राजकुमार लव्हे, बाबुर्डी, बारामती
आपल्या देशात अनैक मोठ मोठे देवस्थाने तसेच तिर्थक्षेत्र आहेत आणी यातील अनेक देवस्थाने ही अतिशय श्रीमंत करोडो रुपये संपत्ती असलेली देवस्थाने आहेत. मग प्रश्न पडतो हे देवस्थाने एवढी श्रीमंत कशी होतात?
याठिकाणी लाखो भाविक दर्शनासाठी जात असतात आणी ही सर्व भाविक देवावरील श्रद्धेपोटी दर्शनासाठी गेल्यानंतर आपल्या ऐपतीप्रमाणे पैसा, सोनं, चांदी हे दानपेटीत टाकत असतात. हीच सर्वात मोठी चुक ठरत आहे का? याच दानपेटीतून आलेल्या पैशावर येथील पुजारी असतील देवस्थानचे विश्वस्त, ट्स्टी हे मोठया प्रमाणात चोरी करत असतात. एक एक जण तर एवढया मोठया प्रमाणात चोरी करतात की, पुढील दहा पिढ्यांना पुरेल एवढं साठवून ठेवतात.
आताच नविन घडलेल्या घटना म्हणजे अयोध्यामधील राम मंदिरात झालेली जवळपास दोनशे कोटींची चोरी! मग एक प्रश्न पडतो. आपल्याकडे अजूनही सोमवार, गुरूवार, शनिवार हे कोणत्या ना कोणत्या देवाचे ठरलेले वार जर या दिवशी अंडी, मटण खाल्ले की, म्हणतात पाप लागते, आज रामाचा वार आहे. आज हनुमानाचा वार आहे. मग याच रामाच्या मंदिरातून कोट्यवधी रुपयांची चोरी होती. मग ती चोरी करणाऱ्याला का काय पाप लागत नाही? देशात बराच गोंधळ उडाल्यानंतर मग गुन्हा दाखल होतो.. त्यातही महत्वाच्या लोकांवर काहीच होत नाही, असं का?
म्हणूनच आतातरी भाविकांनी हुशार व्हावे. शहाणं व्हावे. कुठेही कोणत्याही देवाला दर्शनासाठी गेल्यानंतर दानधर्म करायचा नाही. मनोभावाने देवाचे दर्शन घ्यायचं आणि निघुन जायचं. एक रूपया ही येथून पुढे कोणत्याही देवस्थानाला दानधर्म करायचा नाही. आपण दान केलेल्या पैशावर हे पुजारी, ट्रस्टी दिवसाढवळ्या डल्ला मारत असताना त्यामुळे सावध व्हा आणि दर्शन घ्या, पूजा करा, पण मंदिरात पैसा, सोनं नाणं दानधर्म करू नका. त्या ऐवजी एखाद्या निराधार व्यक्तीला मदत करा.










