मुंबई : महान्यूज लाईव्ह
खासदार आणि अभिनेता अमोल कोल्हे यांची प्रमुख भूमिका असलेली मी सावित्रीबाई जोतीराव फुले ही मालिका अवघ्या काही दिवसांतच बंद पडली. फुले, शाहू, आंबेडकर यांच्या पुरोगामी महाराष्ट्रात महिलांना शिक्षणाचे दरवाजे खुले करणारे महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित असलेली ही ऐतिहासिक वारसा जपणारी आणि प्रेरणादायी मालिका बंद पडली.
याची खंत अभिनेते व खासदार अमोल कोल्हे यांनी मुंबई येथे पार पडलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २७ व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात बोलून दाखवली. यावेळी आमदार रोहीत पवार यांनी ही मालिका पुन्हा सुरू करण्यासाठी आपल्या परिवार आणि कंपनीकडून ५० लाख रुपयांची मदत देण्याची घोषणा केली. शेवटी विचार महत्त्वाचा आहे आणि तो टिकला पाहिजे हे महत्त्वाचे आहे असे रोहीत पवार यावेळी बोलताना म्हणाले.
“मी सावित्रीबाई जोतीराव फुले” मालिका संपली पण गोष्ट संपलेली नाही!
खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी सांगितले की, मी पुन्हा एकदा ठामपणे सांगतो, स्टार प्रवाहवरील मालिका संपली तरी गोष्ट संपलेली नाही; गोष्ट सुरु राहणार आहे. आणि 13 जूनपासून आपण पुन्हा शुटींग सुरु करतोय. 14 जूनला मालिका स्टार प्रवाहवरुन ऑन एअर जाईल. तुम्ही कोणीही नाराज होऊ नका, कोणीही निराश होऊ नका. 13 जूनला पुन्हा याच ठिकाणी, आज जसा पॅकअपचा कॉल आहे, तसाच रोलचा कॉल घुमेल!
दरम्यान, लवकरच मालिकेचे नवे भाग प्रेक्षकांच्या भेटीला येतील अशी आशा आहे. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याच्या










