• Contact us
  • About us
Friday, June 19, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

याला म्हणतात दहशत! तुकाराम मुंढे यांच्या संभाव्य कारवाईची धास्ती! बारामतीतही टपऱ्या, दुकाने बंद!

mahaanewslive by mahaanewslive
June 11, 2026
in यशोगाथा, सामाजिक, सुरक्षा, आरोग्य, आर्थिक, कथा, कामगार जगत, क्राईम डायरी, राज्य, ताज्या बातम्या, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, व्यक्ती विशेष, Featured
0
याला म्हणतात दहशत! तुकाराम मुंढे यांच्या संभाव्य कारवाईची धास्ती! बारामतीतही टपऱ्या, दुकाने बंद!

विक्रम वरे : महान्यूज लाईव्ह
बारामती : आपल्या कडक आणि धडाकेबाज प्रशासकीय शैलीसाठी ओळखले जाणारे वरिष्ठ आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध प्रशासन (FDA) आयुक्तपदाचा पदभार स्वीकारताच राज्यभर नियमबाह्य कामांवर कारवाईचा सपाटा लावला आहे. त्यांच्या या आक्रमक भूमिकेचा परिणाम आता बारामतीसह राज्यातील अनेक शहरांमध्ये दिसून येत असून,बारामतीत नुकताच FDA ने धाड टाकून गुटखा जप्त करून गुन्हा दाखल केला आहे.तसेच परवाना नसलेले किंवा नियमांचे पालन न करणारे अनेक खाद्यपदार्थ विक्रेते, टपरीधारक आणि दुकानदार सावध झाले आहेत.

मुंढे यांची २१ वर्षांच्या प्रशासकीय सेवेत ही तब्बल २५ वी बदली आहे. यापूर्वी त्यांनी विविध महत्त्वाच्या पदांवर काम करताना भ्रष्टाचार, अनियमितता आणि प्रशासनातील ढिलाईविरोधात कठोर भूमिका घेतली होती. त्यामुळे त्यांच्या प्रत्येक नियुक्तीकडे नागरिक आणि प्रशासनाचे विशेष लक्ष असते. अन्न व औषध प्रशासन आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर त्यांनी राज्यभरातील खाद्य व्यवसायांची तपासणी, परवाना पडताळणी, अन्न सुरक्षेच्या नियमांचे पालन आणि बनावट किंवा निकृष्ट दर्जाच्या उत्पादनांवर कारवाई यावर भर दिला आहे. त्यांच्या आदेशानंतर FDA च्या पथकांनी विविध राज्यात धाडसत्र सुरू केले असून अनेक ठिकाणी परवाना नसलेल्या व्यवसायांवर कारवाई करण्यात आली आहे.

बारामती शहरातही या कारवाईची चर्चा रंगली आहे. FDA च्या तपासणीची शक्यता लक्षात घेऊन काही टपरीधारक आणि खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी स्वतःहून दुकाने बंद ठेवणे किंवा आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी तात्पुरती कामकाज थांबवणे पसंत केल्याचे चित्र दिसून आले. त्यामुळे “तुकाराम मुंढे यांची दहशत” अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू झाली आहे.

दरम्यान,राज्यातील अनेक ठिकाणी FDA च्या कारवायांमुळे बनावट अन्नपदार्थ, मुदतबाह्य उत्पादने, परवान्याविना सुरू असलेले व्यवसाय आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांवर अंकुश बसण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे ग्राहकांच्या आरोग्याच्या दृष्टीने ही मोहीम महत्त्वाची मानली जात आहे. तुकाराम मुंढे यांच्या कार्यशैलीमुळे पुन्हा एकदा प्रशासनात शिस्त आणि कायद्याची अंमलबजावणी यावर भर दिला जात असून, आगामी काळात अन्न व औषध प्रशासनाच्या कारवाया आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Next Post
पृथ्वीराज मुळीक ची भारतीय सैन्यदलामध्ये लेफ्टनंट पदावर नियुक्ती

पृथ्वीराज मुळीक ची भारतीय सैन्यदलामध्ये लेफ्टनंट पदावर नियुक्ती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

एअर इंडियाच्या या इमारतीतून मंत्रालय चालणार! नवा विस्तार देईल विखुरलेल्या विभागांना नवी गती!

