मुंबई : महान्युज लाईव्ह
अभिनेता सुशांत सिंहने आत्महत्याच केली असल्याच एम्स रुग्णालयाने स्पष्ठ केल्यानंतर सत्ताधाऱ्यांनी हत्येचा मुद्दा उचलुन धरत विरोधी पक्षावर तोफ डागली आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज पत्रकार परिषद घेत भाजपवर टीका निशाणा साधला आहे.
विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राला बदनाम करणाऱ्या गुप्तेश पांडे च्या आणि तेथील उमेदवारांच्या प्रचाराला जाणार का? असा प्रश्न अनिल देशमुख यांनी यावेळी उपस्थित केला.
महाराष्ट्राला बदनाम करण्याच काम एका राजकीय पक्षाने केले असल्याचा आरोप देशमुख यांनी केला आहे. सुशांत प्रकरणाआड छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राला बदनाम करण्याचा प्रयत्न झाला.
महाराष्ट्राच्या अस्मितेला धक्का पोहचवण्याचा प्रयत्न केला गेला, असं आक्रमक वक्तव्य भाजपचे नाव न घेता अनिल देशमुख यांनी केले. यासोबतच ज्यांनी बदनामी केली त्यांनी माफी मागावी असा इशारादेखील देशमुख यांनी यावेळी दिला.
बिहार निवडणुकीच्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीस काय उत्तर देतात याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.











