• Contact us
  • About us
Tuesday, September 1, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अर्थ-सहकार खात्याचा नकार’ धुडकावून मंत्रिमंडळाचा ‘होकार’; भाजप आमदार अभिमन्यू पवारांच्या कारखान्याला 18 कोटी!

mahaanewslive by mahaanewslive
August 13, 2026
in यशोगाथा, सामाजिक, शेती शिवार, मराठवाडा, आरोग्य, आर्थिक, कथा, राष्ट्रीय, राजकीय, राज्य, रोजगार, ताज्या बातम्या, व्यक्ती विशेष, Featured
0
अर्थ-सहकार खात्याचा नकार’ धुडकावून मंत्रिमंडळाचा ‘होकार’; भाजप आमदार अभिमन्यू पवारांच्या कारखान्याला 18 कोटी!

मुंबई : महान्यूज लाईव्ह

अर्थ खाते आणि सहकार विभागाने नकारात्मक शेरा दिलेला असतानाही भाजप आमदार अभिमन्यू पवार यांच्याशी संबंधित किल्लारी येथील श्री निळकंठेश्वर शेतकरी सहकारी साखर कारखान्याला तब्बल 18 कोटी रुपयांचे कर्ज देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

विशेष म्हणजे संबंधित प्रस्तावावर दोन्ही विभागांनी प्रतिकूल भूमिका घेतली असतानाही मंत्रिमंडळाने कर्जाला मंजुरी दिल्याचे खुद्द सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे या कर्जमंजुरीवरून आता राजकीय तसेच प्रशासकीय वर्तुळात प्रश्न उपस्थित झाले आहेत.

किल्लारी येथील श्री निळकंठेश्वर शेतकरी सहकारी साखर कारखाना हा आमदार अभिमन्यू पवार यांच्याशी संबंधित आहे. कारखान्याच्या आर्थिक पुनरुज्जीवनासाठी यापूर्वीही विविध माध्यमांतून कर्ज व आर्थिक मदतीचे निर्णय झाले आहेत. आता पुन्हा सुमारे 18 कोटी रुपयांच्या कर्जाला मंजुरी देण्यात आल्याने या निर्णयाची चर्चा रंगली आहे.

अर्थ व सहकार विभागाचा ‘नकारात्मक’ शेरा

या संपूर्ण प्रकरणातील सर्वाधिक चर्चेचा मुद्दा म्हणजे कर्ज प्रस्तावावर अर्थ खाते आणि सहकार विभागाने नकारात्मक शेरा दिल्याचा सहकारमंत्र्यानी खुलासा केला आहे. सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी सांगितले की, संबंधित प्रस्तावावर विभागांनी नकारात्मक भूमिका घेतली होती. मात्र, कर्ज कोणाला द्यायचे आणि कोणाला द्यायचे नाही, याचा अंतिम निर्णय मंत्रिमंडळाचा असतो.

त्यामुळे मंत्रिमंडळाने संबंधित कारखान्याला कर्ज देण्याचा निर्णय घेतला. सहकारमंत्र्यांच्या या वक्तव्यामुळे आता प्रशासकीय स्तरावर नकारात्मक शेरा नेमका कोणत्या कारणांमुळे देण्यात आला होता, त्या आक्षेपांवर मंत्रिमंडळात कोणती चर्चा झाली आणि त्यानंतर निर्णय कसा बदलला याबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत.

दोन-तीन ठिकाणी कर्जे; एकाच ठिकाणाहून कर्ज देण्याचा युक्तिवाद

बाबासाहेब पाटील यांच्या म्हणण्यानुसार, अभिमन्यू पवार यांच्या कारखान्याची दोन-तीन ठिकाणी कर्जे आहेत. त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणचे कर्ज एकत्रित करून एकाच संस्थेमार्फत कर्ज मिळावे, अशी कारखान्याची भूमिका होती. त्यातून राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ अर्थात NCDC मार्फत कर्ज देण्याचा मार्ग निवडण्यात आला. NCDC कडून कर्ज मिळण्यासाठी राज्य शासनाची भूमिका आणि हमी महत्त्वाची ठरते. त्यामुळे या प्रकरणात मंत्रिमंडळाने दिलेली मंजुरी आर्थिकदृष्ट्या आणि प्रशासकीयदृष्ट्या महत्त्वाची मानली जात आहे.

यापूर्वीही 50 कोटींच्या कर्जाची चर्चा
किल्लारी येथील या कारखान्याला यापूर्वीही NCDC मार्फत मोठ्या कर्जाचा प्रस्ताव देण्यात आला होता. 2023 मध्ये भाजप आमदार अभिमन्यू पवार यांच्याशी संबंधित या कारखान्यासाठी 50 कोटी रुपयांच्या NCDC कर्जाचा प्रस्ताव चर्चेत होता. राज्यातील इतर राजकीय नेत्यांशी संबंधित साखर कारखान्यांसोबत या कारखान्याचाही NCDC कर्जाच्या यादीत समावेश करण्यात आला होता. त्यामुळे आता पुन्हा 18 कोटी रुपयांच्या कर्जाला मंजुरी मिळाल्याने कारखान्याला यापूर्वी मिळालेल्या कर्जाची रक्कम, त्याची परतफेड, सध्याची थकबाकी आणि नवीन कर्जाचा वापर याबाबतही चर्चा सुरू झाली आहे.

