• Contact us
  • About us
Friday, July 24, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

बारामती नगरपरिषदेच्या अत्याधुनिक सीवर सक्शन- जेटिंग- डीवॉटरिंग मशीनचे सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत लोकार्पण

mahaanewslive by mahaanewslive
July 23, 2026
in यशोगाथा, महिला विश्व, महाराष्ट्र, आरोग्य, आर्थिक, कथा, कामगार जगत, राजकीय, राज्य, ताज्या बातम्या, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, Featured
0
बारामती नगरपरिषदेच्या अत्याधुनिक सीवर सक्शन- जेटिंग- डीवॉटरिंग मशीनचे सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत लोकार्पण

बारामती : बारामती शहराची स्वच्छता व्यवस्था अधिक आधुनिक, सुरक्षित आणि कार्यक्षम करण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलत बारामती नगरपरिषदेला प्राप्त झालेल्या अत्याधुनिक कंबाईंड सीवर सक्शन, जेटिंग व डीवॉटरिंग मशीनचे लोकार्पण राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, बारामती येथे करण्यात आले.

सुमारे १ कोटी रुपये किमतीचे हे अत्याधुनिक मशीन स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देणारे असून, शहरातील खोल मॅनहोल, भूमिगत गटारे, सिव्हर लाईन, सेप्टिक टाक्या आणि आपत्कालीन पाणी उपसा यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. राज्य शासनाच्या “मॅनहोलकडून मशीनहोलकडे” या योजनेअंतर्गत उपलब्ध झालेल्या या मशीनमुळे आता स्वच्छता कर्मचाऱ्यांना जीव धोक्यात घालून गटारात उतरावे लागणार नाही. आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने स्वच्छता अधिक सुरक्षित, जलद आणि प्रभावीपणे केली जाणार आहे.

यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्याची गरज अधोरेखित करत, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून नागरिकांना अधिक दर्जेदार नागरी सुविधा उपलब्ध करून देण्याचा शासनाचा निर्धार व्यक्त केला. बारामतीच्या वाढत्या गरजा लक्षात घेऊन या अत्याधुनिक मशीनसाठी नगराध्यक्ष सचिन सातव, आरोग्य सभापती नवनाथ बल्लाळ आणि मुख्याधिकारी पंकज भुसे यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नांना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याने ही सुविधा बारामतीला उपलब्ध झाली.

या प्रसंगी नगराध्यक्ष सचिन सातव, उपनगराध्यक्ष श्वेता नाळे, मुख्याधिकारी पंकज भुसे, आरोग्य सभापती नवनाथ बल्लाळ, आरोग्य प्रमुख स्वरूप आहिवळे, आरोग्य निरीक्षक अजय लालबिगे, उपमुख्याधिकारी तथा वाहन विभाग प्रमुख योगिता दरेकर, नगरसेवक संजय संघवी, अमर धुमाळ, विशाल हिंगणे, आरती शेंडगे, अनुप्रिता डांगे-ताबे, प्रवीण माने, राजेंद्र सोनवणे, गोरख पारसे, अविनाश निकाळजे, सोमनाथ गजाकस, गणेश जोजारे, समीर चव्हाण, अक्षय डांगे, योगेश नाळे तसेच नगरपरिषदेचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.


सुनेत्रा पवार, उपमुख्यमंत्री : स्वच्छता कर्मचाऱ्यांची सुरक्षितता ही आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून त्यांना सुरक्षित कार्यपरिसर उपलब्ध करून देणे आणि नागरिकांना अधिक दर्जेदार स्वच्छता सेवा देणे, हा शासनाचा प्राधान्यक्रम आहे. बारामतीच्या विकासासाठी आणि नागरिकांच्या सुविधांसाठी आवश्यक असलेल्या प्रत्येक बाबतीत शासन सकारात्मक राहील.”

सचिन सातव, नगराध्यक्ष : आदरणीय स्वर्गीय अजितदादांनी बारामतीमध्ये स्वच्छतेला नेहमीच सर्वोच्च प्राधान्य दिले. त्याच विचारांचा वारसा पुढे नेत आदरणीय उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी पवार यांनी बारामतीला ही अत्याधुनिक मशीन उपलब्ध करून दिली. यामुळे स्वच्छता कर्मचाऱ्यांची सुरक्षितता वाढेल, कामाची गती वाढेल आणि बारामतीची स्वच्छता व्यवस्था अधिक सक्षम बनेल.”

नवनाथ बल्लाळ आरोग्य सभापती : बारामतीच्या वाढत्या गरजा लक्षात घेऊन आधुनिक मशीनची आवश्यकता आम्ही सातत्याने मांडली. आदरणीय उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी पवार यांनी तातडीने निर्णय घेत बारामतीला ही सुविधा उपलब्ध करून दिली. ही मशीन म्हणजे केवळ एक यंत्र नसून स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेची हमी आणि आधुनिक, सक्षम बारामतीच्या दिशेने टाकलेले महत्त्वपूर्ण पाऊल आहे.”

