• Contact us
  • About us
Wednesday, September 16, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

बावधनमधील स्टोन क्रशरला विरोधामागे नेमके कोणाचे हितसंबंध? बेकायदेशीर वाळू- मुरूम उपशाला संरक्षण देण्यासाठी ग्रामस्थांचा वापर होत असल्याचा आरोप; राजकीय स्वार्थावरही प्रश्नचिन्ह

mahaanewslive by mahaanewslive
September 5, 2026
in सामाजिक, सुरक्षा, शिक्षण, शेती शिवार, महाराष्ट्र, आरोग्य, आर्थिक, कथा, कामगार जगत, क्राईम डायरी, राजकीय, राज्य, ताज्या बातम्या, पश्चिम महाराष्ट्र, पर्यावरण, व्यक्ती विशेष, Featured
0
पुरंदर तहसील कार्यालयात २५ हजारांची लाच घेताना खासगी माणूस एसीबीच्या जाळ्यात! तहसील कार्यालयाचा ‘पित्त्या’ होता काय?

दौलतराव पिसाळ, वाई : बावधन परिसरातील विकास आणि पर्यावरणाचा समतोल पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. गावाजवळ प्रस्तावित असलेल्या ‘स्टोन क्रशर’ प्रकल्पाला होत असलेल्या विरोधामागे नेमके पर्यावरणाचे हित आहे की काहींचे आर्थिक व राजकीय स्वार्थ, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

सरकारी तज्ज्ञांनी तांत्रिक बाबींचा अभ्यास करून, पर्यावरण व शेतीला धोका होणार नाही अशा नियमानुसार सुरक्षित अंतरावर प्रकल्पाला परवानगी दिल्याचा दावा केला जात आहे. मात्र, त्यानंतरही प्रकल्पाला विरोध होत असून या विरोधासाठी काही ग्रामस्थांना पुढे केले जात असल्याचा आरोप केला जात आहे.

या प्रकरणात गेल्या काही वर्षांपासून परिसरात सुरू असलेल्या कथित बेकायदेशीर वाळू आणि मुरूम उपशाचा मुद्दाही पुढे आला आहे. अधिकृत आणि नियमबद्ध क्रशर प्रकल्प सुरू झाल्यास अशा बेकायदेशीर व्यवसायांना फटका बसण्याची शक्यता असल्याने काही माफिया या विरोधामागे असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

‘शेती उजाड होईल’, ‘पुढच्या पिढीच्या आरोग्याला धोका निर्माण होईल’, अशा भीती निर्माण करणाऱ्या गोष्टी सांगून शेतकऱ्यांना आंदोलन आणि उपोषणासाठी पुढे केले जात आहे. पर्यावरणाच्या नावाने सुरू असलेल्या विरोधावरही प्रश्न उपस्थित केले गेले आहेत. शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात रासायनिक खते आणि कीटकनाशकांचा वापर करणारेच काही घटक आज पर्यावरणाच्या संरक्षणाची भूमिका घेत असल्याचे दिसून येते. शासनाच्या संबंधित यंत्रणांनी प्रकल्पाच्या तांत्रिक आणि पर्यावरणीय बाबी तपासल्यानंतरच परवानगी दिली आहे.

दरम्यान, या प्रकरणात स्थानिक राजकारणाचाही हस्तक्षेप असल्याचा आरोप होत आहे. कायदेशीर पद्धतीने उद्योग सुरू झाल्यास स्थानिक तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतात. परिसरातील आर्थिक हालचालींना चालना मिळू शकते. मात्र, रोजगाराच्या संधी निर्माण झाल्यास तरुण स्वावलंबी होतील आणि राजकीय दबावापासून दूर जातील, या भीतीतून काही राजकीय मंडळी ग्रामस्थांच्या भावनांचा वापर करून विरोधाचे राजकारण करत असल्याचे दिसून येते.

पर्यावरणाचे रक्षण आवश्यकच; मात्र कायदेशीर उद्योगाला विरोध आणि दुसरीकडे बेकायदेशीर वाळू-मुरूम उपशाला संरक्षण, हा विरोधाभास नाही का? असा सवाल उपस्थित करत बावधनमधील ग्रामस्थांनी या संपूर्ण प्रकरणामागील आर्थिक आणि राजकीय हितसंबंध तपासण्याची गरज आहे.
बावधनमधील शेतकरी आणि नागरिकांनी कोणत्याही अफवा किंवा राजकीय दबावाला बळी न पडता प्रकल्पासंदर्भातील वस्तुस्थिती, सरकारी परवानग्या आणि पर्यावरणीय बाबी तपासून भूमिका घ्यावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.

