• Contact us
  • About us
Friday, July 24, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पुणे ते बारामती राष्ट्रीय सायकल स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद; मणिपूरच्या अथोकपाम बाईक सिंगेचा विजयी झेंडा, कर्नाटकचा श्रीनिवास राजपूत ठरला ‘राष्ट्रीय घाटाचा राजा’

mahaanewslive by mahaanewslive
July 22, 2026
in यशोगाथा, सामाजिक, शिक्षण, महिला विश्व, महाराष्ट्र, आरोग्य, आर्थिक, कथा, क्रीडा, राष्ट्रीय, राजकीय, राज्य, ताज्या बातम्या, लाईव्ह, पश्चिम महाराष्ट्र, पर्यावरण, प्रवास, पुणे, पुणे, व्यक्ती विशेष, Featured
0
पुणे ते बारामती राष्ट्रीय सायकल स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद; मणिपूरच्या अथोकपाम बाईक सिंगेचा विजयी झेंडा, कर्नाटकचा श्रीनिवास राजपूत ठरला ‘राष्ट्रीय घाटाचा राजा’

बारामती : पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे भूतपूर्व अध्यक्ष, महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री तसेच ऑलिम्पिक असोसिएशनचे माजी अध्यक्ष दिवंगत अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या पुणे ते बारामती राष्ट्रीय व राज्यस्तरीय सायकल स्पर्धेला देशभरातील स्पर्धकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया (नवी दिल्ली), सायकल असोसिएशन ऑफ महाराष्ट्र आणि पुणे जिल्हा शिक्षण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या स्पर्धेत तब्बल ४२५ राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय आणि राज्यस्तरीय सायकलपटूंनी सहभाग घेत स्पर्धेला राष्ट्रीय दर्जा प्राप्त करून दिला. या भव्य स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा बारामतीतील गदिमा सभागृहात महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष आण्णा बनसोडे यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

यावेळी विजेत्या खेळाडूंचा सन्मान करण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी स्पर्धकांच्या जिद्दीचे आणि उत्कृष्ट कामगिरीचे कौतुक करत ही स्पर्धा महाराष्ट्राच्या क्रीडा क्षेत्रासाठी प्रेरणादायी ठरत असल्याचे सांगितले.
यावेळी बोलताना विधानसभा उपाध्यक्ष आण्णा बनसोडे म्हणाले, “दिवंगत अजितदादा पवार हे शेतकरी, कष्टकरी, बहुजन आणि सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी आयुष्यभर झटणारे नेतृत्व होते.

फुले-शाहू-आंबेडकर यांच्या पुरोगामी विचारांचा वारसा त्यांनी कृतीतून जपला. जाती-पातीचा विचार न करता समाजातील वंचित घटकांच्या मदतीसाठी ते सदैव धावून जात असत. पिंपरी-चिंचवडसह राज्यभर त्यांनी केलेला विकास आजही त्यांच्या कार्याची साक्ष देतो. माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला त्यांनी मोठी संधी दिली, हे मी कधीही विसरणार नाही.”

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे मानद सचिव ॲड. संदीप कदम यांनी सांगितले की, दिवंगत अजितदादा पवार यांच्या प्रेरणेतून सुरू झालेल्या या स्पर्धेचे यंदा दहावे वर्ष असून दरवर्षी या स्पर्धेचा दर्जा उंचावत आहे. राष्ट्रीय, राज्य आणि विविध गटांमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेसाठी देशभरातील नामांकित सायकलपटूंनी सहभाग नोंदविला.

स्पर्धेचे नियोजन अत्यंत सूक्ष्म पातळीवर करण्यात आले असून सायकल असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी सर्व तांत्रिक बाबींची उत्कृष्ट जबाबदारी पार पाडल्यामुळे स्पर्धा यशस्वी ठरली. अशा स्पर्धांमुळे ग्रामीण भागातील युवकांमध्ये क्रीडाविषयी आकर्षण निर्माण होत असून राष्ट्रीय स्तरावर झेप घेण्याची प्रेरणा मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले.

