• Contact us
  • About us
Tuesday, September 15, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

निधीअभावी पुणे जिल्ह्यातील ग्रामसुरक्षा यंत्रणेचा टोलफ्री क्रमांक 5 जुलैपासून बंद होण्याची शक्यता! अंदाजे ५.६३ कोटींचा निधी, पण नुतनीकरण नाही..!

mahaanewslive by mahaanewslive
June 29, 2026
in यशोगाथा, सामाजिक, सुरक्षा, शिक्षण, मनोरंजन, महाराष्ट्र
0
टेलिग्रामवर बंदी.. फक्त निष्पक्ष नीट परिक्षा हेच कारण की, सोशल मिडियावर आगामी नियंत्रणासाठीची लिटमस टेस्ट?

{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":[],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":false,"containsFTESticker":false}

पुणे : पुणे ग्रामीण जिल्ह्यातील तब्बल 1,196 ग्रामपंचायतींमध्ये आपत्कालीन सूचना, ग्रामसभा, शासकीय योजना, नैसर्गिक आपत्ती, वन्यप्राण्यांचा धोका तसेच गुन्हे व दुर्घटनांबाबत नागरिकांना क्षणार्धात माहिती पोहोचविणारी ‘ग्राम सुरक्षा यंत्रणा’ निधीअभावी बंद पडण्याच्या मार्गावर आहे. या यंत्रणेचा टोलफ्री क्रमांक 1800-270-3600 वरील सेवा 5 जुलै 2026 पासून पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय व्यवस्थापनाने घेतला आहे.

पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या पुढाकारातून फेब्रुवारी 2019 मध्ये सुरू झालेल्या या उपक्रमामुळे एका फोन कॉलद्वारे गावातील सर्व नोंदणीकृत नागरिकांच्या मोबाईलवर तात्काळ संदेश किंवा व्हॉईस कॉल पोहोचविण्याची सुविधा उपलब्ध झाली होती. पुणे जिल्ह्यातील 11 लाख 27 हजार 924 नागरिक या यंत्रणेशी जोडले गेले. प्रती कुटुंब पन्नास रुपये दर वर्षासाठी या यंत्रणे करता निधी ग्रामपंचायतींकडून घेतला जातो.

थोडक्यात हे 11 लाख 27 हजार 924 जे ग्रामस्थ जोडलेले आहेत, ते प्रत्येक कुटुंबातील एक व्यक्ती याप्रमाणे जोडलेले आहेत. आतापर्यंत 36 हजार 782 हून अधिक वेळा या सुविधेचा नागरिक व प्रशासनाने प्रभावी वापर केला आहे. यंत्रणेच्या सूत्रांकडील माहितीनुसार एकंदर वार्षिक निधीचा विचार करता जोडले गेलेले ग्रामस्थ व वार्षिक पन्नास रुपये निधीचा विचार करता पाच कोटी 63 लाख रुपयांची गरज ही यंत्रणा सुरू ठेवण्यासाठी असते. मात्र यंदा जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींनी याची नुतनीकरण केलेले नाही.

ग्रामसुरक्षा यंत्रणेच्या माध्यमातून चोरी, दरोडे, हरवलेली मुले व जनावरे शोधणे, ऊस, जंगल व गायरानातील आगी विझवणे, नैसर्गिक आपत्तींची माहिती देणे, वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांबाबत नागरिकांना सतर्क करणे अशा अनेक घटनांमध्ये पोलिसांना आणि ग्रामस्थांना मोठे यश मिळाले आहे. बारामती, शिरूर, शिक्रापूर, वालचंदनगर, यवत, दौंड, मंचर, जुन्नर, लोणावळा, सासवड, इंदापूर, पौड, राजगड आदी भागांतील अनेक महत्त्वाच्या घटनांमध्ये या यंत्रणेने प्रभावी भूमिका बजावली असल्याचा दावा ग्रामसुरक्षा यंत्रणेच्या संचालकांच्या वतीने करण्यात आला आहे.