एअर इंडियाच्या या इमारतीतून मंत्रालय चालणार! नवा विस्तार देईल विखुरलेल्या विभागांना नवी गती!

June 18, 2026
माळेगाव सहकारी साखर कारखान्यात मिल रोलर पूजन; गळीत हंगाम २०२६-२७ च्या तयारीला वेग

माळेगाव सहकारी साखर कारखान्यात मिल रोलर पूजन; गळीत हंगाम २०२६-२७ च्या तयारीला वेग

June 18, 2026
एका रात्रीत दौंड तालुक्यात ५ ठिकाणी दरोडे टाकले.. टोळी जेरबंद; २५ लाखांचा मुद्देमाल जप्त, २० गंभीर गुन्हे उघड!

एका रात्रीत दौंड तालुक्यात ५ ठिकाणी दरोडे टाकले.. टोळी जेरबंद; २५ लाखांचा मुद्देमाल जप्त, २० गंभीर गुन्हे उघड!

June 18, 2026
दौंड पुन्हा हादरले! गर्भपात प्रकरणात केडगावच्या डॉ. स्वाती लवंगारे यांच्यावर गुन्हा दाखल!

बेकायदेशीर लिंग निदान व गर्भपात करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश; महिला डॉक्टरला १९ जूनपर्यंत पोलीस कोठडी!

June 18, 2026
थप्पड से डर नहीं लगता साहब, लेकीन प्यार से डर लगता है..!

थप्पड से डर नहीं लगता साहब, लेकीन प्यार से डर लगता है..!

June 18, 2026
बारामतीचे ते चौघे.. संभाजीनगर मधल्या पंपावरच्या गर्दीत.. मग डिझेल कसे मिळाले? अर्थात दादा सांगतील तसं..!

बारामतीचे ते चौघे.. संभाजीनगर मधल्या पंपावरच्या गर्दीत.. मग डिझेल कसे मिळाले? अर्थात दादा सांगतील तसं..!

June 18, 2026
अनबाउंड’ची खडतर वाट.. अमेरिकेत १७१ किमी सायकल शर्यत पूर्ण करणारे पुण्याचे  सूरज कुडतरकर एकमेव ज्येष्ठ भारतीय!

अनबाउंड’ची खडतर वाट.. अमेरिकेत १७१ किमी सायकल शर्यत पूर्ण करणारे पुण्याचे  सूरज कुडतरकर एकमेव ज्येष्ठ भारतीय!

June 17, 2026
भूक व भीकमुक्त महाराष्ट्राकरिता पुण्याने दिशादर्शक काम करावे- महेश ढवळे

भूक व भीकमुक्त महाराष्ट्राकरिता पुण्याने दिशादर्शक काम करावे- महेश ढवळे

June 17, 2026
बारामती शहर पोलिसांची गोवंश वाहतुकीवर धडक कारवाई; दोन पिकअपसह चार जनावरे ताब्यात

गोमातेला राष्ट्रीय पशूचा दर्जा द्या.. गोमातेची हत्या रोखा आणि म्हैस, रेड्याच्या मांसावरून होणारी तथाकथित ब्लॅकमेलिंगही रोखा..  बारामतीत कुरेशींचे तीन दिवसांचे धरणे आंदोलन!

June 17, 2026
महाराष्ट्र माहितीचा अधिकार नियम, २०२६ : माहितीच्या अधिकारावर अभूतपूर्व घाला घातला गेलाय.. सावध व्हा! 

महाराष्ट्र माहितीचा अधिकार नियम, २०२६ : माहितीच्या अधिकारावर अभूतपूर्व घाला घातला गेलाय.. सावध व्हा! 

June 17, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group