स्पर्धेतील सर्वाधिक प्रतिष्ठेचा मानला जाणारा दिवे घाटातील ‘राष्ट्रीय घाटाचा राजा’ हा किताब कर्नाटकच्या श्रीनिवास राजपूत यांनी अवघ्या ८ मिनिटे ३२ सेकंदांत घाट सर करून पटकावला. राज्यस्तरीय गटात हा किताब महाराष्ट्राच्या निहाल नदाफ यांनी ८ मिनिटे ४० सेकंदांत जिंकला.

१२२ किलोमीटरच्या पुणे ते बारामती राष्ट्रीय पुरुष गटात मणिपूरच्या अथोकपाम बाईक सिंगे यांनी २ तास २९ मिनिटे अशी प्रभावी वेळ नोंदवत प्रथम क्रमांक पटकावला आणि स्पर्धेचे मानकरी ठरले. तामिळनाडूच्या जोएल सुंदराम यांनी द्वितीय, तर गुजरातच्या ध्रुव दिया यांनी तृतीय क्रमांक मिळवला.
राज्यस्तरीय पुरुष गटात अमन तांबोळी यांनी विजेतेपद पटकावत महाराष्ट्राचा झेंडा उंचावला. हनुमान चोपडे यांनी द्वितीय, तर रेहान शेख यांनी तृतीय क्रमांक मिळवला.

सासवड ते बारामती एमटीबी खुल्या राज्यस्तरीय स्पर्धेत ओंकार खेडकर यांनी प्रथम क्रमांक मिळवला. त्यांच्यामागोमाग स्वराज कराळे आणि वेदांत टिळेकर यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला.
महिलांच्या माळेगाव ते बारामती राष्ट्रीय स्पर्धेत कर्नाटकच्या गंगा दांडीन यांनी प्रथम क्रमांक मिळवत उत्कृष्ट कामगिरी केली. महाराष्ट्राच्या योगेश्वरी कदम यांनी द्वितीय, तर राजनंदिनी सोमवंशी यांनी तृतीय क्रमांक मिळवला.

सासवड-बारामती सायक्लोथॉन स्पर्धेत अनुप पवार यांनी प्रथम, अक्रम देवकाते यांनी द्वितीय आणि खदुस शेख यांनी तृतीय क्रमांक पटकावला. कार्यक्रमाच्या प्रारंभी माळसकांत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आकर्षक योगासनांचे सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली.

या समारंभास पुणे जिल्हा परिषद अध्यक्ष विरधवल जगदाळे, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर, बारामती नगरपरिषदेचे नगराध्यक्ष सचिन सातव, उपाध्यक्षा श्वेता नाळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संभाजी होळकर, रमेश जगताप, संगीता कोकरे, सुयोग सातपुते, संदीप बांदल, अॅड. किरण इंगळे, प्रवीण पाटील, प्राचार्य देविदास वायदंडे, विश्वास देवकाते, विजय कोलते, डॉ. शंतनू जगदाळे, अशोक खळदकर, प्राचार्य भरत शिंदे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष राजेंद्र घाडगे, मानद सचिव ॲड. संदीप कदम, खजिनदार ॲड. मोहनराव देशमुख, उपसचिव एल. एम. पवार, सहसचिव ए. एम. जाधव, सायकल असोसिएशनचे सचिव संजय साठे, दिपाली पाटील, श्रीनाथ थोरात, सुदाम रोकडे तसेच पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या सर्व शाळा-महाविद्यालयांचे प्राचार्य, मुख्याध्यापक, क्रीडा शिक्षक, शिक्षक, विद्यार्थी आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. स्पर्धेस विद्या प्रतिष्ठान, बारामती आणि एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडिया यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. नितीन लगड आणि प्रा. संध्याराणी आटोळे यांनी केले, तर नगराध्यक्ष सचिन सातव यांनी आभार प्रदर्शन करून समारोप केला. राष्ट्रीय स्तरावरील या स्पर्धेमुळे बारामतीची क्रीडा क्षेत्रातील ओळख अधिक भक्कम झाली असून, युवकांमध्ये सायकलिंगसारख्या आरोग्यदायी आणि साहसी क्रीडेबद्दल नवचैतन्य निर्माण झाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालखी मार्गावरील अपघात : मृत वारकऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाखांची मदत; जखमींवर मोफत उपचाराची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची सूचना!

