• Contact us
  • About us
Wednesday, September 9, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सलग सहा वर्षे प्रथम क्रमांकाची परंपरा कायम!सणसरच्या आझाद तरुण मंडळाचा वालचंदनगर पोलिसांकडून गौरव!

mahaanewslive by mahaanewslive
September 5, 2026
in यशोगाथा, सामाजिक, शिक्षण, महाराष्ट्र, आरोग्य, आर्थिक, कथा, कामगार जगत, क्राईम डायरी, राज्य, ताज्या बातम्या, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, पुणे, व्यक्ती विशेष, Featured
0
सलग सहा वर्षे प्रथम क्रमांकाची परंपरा कायम!सणसरच्या आझाद तरुण मंडळाचा वालचंदनगर पोलिसांकडून गौरव!

काका यादव, भवानीनगर : सामाजिक कार्याची तब्बल ४५ वर्षांची परंपरा जपणाऱ्या सणसर येथील आझाद तरुण मंडळाने गणेशोत्सवातील उत्कृष्ट कार्याची परंपरा यंदाही कायम ठेवली आहे. सन २०२५ मधील गणेशोत्सवातील उल्लेखनीय कार्याची दखल घेत वालचंदनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मंडळाला प्रथम क्रमांकाचे प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

विशेष म्हणजे गेल्या सहा वर्षांपासून आझाद तरुण मंडळ सलग प्रथम क्रमांक पटकावत आहे. आगामी २०२६ दहीहंडी व गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वालचंदनगर पोलीस ठाण्यात मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची व कार्यकर्त्यांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी सन २०२५ मधील गणेशोत्सवातील उत्कृष्ट कार्याबद्दल आझाद तरुण मंडळाचा सन्मान करण्यात आला. वालचंदनगर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक गोपाळ पवार यांच्या हस्ते मंडळाला प्रथम क्रमांकाचे प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले.

यावेळी पोलीस उपनिरीक्षक घोरपडे, गोपनीय विभागाचे गणेश काटकर तसेच वालचंदनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विविध दहीहंडी व गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. उत्सव काळात मंडळांनी पोलीस ठाण्याने घालून दिलेल्या नियम व अटींचे काटेकोर पालन करावे, शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन प्रभारी पोलीस निरीक्षक गोपाळ पवार यांनी केले. दरम्यान, नूतन प्रभारी अधिकारी गोपाळ पवार यांचा आझाद तरुण मंडळाच्या वतीने सत्कार करून पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

४५ वर्षांची सामाजिक कार्याची परंपरा…
आझाद तरुण मंडळ हे गेल्या ४५ वर्षांपासून सणसर परिसरात सामाजिक कार्यात अग्रेसर आहे. मंडळाच्या श्री गणेशाची प्राणप्रतिष्ठा वै. ह.भ.प. गणपत बुवा काळे महाराज यांच्या शुभहस्ते करण्यात आली आहे. गणेशोत्सवाबरोबरच विविध सामाजिक उपक्रमांमध्ये मंडळाचा सातत्याने सहभाग राहिला आहे.

मंडळाच्या सामाजिक व सार्वजनिक कार्याची यापूर्वीही विविध स्तरांवर दखल घेण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या २०१६ सालच्या लोकमान्य महोत्सवांतर्गत तालुका स्तरावर प्रथम क्रमांक, २५ हजार रुपये रोख पारितोषिक, प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह मंडळाला मिळाले आहे. तसेच दै. लोकमतचा २०२३ मधील सातत्यपूर्ण उत्कृष्ट सामाजिक कार्याबद्दलचा ‘लोकमत गणनायक पुरस्कार’ही मंडळाला प्राप्त झाला आहे.
कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक डॉ. सुनील फुलारी तसेच पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल यांच्या हस्तेही मंडळाचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला आहे.

सणसर गावाला सन २००९-१० मध्ये मिळालेला १० लाख रुपयांचा ‘गाव तंटामुक्ती’ पुरस्कार मिळवून देण्यातही आझाद तरुण मंडळाचा मोठा सहभाग होता. सामाजिक बांधिलकी, शिस्तबद्ध उत्सव आयोजन आणि सातत्यपूर्ण कार्याच्या जोरावर मंडळाने सलग सहा वर्षे प्रथम क्रमांकाची मिळविलेली कामगिरी ही सणसरच्या सामाजिक कार्याची प्रेरणादायी परंपरा ठरत आहे.

