बारामती : महान्यूज लाईव्ह
बारामतीत काल १३२ जणांची तपासणी झाली. त्यामध्ये ३० जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. काल मंगल लॅबोरेटरी येथे तपासणी झाली नाही. काल आढळलेल्या कोरोना बाधितांमध्ये शहर व ग्रामीण भागात मिळून प्रत्येकी १५ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. बारामतीला हा मोठा दिलासा आहे, मात्र नियमित मृत्यू ही बारामतीसाठी चिंतेची बाब बनली आहे. बारामतीत ८९ जणांचा आजवर मृत्यू झाला आहे.
अर्थात यामध्ये सारीचे संशयित,ज्यांचा मृत्यू झाला, त्यांची आकडेवारी समाविष्ठ नाही. तसेच बाहेरील तालुके, जिल्ह्यांमध्ये उपचार घेताना ज्यांचा मृत्यू झाला, त्यांचीही आकडेवारी समाविष्ठ नाही. त्यामुळे पुण्यात व पिंपरी चिंचवडमधील दवाखान्यातील अनेकांची आकडेवारी नाही. त्यामुळे कोरोना उपचार करताना मृत्यूची संख्या आटोक्यात राहीली, तर कोरोना रोखण्यात बारामतीकरांना यश आले असे म्हणता येईल. आतापर्यंत बारामती तालुक्यात ३५२३ कोरोनाग्रस्त आढळले आहेत.
बारामतीतील शासकीय आरटीपीसीआर तपासणीत आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये खताळपट्टा येथील २८ वर्षीय महिला, कऱ्हावागज येथील २ वर्षीय मुलगा, मोरगाव येथील ४७ वर्षीय पुरूष, काटेवाडी येथील १५ वर्षीय मुलगा, तांदूळवाडी येथील ३८ वर्षीय पुरूष रुग्णाचा समावेश आहे.
अंबिकानगर येथील ४० वर्षीय महिला, २० वर्षीय पुरूष, १५ वर्षीय मुलगा, काटेवाडी येथील ८० वर्षीय महिला, करंजेपूल येथील ७२ वर्षीय पुरूष, कोऱ्हाळे बुद्रुक येथील ३० वर्षीय पुरूष, सांगवी येथील ४५ वर्षीय पुरूष रुग्णाचा समावेश आहे.
अशोकनगर येथे एक कुटुंब कोरोनाबाधित झाले असून यामध्ये येथील २८ वर्षीय पुरूष, २९ वर्षीय महिला, २१ वर्षीय पुरूष, ४७ वर्षीय महिलेचा समावेश आहे.
सोमेश्वरनगर येथील ३१ वर्षीय महिला, तांदूळवाडी येथील ४६ वर्षीय पुरूष, सुभाष चौक येथील ६५ वर्षीय पुरूष, श्रीरामनगर येथील ३६ वर्षीय पुरूष, खताळपट्टा येथील १० वर्षीय मुलगी, खाटिकगल्ली येथील ३७ वर्षीय पुरूष रुग्णाचा समावेश आहे.
खताळपट्टा येथील ४५ वर्षीय महिला, खंडोबानगर येथील ४३ वर्षीय पुरूष, वसंतनगर येथील २४ वर्षीय महिला, माळेगाव येथील ६६ वर्षीय पुरूष, सोरटेवाडी येथील २४ वर्षीय पुरूष, मोरगाव रोड बारामती येथील ४० वर्षीय पुरूष रुग्णाचा समावेश आहे.
बारामतीत काल शासकीय रॅपीड अॅंटीजेन तपासणी केवळ १३ जणांची झाली. यामध्ये गुनवडी येथील २७ वर्षीय पुरूष, कोऱ्हाळे येथील २७ वर्षीय पुरूष, माळेगाव येथील २६ वर्षीय पुरूष रुग्ण कोरोनाबाधित आढळून आले आहेत.
बारामतीत काल खासगी डॉ. पवार लॅबोरेटरी मध्ये झालेल्या रॅट तपासणीत मुरूम सालोबावस्ती येथील ५५ वर्षीय पुरूष रुग्ण कोरोनाबाधित आढळून आला आहे.