पालखी मार्गावरील अपघात : मृत वारकऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाखांची मदत; जखमींवर मोफत उपचाराची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची सूचना!

July 13, 2026
पालखी मार्गावर कसा झाला भीषण अपघात? ट्रकखाली कसे चिरडले वारकरी?

पालखी मार्गावर कसा झाला भीषण अपघात? ट्रकखाली कसे चिरडले वारकरी?

July 13, 2026
जेजुरीजवळ भीषण अपघात; टेम्पोच्या धडकेत तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू, तीन जखमी

जेजुरीजवळ भीषण अपघात; टेम्पोच्या धडकेत तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू, तीन जखमी

July 13, 2026
शॅम्पूपासून दूध, डिटर्जंटचा फेस अन् आरोग्याशी खेळ; फलटण तालुक्यातील होळमध्ये FDAचा दणका!

शॅम्पूपासून दूध, डिटर्जंटचा फेस अन् आरोग्याशी खेळ; फलटण तालुक्यातील होळमध्ये FDAचा दणका!

July 13, 2026
उद्यापासून पावसाळी अधिवेशन; सरसकट कर्जमाफी, दुष्काळाचे सावट, विषारी दारूकांड, वाढत्या गुन्हेगारीवरून सरकारची कसोटी

पुणे जिल्ह्यातील बावडा, सणसरसह चार मंडळ महसूल अधिकाऱ्यांचे निलंबन; बोगस व अनियमित नोंदी प्रकरणी महसूल विभागाची मोठी कारवाई

July 12, 2026
मोशी कचरा डेपो दुर्घटना : ९ कामगारांना जीव गमवावा लागला..जखमी कामगारांची सुप्रिया सुळेंकडून रुग्णालयात भेट; निष्काळजीपणाला जबाबदारांवर कठोर कारवाईची मागणी!

मोशी कचरा डेपो दुर्घटना : ९ कामगारांना जीव गमवावा लागला..जखमी कामगारांची सुप्रिया सुळेंकडून रुग्णालयात भेट; निष्काळजीपणाला जबाबदारांवर कठोर कारवाईची मागणी!

July 12, 2026
आमदार रोहित पवार यांच्या शेतकरी कर्जमाफीच्या संघर्षाची यशोगाथा

आमदार रोहित पवार यांच्या शेतकरी कर्जमाफीच्या संघर्षाची यशोगाथा

July 12, 2026
नववीतील विद्यार्थिनीने दिला बाळाला जन्म; नाशिकमधील आश्रमशाळेत धक्कादायक प्रकार!

नववीतील विद्यार्थिनीने दिला बाळाला जन्म; नाशिकमधील आश्रमशाळेत धक्कादायक प्रकार!

July 11, 2026
बारामती तालुक्यातील ५३ ग्रामपंचायतींची रणधुमाळी; १२ जून रोजी सदस्य आरक्षण सोडत!

SIR आणि गुरुजी आडवे आले? १३ हजार ग्रामपंचायतींच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर?  मतदार पुनरीक्षण (SIR) मुळे जानेवारीनंतरच बिगुल वाजण्याचे संकेत!

July 11, 2026
बारामतीतील सायबर गुन्हेगारीची चौथी घटना! आणखी दोघांची 68 लाखाची फसवणूक!

कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर हल्ला; सहा जणांसह इतरांविरुद्ध गुन्हा, कठोर कारवाईचा इशारा

July 10, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group