कोल्हापूर – कोल्हापूरातून पळून गेलेल्या मुलीचा फ्लेक्स बोर्ड चक्क बापाने लावल्याची घटना घडली असून त्याची सोशल मिडियावर चर्चा रंगली आहे. ही चर्चा झाल्यानंतर व्हन्नूर गावात लावलेले डिजीटल फ्लेक्स उतरविण्यात तर आला, मात्र मुलीच्या बापाची प्रातिनिधीक प्रतिक्रिया आता विचार करायला लावू लागली आहे,
कोल्हापूर जिल्ह्यातील या घटनेने यापूर्वीच्या घटनांना उजाळा मिळाला आहे. आज सोशल मिडियावर मुलीचा फोटो व त्याच्या बाजूला लिहीलेल्या ओळी व्हायरल झाल्या. तिचा जन्म होतानाच आईला संधीवात दिला, मात्र त्या वेदना ती सांभाळत राहीली. ती देखील कमनशिबी ठरली आणि मी तुझा बाप देखील तुला सुख, आनंद देऊ शकलो नाही, म्हणून हा काळा दिवस पाहण्यासाठी मी जिवंत राहीलो असे नमूद करून त्या मुलीच्या वडीलाने हा बोध घेऊन अशा वागणाऱ्या मुलींच्या मनात काही परिवर्तन व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. आपल्या आईवडीलांचा विश्वासघात अशा मुली करणार नाहीत अशी अपेक्षा व्यक्त करताना त्याला वाटलेले दुःख त्याने थेट जगजाहीर केल्याने त्याची चर्चा अधिक झाली आहे.










