• Contact us
  • About us
Wednesday, August 26, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

न्यायालयाने वॉरंट काढूनही पाच जण मिळत नव्हते.. बारामती पोलिसांनी पहाटे पाच वाजल्यापासून धडक मोहीम सुरू केली..!

mahaanewslive by mahaanewslive
August 19, 2026
in यशोगाथा, सामाजिक, सुरक्षा, महाराष्ट्र, आरोग्य, आर्थिक, कथा, कामगार जगत, क्राईम, क्राईम डायरी, राज्य, ताज्या बातम्या, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, पुणे, व्यक्ती विशेष, Featured
0
न्यायालयाने वॉरंट काढूनही पाच जण मिळत नव्हते.. बारामती पोलिसांनी पहाटे पाच वाजल्यापासून धडक मोहीम सुरू केली..!

एकाच दिवशी चार वॉरंटमधील पाच आरोपी जेरबंद; बारामती शहर पोलिसांची पहाटेपासून धडक मोहीम

बारामती : न्यायालयाकडून वारंवार समन्स बजावूनही सुनावणीस गैरहजर राहणाऱ्या आणि अटक वॉरंट प्रलंबित असलेल्या पाच आरोपींच्या मुसक्या आवळण्यात बारामती शहर पोलिसांना यश आले आहे. एकाच दिवशी चार वेगवेगळ्या न्यायालयीन वॉरंटमधील पाच आरोपींना शोधून अटक करत पोलिसांनी न्यायालयीन आदेशाची प्रभावी अंमलबजावणी केली.

पहाटे पाच वाजल्यापासून सुरू करण्यात आलेल्या या विशेष मोहिमेमुळे वॉरंटधारक आरोपींमध्ये चांगलीच खळबळ उडाली. या कारवाईत भोल्या ऊर्फ किशोर बापू भिसे, सनी दत्तात्रय ऊर्फ शिवदत्त गायकवाड, अनिकेत दत्तात्रय ऊर्फ शिवदत्त गायकवाड, गणेश मारुती दळवी आणि मोहसीन इकबाल बागवान या पाच जणांना अटक करण्यात आली.

गोपनीय माहितीच्या आधारे पहाटेपासून शोधमोहीम
न्यायालयीन वॉरंटची अंमलबजावणी करण्यासाठी बारामती शहर पोलीस ठाण्याचे वॉरंट अंमलदार पोलीस हवालदार उदय टापरे यांनी गोपनीय बातमीदारांचे जाळे सक्रिय केले होते. आरोपींच्या वास्तव्याची तसेच त्यांच्या हालचालींची माहिती मिळवल्यानंतर तिची स्थानिक पातळीवर पडताळणी करण्यात आली. त्यानंतर पहाटे पाच वाजल्यापासून पोलिसांच्या पथकाने वेगवेगळ्या ठिकाणी एकाचवेळी शोधमोहीम राबवली. नियोजनबद्ध पद्धतीने कारवाई करत पोलिसांनी पाचही आरोपींना ताब्यात घेतले आणि त्यांच्याविरुद्ध जारी असलेल्या अटक वॉरंटची अंमलबजावणी केली.

कोणत्या प्रकरणात कोणावर वॉरंट?
भोल्या ऊर्फ किशोर बापू भिसे याच्याविरुद्ध बारामती येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयातील सत्र प्रकरण क्रमांक 102/2025 मध्ये भारतीय न्याय संहितेतील कलम 103(1), 61(2), 189(2), 189(4), 191(2), 191(3), 190 अन्वये प्रकरण प्रलंबित आहे. न्यायालयाने 14 ऑगस्ट 2026 रोजी त्याच्याविरुद्ध अटक वॉरंट जारी केले होते.

सनी दत्तात्रय ऊर्फ शिवदत्त गायकवाड आणि अनिकेत दत्तात्रय ऊर्फ शिवदत्त गायकवाड या दोघांविरुद्ध प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालय, बारामती येथील RCC क्रमांक 415/2015 मध्ये Arms Act अंतर्गत प्रकरण प्रलंबित असून त्यांच्याविरुद्ध न्यायालयीन पकड वॉरंट जारी करण्यात आले होते. गणेश मारुती दळवी, रा. डोर्लेवाडी, बारामती, याच्याविरुद्ध प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयातील RCC क्रमांक 277/24 मधील प्रकरणात पकड वॉरंट जारी करण्यात आले होते. तर मोहसीन इकबाल बागवान, रा. कचेरी रोड, बारामती, याच्याविरुद्ध वैष्णवी नगरी पतसंस्था प्रकरणात परक्राम्य लेख अधिनियमाच्या कलम 138 अन्वये खटला प्रलंबित असून न्यायालयाने त्याच्याविरुद्ध अटक वॉरंट जारी केले होते.