सत्ताधारी आमदारांच्या कारखान्यांसाठी नियम धाब्यावर?

अर्थ-सहकार खात्याने नकारात्मक शेरा दिलेला असतानाही सत्ताधारी आमदार अभिमन्यू पवार यांच्या कारखान्याला १८ कोटींचे कर्ज मंजूर झाल्याने आता सत्ताधारी आमदारांच्या कारखान्यांसाठी नियम धाब्यावर बसवले जातात का? असा सवाल उपस्थित होत आहे. एका बाजूला सर्वसामान्य आणि इतर सहकारी संस्थांसाठी नियमांची कठोर अंमलबजावणी केली जाते तर दुसऱ्या बाजूला सत्ताधाऱ्यांशी संबंधित कारखान्यांच्या बाबतीत नियमांना बगल का दिली जाते? हा प्रश्न या कर्जमंजुरीने ऐरणीवर आला आहे.

Next Post
५०० रूपयाच्या लाचेवर मॉक इंटरव्ह्यूत दिलं भलंमोठं प्रामाणिकपणाचं ज्ञान; पण IPS काय झाला, गड्यानं १ कोटींची लाचखोरी केली!

५०० रूपयाच्या लाचेवर मॉक इंटरव्ह्यूत दिलं भलंमोठं प्रामाणिकपणाचं ज्ञान; पण IPS काय झाला, गड्यानं १ कोटींची लाचखोरी केली!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालखी मार्गावरील अपघात : मृत वारकऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाखांची मदत; जखमींवर मोफत उपचाराची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची सूचना!

पालखी मार्गावरील अपघात : मृत वारकऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाखांची मदत; जखमींवर मोफत उपचाराची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची सूचना!

July 13, 2026
पालखी मार्गावर कसा झाला भीषण अपघात? ट्रकखाली कसे चिरडले वारकरी?

पालखी मार्गावर कसा झाला भीषण अपघात? ट्रकखाली कसे चिरडले वारकरी?

July 13, 2026
जेजुरीजवळ भीषण अपघात; टेम्पोच्या धडकेत तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू, तीन जखमी

जेजुरीजवळ भीषण अपघात; टेम्पोच्या धडकेत तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू, तीन जखमी

July 13, 2026
शॅम्पूपासून दूध, डिटर्जंटचा फेस अन् आरोग्याशी खेळ; फलटण तालुक्यातील होळमध्ये FDAचा दणका!

शॅम्पूपासून दूध, डिटर्जंटचा फेस अन् आरोग्याशी खेळ; फलटण तालुक्यातील होळमध्ये FDAचा दणका!

July 13, 2026
उद्यापासून पावसाळी अधिवेशन; सरसकट कर्जमाफी, दुष्काळाचे सावट, विषारी दारूकांड, वाढत्या गुन्हेगारीवरून सरकारची कसोटी

पुणे जिल्ह्यातील बावडा, सणसरसह चार मंडळ महसूल अधिकाऱ्यांचे निलंबन; बोगस व अनियमित नोंदी प्रकरणी महसूल विभागाची मोठी कारवाई

July 12, 2026
मोशी कचरा डेपो दुर्घटना : ९ कामगारांना जीव गमवावा लागला..जखमी कामगारांची सुप्रिया सुळेंकडून रुग्णालयात भेट; निष्काळजीपणाला जबाबदारांवर कठोर कारवाईची मागणी!

मोशी कचरा डेपो दुर्घटना : ९ कामगारांना जीव गमवावा लागला..जखमी कामगारांची सुप्रिया सुळेंकडून रुग्णालयात भेट; निष्काळजीपणाला जबाबदारांवर कठोर कारवाईची मागणी!

July 12, 2026
आमदार रोहित पवार यांच्या शेतकरी कर्जमाफीच्या संघर्षाची यशोगाथा

आमदार रोहित पवार यांच्या शेतकरी कर्जमाफीच्या संघर्षाची यशोगाथा

July 12, 2026
नववीतील विद्यार्थिनीने दिला बाळाला जन्म; नाशिकमधील आश्रमशाळेत धक्कादायक प्रकार!

नववीतील विद्यार्थिनीने दिला बाळाला जन्म; नाशिकमधील आश्रमशाळेत धक्कादायक प्रकार!

July 11, 2026
बारामती तालुक्यातील ५३ ग्रामपंचायतींची रणधुमाळी; १२ जून रोजी सदस्य आरक्षण सोडत!

SIR आणि गुरुजी आडवे आले? १३ हजार ग्रामपंचायतींच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर?  मतदार पुनरीक्षण (SIR) मुळे जानेवारीनंतरच बिगुल वाजण्याचे संकेत!

July 11, 2026
बारामतीतील सायबर गुन्हेगारीची चौथी घटना! आणखी दोघांची 68 लाखाची फसवणूक!

कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर हल्ला; सहा जणांसह इतरांविरुद्ध गुन्हा, कठोर कारवाईचा इशारा

July 10, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group