• Contact us
  • About us
Friday, June 26, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अजितदादांच्या स्मारकावरून बारामती नगरपरिषदेत राजकीय खळबळ; नवनाथ बल्लाळ यांचा नगरसेवकांना थेट सवाल!

mahaanewslive by mahaanewslive
June 23, 2026
in यशोगाथा, सामाजिक, सुरक्षा, मराठवाडा, महिला विश्व, महाराष्ट्र
0
बारामतीतील सायबर गुन्हेगारीची चौथी घटना! आणखी दोघांची 68 लाखाची फसवणूक!

बारामती, दि. २३ : महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या स्मारक उभारणीच्या प्रस्तावावरून बारामती नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत चांगलीच राजकीय खळबळ उडाली. स्मारकाच्या विषयावर विविध नगरसेवकांनी भूमिका मांडत पुढाकार घेण्याची तयारी दर्शविली असताना, प्रभाग क्रमांक १४ चे नगरसेवक तथा आरोग्य सभापती नवनाथ बल्लाळ यांनी काही नगरसेवकांच्या भूमिकेवर थेट प्रश्न उपस्थित करत सभागृहात वातावरण तापविले.

सभेत बोलताना बल्लाळ यांनी अजितदादा पवार यांच्याविरोधात पूर्वी करण्यात आलेल्या वादग्रस्त वक्तव्यांचा संदर्भ देत काही नगरसेवकांच्या मौनावर टीका केली. “त्या वेळी अजितदादांच्या सन्मानासाठी आणि त्यांच्या समर्थनार्थ ठामपणे उभे राहणारे फारच कमी होते. नगरसेवक अमर धुमाळ आणि विशाल हिंगणे यांनी त्यावेळी स्पष्ट भूमिका घेतली होती. मात्र आज स्मारकाच्या विषयावर अनेक जण पुढे येताना दिसत आहेत,” असे ते म्हणाले.

यावेळी त्यांनी इतर सदस्यांनाही लक्ष्य करत, “जेव्हा अजितदादांबाबत वादग्रस्त वक्तव्य झाले होते, तेव्हा तुम्ही गप्प का बसला होतात? त्यांच्या सन्मानासाठी आवाज का उठवला नाही?” असा थेट सवाल केला.
स्मारक उभारणीसाठी सूचक होण्याची स्पर्धा सुरू असल्याचे सांगत बल्लाळ यांनी काही जण केवळ राजकीय प्रसिद्धीसाठी पुढाकार घेत असल्याचा आरोपही केला. “अजितदादांप्रती खरी निष्ठा ही कृतीतून दिसली पाहिजे. केवळ सभागृहातील भाषणे किंवा ठराव मांडून निष्ठा सिद्ध होत नाही,” असे मत त्यांनी व्यक्त केले.

बल्लाळ यांच्या या वक्तव्यानंतर सभागृहात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. स्मारक उभारणीच्या मुद्द्यावर सुरू झालेली चर्चा पुढे राजकीय भूमिका, निष्ठा आणि कार्यपद्धती यांवर केंद्रित झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. त्यांच्या वक्तव्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये नव्याने राजकीय चर्चा रंगली असून, बारामतीच्या राजकीय वर्तुळात या विषयाची जोरदार चर्चा सुरू आहे.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

एअर इंडियाच्या या इमारतीतून मंत्रालय चालणार! नवा विस्तार देईल विखुरलेल्या विभागांना नवी गती!

एअर इंडियाच्या या इमारतीतून मंत्रालय चालणार! नवा विस्तार देईल विखुरलेल्या विभागांना नवी गती!

June 18, 2026
माळेगाव सहकारी साखर कारखान्यात मिल रोलर पूजन; गळीत हंगाम २०२६-२७ च्या तयारीला वेग

माळेगाव सहकारी साखर कारखान्यात मिल रोलर पूजन; गळीत हंगाम २०२६-२७ च्या तयारीला वेग

June 18, 2026
एका रात्रीत दौंड तालुक्यात ५ ठिकाणी दरोडे टाकले.. टोळी जेरबंद; २५ लाखांचा मुद्देमाल जप्त, २० गंभीर गुन्हे उघड!

एका रात्रीत दौंड तालुक्यात ५ ठिकाणी दरोडे टाकले.. टोळी जेरबंद; २५ लाखांचा मुद्देमाल जप्त, २० गंभीर गुन्हे उघड!

June 18, 2026
दौंड पुन्हा हादरले! गर्भपात प्रकरणात केडगावच्या डॉ. स्वाती लवंगारे यांच्यावर गुन्हा दाखल!

बेकायदेशीर लिंग निदान व गर्भपात करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश; महिला डॉक्टरला १९ जूनपर्यंत पोलीस कोठडी!

June 18, 2026
थप्पड से डर नहीं लगता साहब, लेकीन प्यार से डर लगता है..!

थप्पड से डर नहीं लगता साहब, लेकीन प्यार से डर लगता है..!

June 18, 2026
बारामतीचे ते चौघे.. संभाजीनगर मधल्या पंपावरच्या गर्दीत.. मग डिझेल कसे मिळाले? अर्थात दादा सांगतील तसं..!

बारामतीचे ते चौघे.. संभाजीनगर मधल्या पंपावरच्या गर्दीत.. मग डिझेल कसे मिळाले? अर्थात दादा सांगतील तसं..!

June 18, 2026
अनबाउंड’ची खडतर वाट.. अमेरिकेत १७१ किमी सायकल शर्यत पूर्ण करणारे पुण्याचे  सूरज कुडतरकर एकमेव ज्येष्ठ भारतीय!

अनबाउंड’ची खडतर वाट.. अमेरिकेत १७१ किमी सायकल शर्यत पूर्ण करणारे पुण्याचे  सूरज कुडतरकर एकमेव ज्येष्ठ भारतीय!

June 17, 2026
भूक व भीकमुक्त महाराष्ट्राकरिता पुण्याने दिशादर्शक काम करावे- महेश ढवळे

भूक व भीकमुक्त महाराष्ट्राकरिता पुण्याने दिशादर्शक काम करावे- महेश ढवळे

June 17, 2026
बारामती शहर पोलिसांची गोवंश वाहतुकीवर धडक कारवाई; दोन पिकअपसह चार जनावरे ताब्यात

गोमातेला राष्ट्रीय पशूचा दर्जा द्या.. गोमातेची हत्या रोखा आणि म्हैस, रेड्याच्या मांसावरून होणारी तथाकथित ब्लॅकमेलिंगही रोखा..  बारामतीत कुरेशींचे तीन दिवसांचे धरणे आंदोलन!

June 17, 2026
महाराष्ट्र माहितीचा अधिकार नियम, २०२६ : माहितीच्या अधिकारावर अभूतपूर्व घाला घातला गेलाय.. सावध व्हा! 

महाराष्ट्र माहितीचा अधिकार नियम, २०२६ : माहितीच्या अधिकारावर अभूतपूर्व घाला घातला गेलाय.. सावध व्हा! 

June 17, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group