इंदापूर : महान्यूज लाईव्ह
कोरोनामुळे सगळीकडे रक्ताची कमतरता भासत आहे. सरकारने केलेल्या रक्तदानाच्या आव्हानाला प्रतिसाद म्हणून खोरोची येथील हेगडकर हॉस्पिटलच्या वतीने रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले. सामाजिक अंतर पाळत 151 बाटल्या रक्त अक्षय ब्लड बँक सोलापूर यांनी संकलित केले.
रक्तदान शिबिराचे उद्घाटन लालासो हेगडकर, बबन वाघमोडे, नितीन नरुटे, किशोर पाटील यांनी केले.
यावेळी स्पंदन फाउंडेशन खोरोची, संग्राम कृषी सेवा केंद्र बोराटवाडी, जय भवानी प्रतिष्ठान खोरोची यांचे विशेष सहकार्य लाभले.
आरोग्य तपासणी शिबिरासाठी डॉ.समीर बंडगर, डॉ.प्रवीण गोरे, डॉ.धनंजय इंगवले, डॉ.नवनाथ बंडगर उपस्थित होते. हेगडकर हॉस्पिटलचे संचालक डॉ.निलेश हेगडकर यांनी रक्तदान शिबिराचे आयोजन केले.
यावेळी अक्षय पाटील, आप्पा वाघमोडे, ऋषिकेश पवार, गणेश भाळे, गणेश निंबाळकर या सर्वांनी सहकार्य केले. मुख्याध्यापक धनाजी हेगडकर यांनी आभार मानले.










