बारामती : महान्यूज लाईव्ह
बारामतीत काल झालेल्या विविध प्रयोग शाळांमधील तपासण्यांमध्ये २१ जण कोरोना बाधित आढळून आले आहेत. बारामतीतील कोरोनाचा आलेख दिवसेंदिवस घसरत असून हा बारामतीकरांना चांगला दिलासा मिळाला आहे.
अर्थात गावा-गावात होत असलेल्या माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेत मात्र कोरोना बाधित आढळत आहेत. काल वाणेवाडी येथे झालेल्या या मोहिमेत 14 जण तर मगरवाडी येथे एक जण कोरोना बाधित आढळून आला आहेत. त्यामुळे बारामती तालुक्यात काल दिवसभरात 36 जण कोरोना बाधित आढळून आले आहेत.
बारामतीतील शासकीय आरटीपीसीआर तपासणीत आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये बारामतीतील 74 वर्षीय महिला, निरावागज येथील 60 वर्षीय पुरुष, प्रबुद्ध नगर येथील 30 वर्षीय पुरुष, पणदरे येथील 75 वर्षीय महिला, माळेगाव बुद्रुक येथील 60 वर्षीय महिला रुग्णाचा समावेश आहे.
बारामतीत मंगल लॅबोरेटरी येथे तपासलेल्या कोरोना नमुन्यात आनंदनगर भिगवण रोड येथील 68 वर्षीय महिला, गुणवडी रोड अंनाई बंगला येथील 74 वर्षीय पुरुष, 64 वर्षीय महिला, 34 वर्षीय पुरुष, एमआयडीसी येथील 50 वर्षीय महिला, 24 वर्षीय महिला, वडगाव निंबाळकर येथील तीस वर्षीय पुरुष, लाटे माळवाडी येथील 55 वर्षीय पुरुष रुग्णाचा समावेश आहे.
बारामतीतील शासकीय रॅपिड तपासणीत कुरवली येथील 34 वर्षीय पुरुष बयाजी नगर येथील 40 वर्षीय महिला निरगुडे येथील 55 वर्षीय महिला गुणवडी येथील 22 वर्षीय महिला तांबे नगर येथील 40 वर्षीय पुरुष काराटी येथील 76 वर्षीय पुरुष कांचन नगर येथील 52 वर्षीय महिला रुग्णाचा समावेश आहे
इंदापूर तालुक्यात कालही १७ जणच कोरोनाबाधित
इंदापूर तालुक्यात काल देखील आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये १७ जणांचा समावेश आहे. काल इंदापूर तालुक्यात आरटीपीसीआर व रॅपीड अॅंटिजेनच्या ५९ जणांच्या तपासण्या झाल्या. त्यामध्ये हे १७ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत.
यामध्ये भरणेवाडी येथील १२ वर्षीय मुलगा, २८ वर्षीय महिला, इंदापूर येथील ४२ वर्षीय पुरूष, वडापुरी येतील ३२ वर्शषीय महिला, १० वर्षीय मुलगी, गलांडवाडी नंबर येथील २३ वर्षीय महिला, २१ वर्षीय महिला, शेटफळगढे येथील ४३ वर्षीय पुरूष रूग्णाचा समावेश आहे.
सणसर येथील ७९ वर्षीय पुरूष, काटी येथील ४० वर्षीय पुरूष, ३६ वर्षीय पुरूष, माळवाडी नंबर १ येथील २८ वर्षीय पुरूष, वाबळेवस्ती, शेटफळगढे येथील ८० वर्षीय पुरूष, लासुर्णे येथील ७२ वर्षीय पुरूष, अंथुर्णे येथील ४ वर्षीय मुलगी, भिगवण येथील ४० वर्षीय पुरूष, कुरवली येथील 34 वर्षीय पुरुष निरगुडे येथील 55 वर्षीय महिला रुग्णाचा समावेश आहे.











