बारामती : महान्यूज लाईव्ह
बारामती तालुक्यात काल विविध तपासण्यांमध्ये आजही चाळीशीच्या आत कोरोनाबाधित आढळून आले आहेत. याखेरीज काल वाणेवाडी येथे झालेल्या रॅपीड अॅंटिजेन अॅक्टिव्ह कॅम्पमध्ये ११ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. त्यामुळे बारामती तालुक्यात कोरोनाचा आलेख उतरतो आहे, मात्र कोरोनाचा प्रभाव अजूनही तेवढाच कायम आहे.
बारामतीतील शासकीय आरटीपीसीआर तपासणीत स्टेशन रोड येथील ५४ वर्षीय महिला, २७ वर्षीय पुरूष, सांगवी येथील ८५ वर्षीय महिला, वडगाव निंबाळकर येथील ४८ वर्षीय महिला, सोमेश्वरनगर येथील २४ वर्षीय महिला, २४ वर्षीय महिला, ४० वर्षीय महिला, ७१ वर्षीय पुरूष कोरोनाबाधित आढळून आले आहेत.
सुपेनजिक खैरेपडळ येथील ४४ वर्षीय पुरूष, ६२ वर्षीय महिला, ४० वर्षीय महिला, १८ वर्षीय महिला, पणदरे येथील ५६ वर्षीय पुरूष, ४८ वर्षीय महिला, २४ वर्षीय पुरूष, ३१ वर्षीय पुरूष, आंबी बुद्रुक येथील ३० वर्षीय महिला कोरोनाबाधित आढळून आले आहेत.
बारामतीतील शासकीय अॅंटिजेन तपासणीत बारामती शहरातील २८ वर्षीय पुरूष, खताळपट्टा येथील ५६ वर्षीय पुरूष, एमआयडीसीतील ७२ वर्षीय महिला, जळोची येथील २७ वर्षीय महिला कोरोनाबाधित आढळून आली आहे.
बारामतीतील मंगल लॅबोरेटरीने केलेल्या आरटीपीसीआर तपासणीत वाणेवाडी येथील ६६ वर्षीय पुरूष, माळेगाव येथील २५ वर्षीय पुरूष, लाटे येथील ५४ वर्षीय पुरूष, सोमेश्वरनगर येथील ५१ वर्षीय पुरूष,जळोची येथील ७० वर्षीय पुरूष, रुई येथील ८० वर्षीय पुरूष कोरोनाबाधित आढळून आले आहेत.
इंदापूर तालुक्यात काल १७ जणांना कोरोनाची लागण
इंदापूर तालुक्यातील कोरोनाचा आलेख आता जून-जुलै प्रमाणे कमी झाला आहे. काल इंदापूर तालु्क्यात केवळ १७ कोरोनाबाधित आढळले आहेत.
इंदापूर तालुक्यात काल आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये वालचंदनगर येथील ४० वर्षीय महिला, ३२ वर्षीय महिला, १४ वर्षीय मुलगी, १० वर्षीय मुलगा, ३३ वर्षीय पुरूष, ८८ वर्षीय पुरूष, कळंब येथील ५९ वर्षीय पुरूष, वडापुरी येथील ४७ वर्षीय पुरूष, ३३ वर्षीय पुरूष रुग्णाचा समावेश आहे.
याच कोरोनाबाधितांमध्ये गलांडवाडी नंबर १ येथील २८ वर्षीय पुरूष, निमगावकेतकी येथील ७२ वर्षीय पुरूष, शिरसोडी येथील ६० वर्षीय पुरूष, वकीलवस्ती येथील २३ वर्षीय महिला, अंथुर्णे येथील ५५ वर्षीय पुरूष, ३५ वर्षीय पुरूष, ११ वर्षीय मुलगा, तावशी येथील ५५ वर्षीय महिलेचा समावेश आहे.