पाचही आरोपी न्यायालयासमोर
अटक वॉरंटची अंमलबजावणी केल्यानंतर पोलिसांनी पाचही आरोपींना संबंधित न्यायालयांसमोर हजर केले. न्यायालयाच्या आदेशानुसार त्यांची जेल कस्टडीमध्ये रवानगी करण्यात आली. या कारवाईत पोलीस हवालदार उदय टापरे यांच्यासह पोलीस हवालदार ज्ञानदेव क्षीरसागर, यशवंत पवार, तसेच पोलीस शिपाई गिरीश नेवसे, अक्षय सिताफ आणि तुषार शिंदे यांनी सहभाग घेतला. एकाच दिवशी चार वेगवेगळ्या न्यायालयीन वॉरंटमधील पाच आरोपींचा शोध घेऊन त्यांना अटक करण्यात आल्याने बारामती शहर पोलिसांच्या वॉरंट अंमलबजावणी पथकाच्या कामगिरीचे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कौतुक करण्यात आले.

अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम यांनी पोलीस हवालदार उदय टापरे आणि त्यांच्या पथकाचे अभिनंदन केले आहे. न्यायालयीन आदेश केवळ कागदावर न राहता त्याची वेळेत अंमलबजावणी करण्यासाठी बारामती शहर पोलिसांकडून यापुढेही अशा विशेष मोहिमा राबविण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालखी मार्गावरील अपघात : मृत वारकऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाखांची मदत; जखमींवर मोफत उपचाराची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची सूचना!

पालखी मार्गावरील अपघात : मृत वारकऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाखांची मदत; जखमींवर मोफत उपचाराची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची सूचना!

July 13, 2026
पालखी मार्गावर कसा झाला भीषण अपघात? ट्रकखाली कसे चिरडले वारकरी?

पालखी मार्गावर कसा झाला भीषण अपघात? ट्रकखाली कसे चिरडले वारकरी?

July 13, 2026
जेजुरीजवळ भीषण अपघात; टेम्पोच्या धडकेत तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू, तीन जखमी

जेजुरीजवळ भीषण अपघात; टेम्पोच्या धडकेत तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू, तीन जखमी

July 13, 2026
शॅम्पूपासून दूध, डिटर्जंटचा फेस अन् आरोग्याशी खेळ; फलटण तालुक्यातील होळमध्ये FDAचा दणका!

शॅम्पूपासून दूध, डिटर्जंटचा फेस अन् आरोग्याशी खेळ; फलटण तालुक्यातील होळमध्ये FDAचा दणका!

July 13, 2026
उद्यापासून पावसाळी अधिवेशन; सरसकट कर्जमाफी, दुष्काळाचे सावट, विषारी दारूकांड, वाढत्या गुन्हेगारीवरून सरकारची कसोटी

पुणे जिल्ह्यातील बावडा, सणसरसह चार मंडळ महसूल अधिकाऱ्यांचे निलंबन; बोगस व अनियमित नोंदी प्रकरणी महसूल विभागाची मोठी कारवाई

July 12, 2026
मोशी कचरा डेपो दुर्घटना : ९ कामगारांना जीव गमवावा लागला..जखमी कामगारांची सुप्रिया सुळेंकडून रुग्णालयात भेट; निष्काळजीपणाला जबाबदारांवर कठोर कारवाईची मागणी!

मोशी कचरा डेपो दुर्घटना : ९ कामगारांना जीव गमवावा लागला..जखमी कामगारांची सुप्रिया सुळेंकडून रुग्णालयात भेट; निष्काळजीपणाला जबाबदारांवर कठोर कारवाईची मागणी!

July 12, 2026
आमदार रोहित पवार यांच्या शेतकरी कर्जमाफीच्या संघर्षाची यशोगाथा

आमदार रोहित पवार यांच्या शेतकरी कर्जमाफीच्या संघर्षाची यशोगाथा

July 12, 2026
नववीतील विद्यार्थिनीने दिला बाळाला जन्म; नाशिकमधील आश्रमशाळेत धक्कादायक प्रकार!

नववीतील विद्यार्थिनीने दिला बाळाला जन्म; नाशिकमधील आश्रमशाळेत धक्कादायक प्रकार!

July 11, 2026
बारामती तालुक्यातील ५३ ग्रामपंचायतींची रणधुमाळी; १२ जून रोजी सदस्य आरक्षण सोडत!

SIR आणि गुरुजी आडवे आले? १३ हजार ग्रामपंचायतींच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर?  मतदार पुनरीक्षण (SIR) मुळे जानेवारीनंतरच बिगुल वाजण्याचे संकेत!

July 11, 2026
बारामतीतील सायबर गुन्हेगारीची चौथी घटना! आणखी दोघांची 68 लाखाची फसवणूक!

कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर हल्ला; सहा जणांसह इतरांविरुद्ध गुन्हा, कठोर कारवाईचा इशारा

July 10, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group