच्या ४० गावात मच्छीमारांचे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण..!

उद्या सोमवारी उजनीकाठच्या ४० गावात मच्छीमारांचे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण..!

September 6, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group