वालचंदनगर पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात सहा वर्षे पहिला क्रमांक मिळविलेल्या या मंडळाचे या कार्यक्रमात प्रकाश शिंदे संस्थापक अध्यक्ष, संजय शिंदे अध्यक्ष आर्यन गुप्ते उपाध्यक्ष, गणेश जाधव सेक्रेटरी अक्षय शिर्के, निखिल कोकाटे, योगीराज गाडे, आकाश कांगळे, चैतन्य शिंदे, प्रज्योत शिंदे, शरद कांबळे माजी ग्रामपंचायत सदस्य हे उपस्थित होते

Next Post
गोविंदा निघाले होते पुण्याला.. बारामतीतच हुल्लडबाजी करायला लागले.. पोलिसांनी 34 दुचाकी पकडल्या.. 35000 चा दंड केला!

गोविंदा निघाले होते पुण्याला.. बारामतीतच हुल्लडबाजी करायला लागले.. पोलिसांनी 34 दुचाकी पकडल्या.. 35000 चा दंड केला!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उद्यापासून पावसाळी अधिवेशन; सरसकट कर्जमाफी, दुष्काळाचे सावट, विषारी दारूकांड, वाढत्या गुन्हेगारीवरून सरकारची कसोटी

आरोग्य अधिकारी जसे काम करतील; तशाच प्रकारची त्यांना नियुक्ती व जबाबदारी मिळणार..! त्यांची कामगिरीच ठरवेल आरोग्य अधिकाऱ्यांची पुढील जबाबदारी; दरवर्षी होणार गुणांकन

September 7, 2026
सावत्र बहिणीचे घर जाळल्याचा आरोपातील हवा असलेला आरोपी पहाटेच्या सापळ्यात जेरबंद..!

सावत्र बहिणीचे घर जाळल्याचा आरोपातील हवा असलेला आरोपी पहाटेच्या सापळ्यात जेरबंद..!

September 7, 2026
पाच वर्षे वॉरंटला चकवा; अखेर आरोपी पोलिसांच्या जाळ्यात मारहाण व धमकीच्या २०२१ मधील गुन्ह्यात देवेंद्र घोडकेला अटक; न्यायालयीन कोठडी!

पाच वर्षे वॉरंटला चकवा; अखेर आरोपी पोलिसांच्या जाळ्यात मारहाण व धमकीच्या २०२१ मधील गुन्ह्यात देवेंद्र घोडकेला अटक; न्यायालयीन कोठडी!

September 7, 2026
चार दशकांनंतरही शिक्षकांच्या आठवणी ताज्या; १९८६च्या बॅचमधील माजी विद्यार्थ्यांनी ७०० हून अधिक पोस्टकार्डांद्वारे व्यक्त केली कृतज्ञता..!

चार दशकांनंतरही शिक्षकांच्या आठवणी ताज्या; १९८६च्या बॅचमधील माजी विद्यार्थ्यांनी ७०० हून अधिक पोस्टकार्डांद्वारे व्यक्त केली कृतज्ञता..!

September 7, 2026
लेकीसाठी अनवानी पायाने धावणाऱ्या माऊलीच्या मदतीला सचिन तेंडुलकरही सरसावला

लेकीसाठी अनवानी पायाने धावणाऱ्या माऊलीच्या मदतीला सचिन तेंडुलकरही सरसावला

September 7, 2026
साखर कारखान्यांची धुराडी कधी पेटणार? ऑक्टोबर की नोव्हेंबरचा मुहूर्त; बुधवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत निर्णय

साखर कारखान्यांची धुराडी कधी पेटणार? ऑक्टोबर की नोव्हेंबरचा मुहूर्त; बुधवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत निर्णय

September 7, 2026
नगराध्यक्षांच्या वित्तीय अधिकारांना कात्री; नमुना क्र. ६४ वर मुख्याधिकाऱ्यांचीच स्वाक्षरी

नगराध्यक्षांच्या वित्तीय अधिकारांना कात्री; नमुना क्र. ६४ वर मुख्याधिकाऱ्यांचीच स्वाक्षरी

September 7, 2026
भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील पहिला महानायक – आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक!

भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील पहिला महानायक – आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक!

September 7, 2026
दिवे घाटातील अपघातातील गौरव चव्हाणच्या कुटुंबीयांची युगेंद्र पवार यांनी घेतली भेट!

दिवे घाटातील अपघातातील गौरव चव्हाणच्या कुटुंबीयांची युगेंद्र पवार यांनी घेतली भेट!

September 6, 2026
उद्या सोमवारी उजनीकाठच्या ४० गावात मच्छीमारांचे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण..!

उद्या सोमवारी उजनीकाठच्या ४० गावात मच्छीमारांचे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण..!

September 6, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group