बारामती : महान्यूज लाईव्ह
बारामतीच्या इंडियन मेडीकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष डॉ. सुरेश सोनवणे यांचे आज अकस्मात निधन झाले.
गेली ४० वर्षे त्यांनी बारामतीत कान, नाक, घसा तज्ज्ञ म्हणून रुग्णसेवा केली. रुई ग्रामीण व सुपे ग्रामीण रुग्णालयाचे माजी वैद्यकीय अधिक्षक होते. त्यांच्या निधनाने वैद्यकीय क्षेत्रासह परिसरात शोककळा पसरली होती.











