इंदापूर : महान्यूज लाईव्ह
आमदार रोहित पवार यांनी पंढरपुरात शेतकरी कर्जमाफीसाठी अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे या आंदोलनाचा आज दुसरा दिवस असून या आंदोलनात तोडगा निघाला नाही, तर उद्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने पुणे सोलापूर महामार्गावर इंदापूर मध्ये रास्ता रोको करण्यात येणार आहे.
याची माहिती पक्षाचे नेते महारुद्र पाटील व अमोल भिसे यांनी काल पंढरपुरात दिली. इंदापूर तालुक्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हेच राज्याचे कृषिमंत्री आहेत आणि आमदार रोहित पवार यांनी शेतकरी कर्जमाफीच्या निर्णयात कोणतीही अट किंवा शर्त ठेवू नये आणि सरसकट कर्जमाफी द्यावी या मागणीसाठी अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे.
अशा परिस्थितीमध्ये इंदापूरची जबाबदारी आहे की, शेतकऱ्यांचा आवाज शेतकऱ्यांच्या मंत्र्यापर्यंत आणि सरकारपर्यंत अधिक आक्रमकपणे पोचला पाहिजे. त्या दृष्टीने हा रस्ता रोको आयोजित करण्यात आला असल्याची माहिती महारुद्र पाटील व अमोल भिसे यांनी दिली. दरम्यान या आंदोलनावर तोडगा निघाला नाही, तर अधिक आक्रमकपणे गावातील शेतकरी संघटित होतील आणि सरकार विरुद्ध आपला आक्रोश व्यक्त करतील असेही महारुद्र पाटील व अमोल भिसे यांनी पंढरपुरात सांगितले.











