किशोर भोईटे, महान्यूज लाईव्ह
सणसर : शासनाच्या पोलिओमुक्त अभियानात शून्य ते पाच वर्षे वयोगटातील 3576 लाभार्थी बालकांसाठी पल्स पोलिओ मोहिमेचे आज प्राथमिक आरोग्य केंद्र सणसर येथे जिल्हा परिषद सदस्या माधुरी भिसे, पंचायत समिती सदस्या ज्योत्स्ना सुरूडकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. सणसर आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रातील सर्व शून्य ते पाच वर्षे वयोगटातील बालकांना घेऊन पालक मोठ्या संख्येने या मोहिमेत सहभागी झाले.
यावेळी सागर भिसे, मोहन सुरूडकर, वैद्यकीय अधिकारी डॉ युवराज पौळ, डॉ पंकज पाटील, पोलीस पाटील राजेंद्र चव्हाण, आरोग्य सहाय्यक, अशोक कमळे, आरोग्य सहाय्यक ईरेशा सोलापूर, आरोग्य सहायिका ललिता मदने, आरोग्य सेविका अरुणा कामथे, आरोग्य सेवक सुरज गोरे, स्टाफ नर्स ललिता पोरे, गटप्रवर्तक स्वाती काळे, स्त्री परिचर प्राजक्ता चव्हाण, आशा वर्कर सुवर्णा कांबळे, डाटा ऑपरेटर तब्बू शेख, ॲम्बुलन्स ड्रायव्हर इंद्रजीत निंबाळकर उपस्थित होते.











