• Contact us
  • About us
Friday, June 26, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आता म्हणे आढीतले नासके आंबे गेलेत.. आतातरी मेडिकल कॉलेजचा कारभार सुधारेल ना?

mahaanewslive by mahaanewslive
June 24, 2026
in यशोगाथा, सामाजिक, सुरक्षा, शिक्षण, महिला विश्व, महाराष्ट्र
0
स्वप्न अजितदादांचे.. संकल्प सुनेत्रा पवारांचा; कटफळमध्ये उभारणार आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा संकुल!

बारामती : महान्यूज लाईव्ह

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीच्या पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील एकंदर कामकाजाची माहिती घेतल्यानंतर त्यावर आढावा घेतला होता आणि या महाविद्यालयातील अधिष्ठात्याची बदली करण्याचे संकेत दिले होते. मात्र तेवढ्यातच दुर्दैवी घटना घडली आणि मेडिकल कॉलेजचा अनागोंदी कारभार तसाच कायम राहिला, मात्र अजितदादांचे काम सुनेत्रा वहिनींनी सोपे केले.. बारामतीकरांना सातत्याने ज्या समस्यांना सामोरे जावे लागते, ती समस्या होती आढीतले नासके आंबे..!

आता काही जणांच्या म्हणण्यानुसार नासके आंबे दूर झाले असतील, तर उरलेल्या सगळ्यांनी कामाला सुरुवात करावी. काही दिवसांपूर्वीच सुनेत्रा पवार यांनी अचानक भेट देत या रुग्णालयातील नेमक्या कुरघोड्या काय आहेत, याचे सूक्ष्म बारकावे टिपत माहिती घेतली. आणि त्यानंतर वेळ न दवडता सुनेत्रा पवार यांनी अत्यंत आक्रमकपणे या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची घडी व्यवस्थित बसवण्यासाठी स्वतःला प्रमुख म्हणून घेणारे आणि इथे जणू मीच महत्त्वाचा असे समजणारे सगळेच बदलले. 

या बदल्या अगोदरच होणार होत्या, पण..

आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कामकाजातील अव्यवस्थितपणाला प्रमुख देखील जबाबदार असल्याची माहिती अजितदादांपर्यंत पोहोचली होती. अजितदादांनी बदलीचे आदेश काढण्याचे आदेश तर दिले, मात्र मंत्रालयापर्यंत आपली सेटिंग करून ठेवलेल्या अधिकाऱ्याला आपली बदली होणार असल्याचे कळले आणि त्यांनी लागलेच पुन्हा रदबदली करण्याची प्रक्रिया सुरू केली आणि त्याची बदली रखडली.

त्यानंतर काल-परवा जेव्हा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी बारामतीच्या वैद्यकीय महाविद्यालयाला भेट दिली तेव्हा तेथील अव्यवस्थितपणा व विस्कळीत नियोजन त्यांच्या नजरेस आले आणि त्यांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली. मात्र त्यानंतर आपल्या चुका सुधारण्याच्या ऐवजी इथला स्थानिक अधिकारी आपल्या मर्जीतील काही लोकांना राजकीय नेतृत्वापर्यंत पाठवून काहीच घडले नसल्याचा अविर्भाव आणत होता.

अर्थात सुनेत्रा पवार येऊन गेल्यानंतर काही दिवस उलटले तरी, प्रशासकीय बदल काहीच झाला नाही, त्यामुळे त्याने केलेली सेटिंग बरोबर होती, असा समज देखील अनेकांचा झाला. मात्र काल रात्री जेव्हा उचलबांगडी झाली. तेव्हा अनेकांनी सुटकेचा निःश्वास टाकला. आता मेडिकल कॉलेजमधील घाण बाहेर गेली आहे, मीच राजकीय नेतृत्वाच्या जवळचा असे म्हणून अधिकाऱ्यांना समज करून देऊन इथे सर्वेसर्वा होण्याचा प्रयत्न जे कोणी करत होते त्यांना देखील सुनेत्रा पवार यांनी योग्य संदेश पोहोचवला आहे. आता शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कामकाजात सुसूत्रता येईल अशी अपेक्षा आहे.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

एअर इंडियाच्या या इमारतीतून मंत्रालय चालणार! नवा विस्तार देईल विखुरलेल्या विभागांना नवी गती!