ग्राम सुरक्षा यंत्रणेचे संचालक डी. के. गोर्डे पाटील यांनी सांगितले की, या सेवेसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करण्यात आला. मात्र ग्रामपंचायतींकडून निधीची तरतूद न झाल्याने आणि प्रशासनाकडूनही आवश्यक प्रयत्न न झाल्याने ही सेवा सुरू ठेवणे अशक्य झाले आहे. त्यामुळे 5 जुलै 2026 पासून टोलफ्री सेवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Next Post
पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या विचारांचा जागर; भवानीनगरात ३०१ वी जयंती उत्साहात साजरी

पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या विचारांचा जागर; भवानीनगरात ३०१ वी जयंती उत्साहात साजरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उद्यापासून पावसाळी अधिवेशन; सरसकट कर्जमाफी, दुष्काळाचे सावट, विषारी दारूकांड, वाढत्या गुन्हेगारीवरून सरकारची कसोटी

आरोग्य अधिकारी जसे काम करतील; तशाच प्रकारची त्यांना नियुक्ती व जबाबदारी मिळणार..! त्यांची कामगिरीच ठरवेल आरोग्य अधिकाऱ्यांची पुढील जबाबदारी; दरवर्षी होणार गुणांकन

September 7, 2026
सावत्र बहिणीचे घर जाळल्याचा आरोपातील हवा असलेला आरोपी पहाटेच्या सापळ्यात जेरबंद..!

सावत्र बहिणीचे घर जाळल्याचा आरोपातील हवा असलेला आरोपी पहाटेच्या सापळ्यात जेरबंद..!

September 7, 2026
पाच वर्षे वॉरंटला चकवा; अखेर आरोपी पोलिसांच्या जाळ्यात मारहाण व धमकीच्या २०२१ मधील गुन्ह्यात देवेंद्र घोडकेला अटक; न्यायालयीन कोठडी!

पाच वर्षे वॉरंटला चकवा; अखेर आरोपी पोलिसांच्या जाळ्यात मारहाण व धमकीच्या २०२१ मधील गुन्ह्यात देवेंद्र घोडकेला अटक; न्यायालयीन कोठडी!

September 7, 2026
चार दशकांनंतरही शिक्षकांच्या आठवणी ताज्या; १९८६च्या बॅचमधील माजी विद्यार्थ्यांनी ७०० हून अधिक पोस्टकार्डांद्वारे व्यक्त केली कृतज्ञता..!

चार दशकांनंतरही शिक्षकांच्या आठवणी ताज्या; १९८६च्या बॅचमधील माजी विद्यार्थ्यांनी ७०० हून अधिक पोस्टकार्डांद्वारे व्यक्त केली कृतज्ञता..!

September 7, 2026
लेकीसाठी अनवानी पायाने धावणाऱ्या माऊलीच्या मदतीला सचिन तेंडुलकरही सरसावला

लेकीसाठी अनवानी पायाने धावणाऱ्या माऊलीच्या मदतीला सचिन तेंडुलकरही सरसावला

September 7, 2026
साखर कारखान्यांची धुराडी कधी पेटणार? ऑक्टोबर की नोव्हेंबरचा मुहूर्त; बुधवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत निर्णय

साखर कारखान्यांची धुराडी कधी पेटणार? ऑक्टोबर की नोव्हेंबरचा मुहूर्त; बुधवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत निर्णय

September 7, 2026
नगराध्यक्षांच्या वित्तीय अधिकारांना कात्री; नमुना क्र. ६४ वर मुख्याधिकाऱ्यांचीच स्वाक्षरी

नगराध्यक्षांच्या वित्तीय अधिकारांना कात्री; नमुना क्र. ६४ वर मुख्याधिकाऱ्यांचीच स्वाक्षरी

September 7, 2026
भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील पहिला महानायक – आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक!

भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील पहिला महानायक – आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक!

September 7, 2026
दिवे घाटातील अपघातातील गौरव चव्हाणच्या कुटुंबीयांची युगेंद्र पवार यांनी घेतली भेट!

दिवे घाटातील अपघातातील गौरव चव्हाणच्या कुटुंबीयांची युगेंद्र पवार यांनी घेतली भेट!

September 6, 2026
उद्या सोमवारी उजनीकाठच्या ४० गावात मच्छीमारांचे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण..!

उद्या सोमवारी उजनीकाठच्या ४० गावात मच्छीमारांचे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण..!

September 6, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group