Next Post
बारामतीत बिबट्याचा वाढता वावर… प्रशासन अजून किती झोपणार?

टी.सी. कॉलेज परिसरात अचानक नाकाबंदी; ७८ वाहनचालकांवर कारवाई, ५९ हजारांचा दंड | अल्पवयीनांच्या हातात वाहने देणाऱ्या पालकांनाही इशारा!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उद्यापासून पावसाळी अधिवेशन; सरसकट कर्जमाफी, दुष्काळाचे सावट, विषारी दारूकांड, वाढत्या गुन्हेगारीवरून सरकारची कसोटी

आरोग्य अधिकारी जसे काम करतील; तशाच प्रकारची त्यांना नियुक्ती व जबाबदारी मिळणार..! त्यांची कामगिरीच ठरवेल आरोग्य अधिकाऱ्यांची पुढील जबाबदारी; दरवर्षी होणार गुणांकन

September 7, 2026
सावत्र बहिणीचे घर जाळल्याचा आरोपातील हवा असलेला आरोपी पहाटेच्या सापळ्यात जेरबंद..!

सावत्र बहिणीचे घर जाळल्याचा आरोपातील हवा असलेला आरोपी पहाटेच्या सापळ्यात जेरबंद..!

September 7, 2026
पाच वर्षे वॉरंटला चकवा; अखेर आरोपी पोलिसांच्या जाळ्यात मारहाण व धमकीच्या २०२१ मधील गुन्ह्यात देवेंद्र घोडकेला अटक; न्यायालयीन कोठडी!

पाच वर्षे वॉरंटला चकवा; अखेर आरोपी पोलिसांच्या जाळ्यात मारहाण व धमकीच्या २०२१ मधील गुन्ह्यात देवेंद्र घोडकेला अटक; न्यायालयीन कोठडी!

September 7, 2026
चार दशकांनंतरही शिक्षकांच्या आठवणी ताज्या; १९८६च्या बॅचमधील माजी विद्यार्थ्यांनी ७०० हून अधिक पोस्टकार्डांद्वारे व्यक्त केली कृतज्ञता..!

चार दशकांनंतरही शिक्षकांच्या आठवणी ताज्या; १९८६च्या बॅचमधील माजी विद्यार्थ्यांनी ७०० हून अधिक पोस्टकार्डांद्वारे व्यक्त केली कृतज्ञता..!

September 7, 2026
लेकीसाठी अनवानी पायाने धावणाऱ्या माऊलीच्या मदतीला सचिन तेंडुलकरही सरसावला

लेकीसाठी अनवानी पायाने धावणाऱ्या माऊलीच्या मदतीला सचिन तेंडुलकरही सरसावला

September 7, 2026
साखर कारखान्यांची धुराडी कधी पेटणार? ऑक्टोबर की नोव्हेंबरचा मुहूर्त; बुधवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत निर्णय

साखर कारखान्यांची धुराडी कधी पेटणार? ऑक्टोबर की नोव्हेंबरचा मुहूर्त; बुधवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत निर्णय

September 7, 2026
नगराध्यक्षांच्या वित्तीय अधिकारांना कात्री; नमुना क्र. ६४ वर मुख्याधिकाऱ्यांचीच स्वाक्षरी

नगराध्यक्षांच्या वित्तीय अधिकारांना कात्री; नमुना क्र. ६४ वर मुख्याधिकाऱ्यांचीच स्वाक्षरी

September 7, 2026
भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील पहिला महानायक – आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक!

भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील पहिला महानायक – आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक!

September 7, 2026
दिवे घाटातील अपघातातील गौरव चव्हाणच्या कुटुंबीयांची युगेंद्र पवार यांनी घेतली भेट!

दिवे घाटातील अपघातातील गौरव चव्हाणच्या कुटुंबीयांची युगेंद्र पवार यांनी घेतली भेट!

September 6, 2026
उद्या सोमवारी उजनीकाठच्या ४० गावात मच्छीमारांचे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण..!

उद्या सोमवारी उजनीकाठच्या ४० गावात मच्छीमारांचे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण..!

September 6, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group