पुणे : महान्यूज लाईव्ह
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष अशोकभाऊ काशिनाथ काळभोर यांचे आज निधन झाले. त्यांच्या निधनाबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शोक व्यक्त करत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
ना. अजित पवार आपल्या शोकसंदेशात म्हणतात, अशोकभाऊंचे निधन आम्हा सर्वांसाठी मोठा धक्का आहे. लोणी काळभोर ग्रामपंचायतीचे सदस्य, विविध सहकारी कार्यकारी संस्थेचे संचालक ते पुणे जिल्हा सहकारी बँकेच्या चेअरमन अशा विविध पदांवर त्यांनी काम केलं. सर्वसामान्य जनतेच्या विकासासाठी झटणारे त्यांचं नेतृत्व होतं. त्यांच्या निधनाने पुणे जिल्ह्याच्या सामाजिक, सहकार क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तिमत्व हरपले आहे. आम्ही एक चांगला सहकारी गमावला आहे.
काळभोर कुटुंबीयांवरील या दुःखद प्रसंगी आम्ही सर्वजण त्यांच्यासोबत आहोत. हे दुःख सहन करण्याची शक्ती त्यांच्या कुटुंबियांना मिळो. दिवंगत अशोकभाऊंच्या आत्म्यास चिरशांती लाभो, ही प्रार्थना अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.