पंकज भुसे, मुख्याधिकारी बारामती : नगरपरिषदेची वाढती व्याप्ती, सिव्हर यंत्रणेचा विस्तार आणि स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेची गरज लक्षात घेता अत्याधुनिक कंबाईंड सीवर सक्शन, जेटिंग व डीवॉटरिंग मशीनची आवश्यकता होती. नगराध्यक्ष श्री. सचिन सातव आणि आरोग्य सभापती श्री. नवनाथ बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. आदरणीय उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी पवार यांनी सकारात्मक निर्णय घेत ही अत्याधुनिक सुविधा बारामतीला उपलब्ध करून दिली. या मशीनमुळे स्वच्छता कामांची गुणवत्ता, गती आणि सुरक्षितता मोठ्या प्रमाणात वाढणार असून नागरिकांना अधिक परिणामकारक सेवा देता येणार आहे.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालखी मार्गावरील अपघात : मृत वारकऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाखांची मदत; जखमींवर मोफत उपचाराची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची सूचना!

पालखी मार्गावरील अपघात : मृत वारकऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाखांची मदत; जखमींवर मोफत उपचाराची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची सूचना!

July 13, 2026
पालखी मार्गावर कसा झाला भीषण अपघात? ट्रकखाली कसे चिरडले वारकरी?

पालखी मार्गावर कसा झाला भीषण अपघात? ट्रकखाली कसे चिरडले वारकरी?

July 13, 2026
जेजुरीजवळ भीषण अपघात; टेम्पोच्या धडकेत तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू, तीन जखमी

जेजुरीजवळ भीषण अपघात; टेम्पोच्या धडकेत तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू, तीन जखमी

July 13, 2026
शॅम्पूपासून दूध, डिटर्जंटचा फेस अन् आरोग्याशी खेळ; फलटण तालुक्यातील होळमध्ये FDAचा दणका!

शॅम्पूपासून दूध, डिटर्जंटचा फेस अन् आरोग्याशी खेळ; फलटण तालुक्यातील होळमध्ये FDAचा दणका!

July 13, 2026
उद्यापासून पावसाळी अधिवेशन; सरसकट कर्जमाफी, दुष्काळाचे सावट, विषारी दारूकांड, वाढत्या गुन्हेगारीवरून सरकारची कसोटी

पुणे जिल्ह्यातील बावडा, सणसरसह चार मंडळ महसूल अधिकाऱ्यांचे निलंबन; बोगस व अनियमित नोंदी प्रकरणी महसूल विभागाची मोठी कारवाई

July 12, 2026
मोशी कचरा डेपो दुर्घटना : ९ कामगारांना जीव गमवावा लागला..जखमी कामगारांची सुप्रिया सुळेंकडून रुग्णालयात भेट; निष्काळजीपणाला जबाबदारांवर कठोर कारवाईची मागणी!

मोशी कचरा डेपो दुर्घटना : ९ कामगारांना जीव गमवावा लागला..जखमी कामगारांची सुप्रिया सुळेंकडून रुग्णालयात भेट; निष्काळजीपणाला जबाबदारांवर कठोर कारवाईची मागणी!

July 12, 2026
आमदार रोहित पवार यांच्या शेतकरी कर्जमाफीच्या संघर्षाची यशोगाथा

आमदार रोहित पवार यांच्या शेतकरी कर्जमाफीच्या संघर्षाची यशोगाथा

July 12, 2026
नववीतील विद्यार्थिनीने दिला बाळाला जन्म; नाशिकमधील आश्रमशाळेत धक्कादायक प्रकार!

नववीतील विद्यार्थिनीने दिला बाळाला जन्म; नाशिकमधील आश्रमशाळेत धक्कादायक प्रकार!

July 11, 2026
बारामती तालुक्यातील ५३ ग्रामपंचायतींची रणधुमाळी; १२ जून रोजी सदस्य आरक्षण सोडत!

SIR आणि गुरुजी आडवे आले? १३ हजार ग्रामपंचायतींच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर?  मतदार पुनरीक्षण (SIR) मुळे जानेवारीनंतरच बिगुल वाजण्याचे संकेत!

July 11, 2026
बारामतीतील सायबर गुन्हेगारीची चौथी घटना! आणखी दोघांची 68 लाखाची फसवणूक!

कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर हल्ला; सहा जणांसह इतरांविरुद्ध गुन्हा, कठोर कारवाईचा इशारा

July 10, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group