एअर इंडियाच्या या इमारतीतून मंत्रालय चालणार! नवा विस्तार देईल विखुरलेल्या विभागांना नवी गती!

June 18, 2026
माळेगाव सहकारी साखर कारखान्यात मिल रोलर पूजन; गळीत हंगाम २०२६-२७ च्या तयारीला वेग

माळेगाव सहकारी साखर कारखान्यात मिल रोलर पूजन; गळीत हंगाम २०२६-२७ च्या तयारीला वेग

June 18, 2026
एका रात्रीत दौंड तालुक्यात ५ ठिकाणी दरोडे टाकले.. टोळी जेरबंद; २५ लाखांचा मुद्देमाल जप्त, २० गंभीर गुन्हे उघड!

एका रात्रीत दौंड तालुक्यात ५ ठिकाणी दरोडे टाकले.. टोळी जेरबंद; २५ लाखांचा मुद्देमाल जप्त, २० गंभीर गुन्हे उघड!

June 18, 2026
दौंड पुन्हा हादरले! गर्भपात प्रकरणात केडगावच्या डॉ. स्वाती लवंगारे यांच्यावर गुन्हा दाखल!

बेकायदेशीर लिंग निदान व गर्भपात करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश; महिला डॉक्टरला १९ जूनपर्यंत पोलीस कोठडी!

June 18, 2026
थप्पड से डर नहीं लगता साहब, लेकीन प्यार से डर लगता है..!

थप्पड से डर नहीं लगता साहब, लेकीन प्यार से डर लगता है..!

June 18, 2026
बारामतीचे ते चौघे.. संभाजीनगर मधल्या पंपावरच्या गर्दीत.. मग डिझेल कसे मिळाले? अर्थात दादा सांगतील तसं..!

बारामतीचे ते चौघे.. संभाजीनगर मधल्या पंपावरच्या गर्दीत.. मग डिझेल कसे मिळाले? अर्थात दादा सांगतील तसं..!

June 18, 2026
अनबाउंड’ची खडतर वाट.. अमेरिकेत १७१ किमी सायकल शर्यत पूर्ण करणारे पुण्याचे  सूरज कुडतरकर एकमेव ज्येष्ठ भारतीय!

अनबाउंड’ची खडतर वाट.. अमेरिकेत १७१ किमी सायकल शर्यत पूर्ण करणारे पुण्याचे  सूरज कुडतरकर एकमेव ज्येष्ठ भारतीय!

June 17, 2026
भूक व भीकमुक्त महाराष्ट्राकरिता पुण्याने दिशादर्शक काम करावे- महेश ढवळे

भूक व भीकमुक्त महाराष्ट्राकरिता पुण्याने दिशादर्शक काम करावे- महेश ढवळे

June 17, 2026
बारामती शहर पोलिसांची गोवंश वाहतुकीवर धडक कारवाई; दोन पिकअपसह चार जनावरे ताब्यात

गोमातेला राष्ट्रीय पशूचा दर्जा द्या.. गोमातेची हत्या रोखा आणि म्हैस, रेड्याच्या मांसावरून होणारी तथाकथित ब्लॅकमेलिंगही रोखा..  बारामतीत कुरेशींचे तीन दिवसांचे धरणे आंदोलन!

June 17, 2026
महाराष्ट्र माहितीचा अधिकार नियम, २०२६ : माहितीच्या अधिकारावर अभूतपूर्व घाला घातला गेलाय.. सावध व्हा! 

महाराष्ट्र माहितीचा अधिकार नियम, २०२६ : माहितीच्या अधिकारावर अभूतपूर्व घाला घातला गेलाय.. सावध व्हा! 

June 17, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group