• Contact us
  • About us
Tuesday, September 15, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आनंद दरबारात आचार्य सम्राट आनंदऋषीजी महाराजांच्या प्रतिमा व चरणपादुकांच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी

mahaanewslive by mahaanewslive
July 1, 2026
in यशोगाथा, सामाजिक, मनोरंजन, महिला विश्व, महाराष्ट्र
0
आनंद दरबारात आचार्य सम्राट आनंदऋषीजी महाराजांच्या प्रतिमा व चरणपादुकांच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी

डॉ. संदेश शहा, पुणे

कात्रज येथील दत्तनगरमधील आनंद दरबारात ज्येष्ठ पौर्णिमेनिमित्त आचार्य सम्राट आनंदऋषीजी महाराज यांच्या भव्य आराधना सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी महाराजांच्या प्रतिमा तसेच १४ शुभचिन्हांनी अलंकृत कमलाकृती चरणपादुकांच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली. आनंद दरबारचे अध्यक्ष बाळासाहेब धोका यांच्या नेतृत्वाखाली हा धार्मिक सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडला.

यावेळी बोलताना बाळासाहेब धोका यांनी आचार्य सम्राट आनंदऋषीजी महाराज यांच्या जीवनकार्याचा आढावा घेतला. त्यांनी सांगितले की, अहिल्यानगर जिल्ह्यातील चिंचोडी येथे जन्मलेल्या आनंदऋषीजी महाराजांना बालपणापासूनच अध्यात्म, कीर्तन आणि भजनाची आवड होती. त्यांनी अल्पवयातच सांसारिक जीवनाचा त्याग करून सन १९१३ मध्ये जैन श्रमण दीक्षा स्वीकारली. कठोर तपश्चर्या, स्वाध्याय, प्रभावी प्रवचने, संघटन कौशल्य आणि समाजप्रबोधनाच्या कार्यामुळे त्यांना “आचार्य सम्राट” हा बहुमान प्राप्त झाला.

देशभरात त्यांनी जैन आगमांचा प्रसार करताना अहिंसा, सत्य, संयम, व्यसनमुक्ती, नैतिक मूल्ये आणि मानवसेवेचा संदेश दिला. त्यांच्या प्रत्येक प्रवचनाची सुरुवात संत तुकाराम महाराजांच्या अभंगाने होत असे. महाराष्ट्र ही त्यांची जन्मभूमी असली तरी संपूर्ण भारत ही त्यांची कर्मभूमी ठरल्याने त्यांना राष्ट्रसंत म्हणूनही गौरविले जाते.

भारतात प्रथमच आचार्य सम्राट आनंदऋषीजी महाराज यांच्या प्रतिमा आणि १४ शुभचिन्हांनी युक्त कमलाकृती चरणपादुकांची स्थापना दत्तनगर येथील आनंद दरबारात करण्यात आल्याचे बाळासाहेब धोका यांनी सांगितले. त्यांच्या कार्याची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावी या उद्देशाने दर पौर्णिमेला ‘आनंद उत्सव’ आयोजित करण्यात येत असून या उपक्रमाला सर्वधर्मीयांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमात मनोज मुकेश छाजेड, सौ. उज्वला शरद लुणावत आणि विआन सूरज पारख यांनी प्रभावना व प्रसादीचे आयोजन केले. यावेळी शरद लुणावत, अशोक कटारिया, रमेशचंद संचेती, पन्नालाल भंडारी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी आनंद दरबार संचलित श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक आनंद रत्न जैन स्थानक, दत्तनगर संघाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.

Next Post
पाटस-कानगाव सिमेंट कंपन्यांच्या प्रदूषणाचा मुद्दा अधिवेशनात; आमदार सदाभाऊ खोत यांनी सरकारला धारेवर धरले

पाटस-कानगाव सिमेंट कंपन्यांच्या प्रदूषणाचा मुद्दा अधिवेशनात; आमदार सदाभाऊ खोत यांनी सरकारला धारेवर धरले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उद्यापासून पावसाळी अधिवेशन; सरसकट कर्जमाफी, दुष्काळाचे सावट, विषारी दारूकांड, वाढत्या गुन्हेगारीवरून सरकारची कसोटी

आरोग्य अधिकारी जसे काम करतील; तशाच प्रकारची त्यांना नियुक्ती व जबाबदारी मिळणार..! त्यांची कामगिरीच ठरवेल आरोग्य अधिकाऱ्यांची पुढील जबाबदारी; दरवर्षी होणार गुणांकन

September 7, 2026
सावत्र बहिणीचे घर जाळल्याचा आरोपातील हवा असलेला आरोपी पहाटेच्या सापळ्यात जेरबंद..!

सावत्र बहिणीचे घर जाळल्याचा आरोपातील हवा असलेला आरोपी पहाटेच्या सापळ्यात जेरबंद..!

September 7, 2026
पाच वर्षे वॉरंटला चकवा; अखेर आरोपी पोलिसांच्या जाळ्यात मारहाण व धमकीच्या २०२१ मधील गुन्ह्यात देवेंद्र घोडकेला अटक; न्यायालयीन कोठडी!

पाच वर्षे वॉरंटला चकवा; अखेर आरोपी पोलिसांच्या जाळ्यात मारहाण व धमकीच्या २०२१ मधील गुन्ह्यात देवेंद्र घोडकेला अटक; न्यायालयीन कोठडी!

September 7, 2026
चार दशकांनंतरही शिक्षकांच्या आठवणी ताज्या; १९८६च्या बॅचमधील माजी विद्यार्थ्यांनी ७०० हून अधिक पोस्टकार्डांद्वारे व्यक्त केली कृतज्ञता..!

चार दशकांनंतरही शिक्षकांच्या आठवणी ताज्या; १९८६च्या बॅचमधील माजी विद्यार्थ्यांनी ७०० हून अधिक पोस्टकार्डांद्वारे व्यक्त केली कृतज्ञता..!

September 7, 2026
लेकीसाठी अनवानी पायाने धावणाऱ्या माऊलीच्या मदतीला सचिन तेंडुलकरही सरसावला

लेकीसाठी अनवानी पायाने धावणाऱ्या माऊलीच्या मदतीला सचिन तेंडुलकरही सरसावला

September 7, 2026
साखर कारखान्यांची धुराडी कधी पेटणार? ऑक्टोबर की नोव्हेंबरचा मुहूर्त; बुधवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत निर्णय

साखर कारखान्यांची धुराडी कधी पेटणार? ऑक्टोबर की नोव्हेंबरचा मुहूर्त; बुधवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत निर्णय

September 7, 2026
नगराध्यक्षांच्या वित्तीय अधिकारांना कात्री; नमुना क्र. ६४ वर मुख्याधिकाऱ्यांचीच स्वाक्षरी

नगराध्यक्षांच्या वित्तीय अधिकारांना कात्री; नमुना क्र. ६४ वर मुख्याधिकाऱ्यांचीच स्वाक्षरी

September 7, 2026
भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील पहिला महानायक – आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक!

भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील पहिला महानायक – आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक!

September 7, 2026
दिवे घाटातील अपघातातील गौरव चव्हाणच्या कुटुंबीयांची युगेंद्र पवार यांनी घेतली भेट!

दिवे घाटातील अपघातातील गौरव चव्हाणच्या कुटुंबीयांची युगेंद्र पवार यांनी घेतली भेट!

September 6, 2026
उद्या सोमवारी उजनीकाठच्या ४० गावात मच्छीमारांचे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण..!

उद्या सोमवारी उजनीकाठच्या ४० गावात मच्छीमारांचे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण..!

September 6, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group